Home Blog Page 139

CBSE Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! CBSE अंतर्गत 243 पदांवर भरती सुरू

CBSE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत (CBSE Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 243 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

संस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
भरली जाणारी पदे – सहायक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल
पद संख्या – 243 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 12 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024

भरतीचा तपशील – (CBSE Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहायक सचिव (प्रशासन)36 Posts
सहायक सचिव (शैक्षणिक)33 posts
सहायक सचिव (कौशल्य शिक्षण)16 posts
सहायक सचिव (प्रशिक्षण)45 posts
लेखाधिकारी 6 posts
कनिष्ठ अभियंता35 posts
कनिष्ठ अनुवाद अधिकारी 14 posts
लेखापाल17 posts
कनिष्ठ लेखापाल43 posts

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहायक सचिव (प्रशासन)Pay Level-10
सहायक सचिव (शैक्षणिक)Pay Level-10
सहायक सचिव (कौशल्य शिक्षण)Pay Level-10
सहायक सचिव (प्रशिक्षण)Pay Level-10
लेखाधिकारी Pay Level-10
कनिष्ठ अभियंताPay Level-06
कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन)Pay Level-06
लेखापालPay Level-04
कनिष्ठ लेखापालPay Level-02

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (CBSE Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना cbse.nic.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (CBSE Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cbse.nic.in.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापक होण्यासाठी मोठी संधी!! भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज येथे थेट द्या मुलाखत

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Job Notification) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासतही जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एकूण 61 पदांसाठी मुलाखती घेतल्या जातील.

या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी अशी पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024 आहे.

संस्था – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी
पद संख्या – 61 पदे
वय मर्यादा – (Job Notification)
1. प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५५ वर्ष
2. सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५० वर्ष
3. सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष
4. वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष
5. कनिष्ट निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011
मुलाखतीची तारीख – 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्राध्यापक04 पदे
सहयोगी प्राध्यापक11 पदे
सहायक प्राध्यापक12 पदे
कनिष्ठ निवासी14 पदे
वरिष्ठ निवासी20 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMD/MS/DNB in the concerned subject
सहयोगी प्राध्यापकMD/MS/DNB in the concerned subject
सहायक प्राध्यापकMD/MS/DNB in the concerned subject (Job Notification)
कनिष्ठ निवासीMedical graduates (MBBS) from recognized / permitted medical college.
वरिष्ठ निवासीRegistered to pursue DM/Mch in concerned subject ORMD/MS/DNB qualified post graduates in concerned broad specialty.This post of senior resident is tenured position not exceeding 03 years.The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment.

मिळणारे वेतन – (Job Notification)

पदवेतन (दरमहा)
प्राध्यापकरु. १,८५,०००/-
सहयोगी प्राध्यापकरु. १,७०,०००/-
सहायक प्राध्यापकरु.१,००,०००/-
कनिष्ठ निवासीरु. ६४,५५१/-
वरिष्ठ निवासीरु. ८०,२५०/-

निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (Job Notification) उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहायचे आहे.
3. या पदांसाठी मुलाखत 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024 ला घेण्यात येणार आहे.
4. अधिक माहितीसाठी PDF वाचा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.bavmcpune.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Free AI Courses : एक रुपयाही खर्च येणार नाही, ‘हे’ फ्री AI कोर्स तुम्हाला देतील मोठ्या कमाईची संधी

Free AI Courses

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्हाला AI क्षेत्रात नशीब आजमावायचे (Free AI Courses) असेल आणि चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. हे मोफत AI अभ्यासक्रम तुम्हाला चांगली नोकरी मिळवून देऊ शकतात. यासाठी अभ्यासक्रमांची यादी पाहूया…
आज AI चा जमाना आहे, जवळपास प्रत्येक क्षेत्रात AI (Artificial intelligence) च्या मदतीने काम केले जाते. अजून काही कालावधीत हे अभ्यासक्रम पूर्णपणे लोकप्रिय होतील आणि बहुतेक काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केले जाईल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी अजून वेळ असून येत्या काळात तंत्रज्ञान कोणते वळण घेईल हे कोणालाच सांगता येणार नाही. असे असले तरी मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग सारख्या AI च्या प्रगत संकल्पनांना सध्या मागणी वाढत आहे.

असे आहेत AI चे मोफत कोर्स (Free AI Courses)
गुगल मोफत एआय कोर्स ऑफर करते. येथे प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार याची निवड करू शकता. त्याप्रमाणे त्यांचा कालावधीही बदलतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार विषयाची निवड करू शकता. Google च्या AI प्रमाणपत्रांना बाजारपेठेत खूप महत्त्व मिळते आणि त्यामुळे नोकरी मिळवणे सोपे होते.

Google चे मोफत AI अभ्यासक्रम
पुढे जी अभ्यासक्रमांची यादी दिली आहे त्यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या कोर्समध्ये सामील होण्यासाठी तुम्ही Google वर जाऊन अधिक माहीती घेवू शकता आणि कोर्स जॉइन करू शकता. पाहूया अभ्यासक्रम….
1. हाऊ गूगल डज़ मशीन लर्निंग
2. मशीन लर्निंग ऑपरेशंस (MLOps): गेटिंग स्टार्टेड
3. गेट स्टार्टेड विद टेंसरफ्लो ऑन गूगल क्लाउड
4. लैंग्वेज, स्पीच, टेक्स्ट एंड ट्रांसलेशन विद गूगल क्लाउड एपीआईज
5. बिल्ड एंड डिप्लॉय मशीन लर्निंग सॉल्यूशंस ऑन वर्टेक्स एआई
6. मशीन लर्निंग एंड आर्टिफीशियल इंटेलीजेंस.

हे कोर्स देखील करु शकता
1. इंट्रोडक्शन टू जेनरेटिव एआई
2. इंट्रोडक्शन टू लार्ज लैंग्वेज मॉडल्स
3. इंट्रोडक्शन टू रिस्पांसिबल एआई
4. जेनरेटिव एआई फंडामेंटल्स (Free AI Courses)
5. इंट्रोडक्शन टू इमेज जेनरेशन
6. इनकोडर-डिकोडर आर्किटेक्चर
7. अटेंशन मैकेनिज्म
8. ट्रांसफॉर्मर मॉडल्स एंड बीईआरटी मॉडल
9. क्रिएट इमेड कैप्शनिंद मॉडल

कसे कमवायचे पैसे
AI ची माहिती मिळाल्यानंतर अनेक प्रकारे काम करता येते. तुम्ही संबंधित पदवीसह हा AI कोर्स केल्यास, कंपन्या तुम्हाला लगेच नोकरी ऑफर करतात. याच्या मदतीने तुम्ही AI सामग्री तयार (Free AI Courses) करण्यासारख्या मार्गांनी चांगले पैसे कमवू शकता. याद्वारे तुम्ही ब्लॉग पोस्ट्स, वेबसाइट कॉपी, व्यवसायासाठी विक्री प्रत, प्रायोजित मीडिया पोस्ट इत्यादींसाठी लोकांना मदत करू शकता. तुम्ही तुमचे स्वतःचे YouTube व्हिडिओ बनवू शकता. तसे याच्या मदतीने तुम्ही वेबसाइट तयार करू शकता आणि एआय जनरेट केलेली डिजिटल व्हिज्युअल उत्पादने तयार करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला ऑडिओ एआय कंटेंट तयार करता येईल आणि ऑनलाइन कोर्सेसही तयार करता येतील.

लाखांत होईल कमाई
तुम्ही कामाला सुरवात केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात प्रति वर्ष 10 लाख रुपये आणि नंतर वर्षाला 20-30 लाख रुपये सहज कमावू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : भावांनी सांगितलं म्हणून MBBS नंतर UPSC दिली; एकाच वर्षात क्रॅक केली परीक्षा; पती-पत्नी दोघे आहेत IAS

UPSC Success Story of IAS Artika Shukla

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेच्या तयारीसाठी अर्तिका शुक्लाने (UPSC Success Story) कोणताही कोचिंग क्लास लावला नाही; तर यामध्ये तिच्या भावांनी तिला अभ्यासात पूर्ण मदत केली. 2015 मध्ये, अर्तिकाने UPSC परीक्षेत संपूर्ण देशात चौथा क्रमांक मिळवला आणि ती टॉपर ठरली. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. UPSC करण्यापूर्वी अर्तिकाने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवासाविषयी…

UPSC पास होण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी काही मोजकेच या परीक्षेत यशस्वी होतात. त्यापैकी काही उमेदवार असे असतात जे आपल्या कामगिरीतून नव्या उमेदवारांना प्रेरणा देतात. अर्तिका शुक्ला त्यापैकीच एक आहे. ती एमबीबीएस (MBBS) सारखी पदवी मिळवून नंतर आयएएस (IAS) अधिकारी झाली आहे.

वडील आहेत डॉक्टर (UPSC Success Story)
अर्तिका शुक्ला (IAS Artika Shukla) मूळची उत्तर प्रदेशातील वाराणसीची आहे. तिचे वडील डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी आहे. तिला मोठे भाऊ देखील आहेत; ज्यांनी UPSC परीक्षा पास केली आहे. अर्तिकाने आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट जॉन स्कूलमधून घेतले. ती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. शिक्षण घेत असताना तिने आपल्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर बनण्याचा विचार केला. यासाठी तिने मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवीही मिळवली.

भावांच्या करिअरचाही अर्तिकावर प्रभाव
अर्तिका शुक्लाने एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर एमडीची तयारी सुरू केली. जेव्हा तिच्या भावाने तिला UPSC ची तयारी करण्यास सांगितले तेव्हा अर्तिका अजूनही MD शिक्षण घेत होती. त्यानंतर तिने यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी तिने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. तर UPSC पास (UPSC Success Story) करण्यासाठी अभ्यासात तिला तिच्या भवांनी मार्गदर्शन केले. दोन्ही भावांच्या करिअरचाही अर्तिकावर प्रभाव होता. अर्तिकाला गौरव शुक्ला आणि उत्कर्ष शुक्ला हे दोन मोठे भाऊ आहेत. दोन्ही भावांनीही यूपीएससी परीक्षा पास केली आहे. मोठा भाऊ गौरव 2012 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला होता. उत्कर्ष हा UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर IRTS अधिकारी देखील आहे.

एका वर्षात पास केली UPSC (UPSC Success Story)
UPSC परीक्षेत 2015 मध्ये, अर्तिकाने तिच्या पहिल्याच प्रयत्नात चौथा क्रमांक मिळवला आणि तिची IAS प्रशिक्षणासाठी निवड झाली. अवघ्या एक वर्षाच्या मेहनतीने तिने UPSC पास केली आहे.

ट्रेनिंग दरम्यान प्रेम अन् नंतर विवाह
अर्तिका शुक्ला आयएएसचे प्रशिक्षण घेत होती. यादरम्यान ती आयएएस अधिकारी जसमीत सिंग संधूच्या (IAS Jasmeet Singh Sandhu) प्रेमात पडली. ते दिल्लीतील रहिवासी आहेत. जसमीत सिंह यांनी UPSC परीक्षेत 2015 मध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. प्रशिक्षणांनातर दोघांना कॅडर देण्यात आले. जसमीतला राजस्थान आणि अर्तिकाला भारतीय प्रशासकीय सेवा केंद्रशासित प्रदेश केडर मिळाले. नंतर 2017 मध्ये IAS अर्तिका आणि IAS जसमीत सिंह यांचा विवाह झाला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : ‘खेलो इंडिया’मधील पदक विजेत्यांना सरकारी नोकरी आणि बढतीत प्राधान्य मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Big News (6)

करिअरनामा ऑनलाईन । सरकार गुणवंत खेळाडूंना सेवेत (Big News) सामावून घेण्यासाठी स्पोर्ट्स कोट्यातून नोकर भरती करत असते. अशातच सरकारने आता खेळाडूंसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. ‘खेलो इंडिया’ गेम्सच्या विविध श्रेणींमध्ये पदक विजेते खेळाडू आणि तिसरे स्थान मिळवणारे खेळाडू आता केंद्र सरकारमधील स्पोर्ट्सपर्सन भरती, पदोन्नती अशा गोष्टींसाठी पात्र ठरणार आहेत.

असे आहेत सुधारित निकष
केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसह प्रोत्साहनाद्वारे गुणवंत खेळाडूंना मान्यता देण्यासाठी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सुधारित निकष जारी केले आहेत. खेलो इंडिया (Khelo India) यूथ गेम्स (18 वर्षांपेक्षा जास्त), खेलो इंडिया हिवाळी खेळ, खेलो इंडिया पॅरा गेम्स यांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पदक विजेत्यांचा समावेश करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

कोणते खेळाडू पात्र ठरणार (Big News)
1. नवीन यादीमध्ये पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.
2. ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमधील पदक विजेता, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) मधील पदक विजेता आणि निर्देशांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही खेळ किंवा खेळातील पदक विजेते यासाठी पात्र ठरू शकतात.
भारतात तळागाळात क्रीडा संस्कृती पुनरुज्जीवित करण्याच्या केंद्र सरकारच्या पुढाकाराचा भाग म्हणून खेलो इंडिया २०१८ साली पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती.

असा आहे प्राधान्यक्रम
सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्राधान्य क्रम देखील सुधारित करण्यात आला आहे. ज्यामध्ये पदक विजेते किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये तिसरे स्थान मिळविणाऱ्यांना तिसरे प्राधान्य म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे आणि खेलो इंडिया युवा खेळ, खेलो इंडिया हिवाळी खेळ किंवा खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पदक जिंकणाऱ्या किंवा तिसरे स्थान मिळवणाऱ्यांना, चौथ्या पसंतीनुसार यादीत टाकण्यात (Big News) आले आहे.
तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर ज्या उमेदवारांनी क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघाद्वारे आयोजित वरिष्ठ किंवा कनिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धेत किंवा आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. खेळाडूंनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेद्वारे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी संधी!! BEL अंतर्गत विविध पदावर भरती सुरु

BEL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बीईएल अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (BEL Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता-I, प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जातील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे.

संस्था – भारत एलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. प्रकल्प अभियंता-I – Project Engineer
2. प्रशिक्षणार्थी अभियंता- Trainee Engineer
पद संख्या – 21 पदे (BEL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (HR/NS-S&CS), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलहल्ली पोस्ट, बेंगळुरू – 560 013
वय मर्यादा –
1. प्रकल्प अभियंता-I – 32 वर्षे (BEL Recruitment 2024)
2. प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 28 वर्षे

भरतीचा तपशील – (BEL Recruitment 2024)

पदपद संख्या 
प्रकल्प अभियंता-I10 पदे
प्रशिक्षणार्थी अभियंता-I11 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता-I4 years full time BE/ B Tech in the discipline of Electronics Engineering/ Electronics & Telecommunication Engineering/ Electronics & Communication Engineering/ Electronics and Instrumentation/ Electrical and Electronics Engineering
प्रशिक्षणार्थी अभियंता-I4 years full time BE/ B Tech in the discipline of Electronics Engineering/ Electronics & Telecommunication Engineering/ Electronics & Communication Engineering/ Electronics and Instrumentation/ Electrical and Electronics Engineering

मिळणारे वेतन –

पदवेतन
प्रकल्प अभियंता-I1st year – Rs. 40,000/-2nd year – Rs.45,000/-3rd year – Rs.50,000/-4th year – Rs. 55,000/-(If extended)
प्रशिक्षणार्थी अभियंता-I1st year – Rs. 30,000/-2nd year – Rs.35,000/-3rd year – Rs.40,000/-(If extended)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kolhapur Nagri Bank Recruitment 2024 : कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत नोकरीची मोठी संधी; पात्रता ग्रॅज्युएट

Kolhapur Nagri Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर जिल्हा नागरी बँक (Kolhapur Nagri Bank Recruitment 2024) सहकारी असोसिएशन लि, कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, आयटी लिपिक पदांच्या एकूण 02 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

संस्था – कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर
भरले जाणारे पद – आयटी अधिकारी, आयटी लिपिक
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
वय मर्यादा –
1. आयटी अधिकारी – ४५ वर्षे
2. आयटी लिपिक – ३५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Kolhapur Nagri Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; १४५८ / बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ०१२
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Kolhapur Nagri Bank Recruitment 2024)
1. आयटी अधिकारी – B.E./B.Tech/M.E./M.Tech in Computer Science MCA/MCS with minimum 60% marks or equivalent grade with First Class
2. आयटी लिपिक – Passed Degree or Diploma course in Computer Science from a recognized institute

मिळणारे वेतन –
1. आयटी अधिकारी – रु. २०,०००/- ते ३०,०००/- दरमहा
2. आयटी लिपिक – रु. १२,०००/- ते १५,०००/- दरमहा
असा करा अर्ज – (Kolhapur Nagri Bank Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://kopbankasso.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC CPO Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत तब्बल 4187 पदांवर भरती जाहीर; 1,12,400 एवढा पगार

SSC CPO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC CPO Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तब्बल 4187 पदासाठी ही भरती असणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.

देशातील तरुण नेहमीच सरकारी नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असतात. अशातच कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेली ही भरती पर्वणीच समजावी लागेल. पदवीधारक उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होवू शकतात. त्यामुळे ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे; अशा उमेदवारांनी विलंब न करता अर्ज करायचा आहे. सविस्तर जाणून घेवूया रिक्त पदे, अर्ज फी, पात्रता आणि वेतनाविषयी….

संस्था – कर्मचारी निवड आयोग (SSC CPO Recruitment 2024)
भरले जाणारे पद – दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक
पद संख्या – 4187 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2024
वय मर्यादा – 20 ते 25 वर्षे

अर्ज फी –
General and Other Backward Class: RS.100/-
Women, SC/ST, and Ex-Servicemen: Nil
अशी आहे निवड प्रक्रिया –
पेपर-1
पीईटी/पीएसटी
पेपर-2

भरतीचा तपशील – (SSC CPO Recruitment 2024)

पदपद संख्या 
दिल्ली पोलिस186
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक4001

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
दिल्ली पोलिसBachelor’s degree from a recognized university or equivalent
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षकBachelor’s degree from a recognized university or equivalent.

मिळणारे वेतन –
1. दिल्ली पोलिस – Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-)
2. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (SSC CPO Recruitment 2024) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (SSC CPO Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Prasar Bharati Recruitment 2024 : प्रसार भारतीमध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी; इथे आहे अर्जाची लिंक

Prasar Bharati Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । प्रसार भारती अंतर्गत विविध रिक्त (Prasar Bharati Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून खर्च प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. CMA Intermediate परीक्षा पास झालेले उमेदवार या भरती प्रक्रियेत पात्र ठरू शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कोणताही विलंब न करता भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे.

संस्था – प्रसार भारती
भरले जाणारे पद – खर्च प्रशिक्षणार्थी (Cost Trainee)
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Prasar Bharati Recruitment 2024)
Candidate Should have passed CMA Intermediate Examination conducted by Institute of Cost Accountants of India (ICAI) with at least 50% marks
मिळणारे वेतन –
1st Year of training – Rs.10,000/-
2nd Year of training – Rs.12,500/-
3rd Year of training – Rs.15,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या (Prasar Bharati Recruitment 2024) सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्ज भरताना सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ‘या’ महापालिकेत परीक्षा न देता थेट भरतीची संधी; उद्या होणार मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान
भरली जाणारी पदे – चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ
पद संख्या – 57 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 07 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
चिकित्सक09
स्त्रीरोगतज्ज्ञ07
बालरोगतज्ञ09
नेत्ररोगतज्ज्ञ05
त्वचारोगतज्ञ09
मानसोपचारतज्ज्ञ09
कान नाक घसा विशेषज्ञ09

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
चिकित्सकMD Medicine, DNB
स्त्रीरोगतज्ज्ञMD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
नेत्ररोगतज्ज्ञMS Ophthalmologist/DOMS
त्वचारोगतज्ञMD(Skin/VD)DVD,DNB
मानसोपचारतज्ज्ञMS Psychiatrist / DPM/DNB
कान नाक घसा विशेषज्ञMS ENT/DORL/DNB

मिळणारे वेतन –

पदवेतन
चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञRate Fixed by Govt : Per Visit @2000/- (fixed amount)Cheking Charges @100/- per patient (maximum amount Rs.5000/- visit)

अशी होईल निवड –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
3. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे. (Job Alert)
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com