Home Blog Page 113

Indian Postal Department Recruitment 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी टपाल विभागात नोकरीची मोठी संधी

Indian Postal Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास तरुणांसाठी (Indian Postal Department Recruitment 2024) टपाल विभागात नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत ‘स्टाफ कार ड्रायव्हर्स'(सामान्य श्रेणी) पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवस आहे.

संस्था – टपाल विभाग, भारत सरकार
भरले जाणारे पद – स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)
पद संख्या – 19 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Indian Postal Department Recruitment 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा-800001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवस

वय मर्यादा – 56 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Passed 10th standard from a recognized Board or Institute
मिळणारे वेतन – Pay Matrix Level 01 as per 7th CPC

असा करा अर्ज – (Indian Postal Department Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : 8 वर्षाच्या दीर्घ मेहनतीचे फळ मिळाले; सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा UPSC तून झाला अधिकारी

UPSC Success Story of Prashant Bhojane

करिअरनामा ऑनलाईन । प्रशांत सुरेश भोजने हा 32 वर्षीय (UPSC Success Story) तरुण. याने UPSC 2023 परीक्षेत विशेष कामगिरी केली आहे. प्रशांतची आई महाराष्ट्रातील ठाणे येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. प्रशांतसाठी, संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास करणे हे नेहमीच स्वप्न होते आणि शेवटी हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने सर्व अडचणींना तोंड दिले. काही दिवसापूर्वी जाहीर झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) 2023 च्या अंतिम निकालात प्रशांतने संपूर्ण भारतातून 849 वा क्रमांक मिळवत ही परीक्षा पास केली आहे.

8 वर्षापासून करत होता तयारी
प्रशांतने 2015 मध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास (UPSC Success Story) सुरू केला. जेव्हा तो पहिल्यांदा परीक्षेला बसला तेव्हा त्याला अपयशाचा सामना करावा लागला. त्याला या परीक्षेत 8 वेळा अपयश आले; मात्र नवव्या प्रयत्नात तो पास झाला. त्याच्या या कामगिरीमुळे खार्तन रोड स्वीपर्स कॉलनीतील लोक आनंदाने भारावून गेले आहेत.

आई आहे सफाई कर्मचारी (UPSC Success Story)
प्रशांतची आई ठाणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते, तर त्याचे वडील नागरी संस्थेत 4 थ्या श्रेणीचे कर्मचारी आहेत. प्रशांतने अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली आहे परंतु आयएएस (IAS) अधिकारी बनण्याचे त्याचे नेहमीच स्वप्न असल्याने इतर कोणत्याही क्षेत्रात काम करण्यास त्याला रस वाटत नव्हता. प्रशांतने सांगितले की; UPSC परीक्षा देताना त्याने 2020 मध्ये दिल्लीतील स्पर्धात्मक परीक्षा कोचिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली, जिथे त्याला विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट तपासण्याचे काम देण्यात आले होते.

शिक्षण घेताना पैसे कमवायला केली सुरुवात
प्रशांत अभ्यास करण्याबरोबरच नोकरी करत होता. त्याचे (UPSC Success Story) पालक त्याला परीक्षा देण्याचे थांबवून घरी परत जाण्यास सांगत होते. पण त्याला विश्वास होता की तो एक दिवस आपले ध्येय साध्य करेल. प्रशांत म्हणाला, “जेव्हा मी UPSC परीक्षेला बसलो होतो, तेव्हा माझ्या पालकांनी शांतपणे त्रास सहन केला होता, पण आता त्यांच्या त्रासाची भरपाई झाली आहे.” आपला मुलगा यूपीएससी (UPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे पाहून त्यांना खूप आनंद होत आहे; असे प्रशांतचे वडील सुरेश भोजने यांनी सांगितले.

मुलाने घेतलेला निर्णय योग्यच ठरला
प्रशांतचे वडील म्हणतात, “पूर्वी मला माझ्या मुलाने नोकरी करावी असं वाटत होतं, पण आता आम्हाला वाटते की त्याने घेतलेला निर्णय अगदी योग्य होता.” अनेक महापालिका संस्थांमधील कामगार (UPSC Success Story) संघटनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘श्रमिक जनता संघ’चे सरचिटणीस जगदीश कैरालिया म्हणाले की, “प्रशांतची यशोगाथा परिसरातील प्रत्येक घरात साजरी झाली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कमी लेखू नये कारण त्यांच्या मुलांमध्येही प्रतिभा आहे; आणि या मुलाने ते सिद्ध करून दाखवले आहे; याचा आम्हाला सरठ अभिमान वाटतो. कॉलनीतील अबालवृध्दांसाठी प्रशांत आदर्श ठरला आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Interview Tips : मुलाखत देताना ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल जमान्यात तुम्हाला नोकरीसाठी (Interview Tips) मुलाखत ऑनलाईन द्यायची असो किंवा ऑफलाईन, तुम्हाला यासाठी आधीपासून जोरदार तयारी करायला हवी. जर तुम्हीही नोकरी शोधताय आणि मुलाखतीची तयारी करत आहात तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आपण जाणून घेवूया नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…

1. CVध्ये संपूर्ण माहिती देणे महत्त्वाचे आहे
मुलाखत देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सीव्हीमध्ये (Curriculum Vitae) चुका करु नका. CV मध्ये अशी माहिती लिहू नका ज्यामुळे तुमची मुलाखतीत निवड होऊ शकत नाही. म्हणून तुमच्या बायोडाटामध्ये नेहमी स्वतःविषयी योग्य माहिती लिहा.

2. तुमच्या CV ची एक प्रत तुमच्याकडे ठेवा
जर तुम्ही ऑनलाईन मुलाखत देत असाल तर तुम्ही मुलाखतीदरम्यान क्षणभरही स्क्रीन सोडू शकत नाही. मुलाखत घेणारा व्यक्ती सहसा उमेदवाराच्या CVमधून प्रश्न विचारतो, म्हणून तुम्ही स्वतः जवळ CV ची एक प्रत ठेवायलाच हवी.

3. स्वतःवर ठेवा पूर्ण विश्वास (Interview Tips)
तुम्ही नेहमी तुमच्याबद्दल एक छोटा आणि स्पष्ट परिचय द्या आणि HRने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने द्या. मुलाखत देताना अजिबात घाबरू नका. कमी शब्दात पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मुलाखत पॅनेल नेहमीच तुमच्या आत्मविश्वासाचे काळजीपूर्वक मूल्यांकन करते.

4. अशी द्या प्रत्यक्ष मुलाखत
जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जाता तेव्हा मुलाखतीच्या खोलीत प्रवेश करताना तुमच्यात आत्मविश्वास भरलेला असला पाहिजे. घाबरून न जाता तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की (Interview Tips) मुलाखत घेणारी व्यक्ती देखील तुमच्यापैकीच एक आहे, फक्त तुमच्या ज्ञानाची पातळी त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुम्हाला तुमची ज्ञानाची पातळी वापरून पॅनेल वरील व्यक्तीला प्रभावित करायचे आहे.

5. ऑनलाइन मुलाखत देताना योग्य जागा निवडा
ऑनलाइन मुलाखतीला उपस्थित राहताना योग्य ठिकाण निवडणे हा घटक सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. यासाठी तुम्ही शांत वातावरण निवडणे महत्वाचे आहे. व्हिडिओ कॉल सुरू असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये. व्हिडिओ कॉलसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी अधिक चांगली असावी. उत्तम प्रकाशासह व्यावसायिकदृष्ट्या योग्य खोली निवडा.

6. प्रश्न आणि उत्तरांची पूर्व तयारी करा
ऑनलाइन मुलाखतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू करा. वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी करा, पण उत्तरांमध्ये गोंधळ घालू नका. तुम्ही स्वत:ला कुठे पाहता? तुमचे छंद काय आहेत? आम्ही (Interview Tips) तुम्हाला का नियुक्त करावे? किंवा तुम्ही अर्ज केलेल्या भूमिकेशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार रहा.

7. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका (Interview Tips)
मुलाखत ऑनलाईन असो की ऑफलाईन.. मुलाखत देताना औपचारिक कपडे परिधान करा, तुमच्या देहबोलीवर लक्ष ठेवा आणि मुलाखतीदरम्यान समोरच्या व्यक्तीशी आय कॉनटॅक्ट चांगला ठेवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : B.Tech in Computer Science केल्यानंतर ‘हे’ आहेत करिअरचे सर्वोत्तम पर्याय; पॅकेज मिळेल लाखात

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये B.Tech in Computer Science (CS) चा ट्रेंड (Career Mantra) झपाट्याने वाढत आहे. B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याची आणि त्यांच्या पालकांची पहिली पसंती असते ती B.Tech in Computer Science करण्यासाठी. कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केल्यानंतर इथे इतर शाखांपेक्षा उत्तम करिअरचे पर्याय उपलब्ध असतात.

CS मध्ये B.Tech हा 12 वी नंतरचा लोकप्रिय कोर्स मानला जातो. जे विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech करत आहेत किंवा B.Tech करण्याचा विचार करत आहेत ते विद्यार्थी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट यासह इतर पदांवर काम करू शकतात.

कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केल्यानंतर, तुम्हाला चांगल्या (Career Mantra) पगाराच्या पॅकेजसह नोकरी मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तुम्ही जर कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक करत असाल किंवा करू इच्छित असाल तर तुम्हाला विविध नोकऱ्यांच्या संधी आहेत. यापैकी काहींची माहिती तुम्ही येथून तपासू शकता.

सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) (Career Mantra)
बी.टेक. केल्यानंतर करिअरचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग. यामध्ये नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, ॲप्लिकेशन विकसित करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे आणि त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग करणे असे काम केले जाते. यासोबतच, सॉफ्टवेअरमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे कोडिंग, चाचणी आणि काळजी घेणे या गोष्टींचा देखील समावेश आहे. विविध सॉफ्टवेअर कंपन्या आणि आयटी सल्लागारांसह विविध ठिकाणी सॉफ्टवेअर अभियंत्यांची मागणी कायम आहे. कोर्स संपताच या कंपन्या तुम्हाला लाखोंच्या पॅकेजवर नोकरी देतात.

डेटा वैज्ञानिक (Data Scientist)
सध्या आपल्या देशात, बँकिंग, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स आणि इतर (Career Mantra) ठिकाणी डेटा सायंटिस्टची प्रचंड मागणी आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केल्यानंतर तुम्ही या क्षेत्रातही करिअर करू शकता. डेटा सायंटिस्ट पदासाठी तुमचा प्रारंभिक पगार प्रति वर्ष 5 ते 6 लाख रुपये असू शकतो.

वेब डेव्हलपर (Web Developer)
कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केल्यानंतर तुम्ही वेब डेव्हलपरही बनू शकता. वेब डेव्हलपरचे काम वेबसाइट तयार करणे आणि त्याची देखभाल करणे आहे. वेबसाइटवर काही समस्या असल्यास, त्याचे निराकरण करणे आणि वेबसाईट अधिक चांगली सुरळीत करणे हे वेब डेव्हलपरचे काम आहे. आपल्या देशात वेब डेव्हलपरचा पगार वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत असतो.

या सर्वांशिवाय, संगणक विज्ञान विषयात बी.टेक करणारे (Career Mantra) उमेदवार संगणक नेटवर्क अभियंता, सायबर सुरक्षा तज्ञ, संगणक विज्ञान ब्लॉगर, ब्लॉकचेन विकसक, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ, आयटी सल्लागार, गेम डेव्हलपर इत्यादी पदांवर सहजपणे नोकरी मिळवू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यातच वार्षिक ५ लाख रुपये वार्षिक पगार सहज मिळू शकतो. वेळ आणि अनुभवानुसार पगार सतत वाढत जातो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेत करण्यात आले ‘हे’ बदल; जाणून घ्या…

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेबाबत एक महत्वाची (UGC NET 2024) बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आपल्या X हँडल वरून याबाबत माहिती दिली आहे. दि. 20 एप्रिलपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यूजीसी नेट परीक्षा जून 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ugcnet.nta.ac.in वर भेट देऊन अर्ज करायचा आहे.

परीक्षे संदर्भात करण्यात आले ‘हे’ बदल (UGC NET 2024)
महत्वाचे म्हणजे यावर्षीपासून परीक्षेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे उमेदवार 4 वर्षाच्या किंवा 8 सेमिस्टरच्या बॅचलर डिग्री प्रोग्रामच्या अंतिम सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील UGC NET जून 2024 सत्रासाठी अर्ज करू शकतात. आता उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विषयात पीएचडी करता येणार आहे. त्यांनी कोणत्या अभ्यासक्रमातून पदवी घेतली आहे, हे महत्त्वाचे ठरणार नाही. UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार म्हणाले; “4 वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्राम करत असलेले विद्यार्थी त्यांना ज्या विषयात 4 वर्षांची बॅचलर पदवी मिळाली आहे, त्या विषयात पीएचडी करू शकतात.”
याशिवाय उमेदवार परीक्षेशी संबंधित अपडेट्ससाठी NTA च्या https://exams.nta.ac.in/ या नवीन वेबसाइटलाही भेट देऊ शकतात; अशी माहिती जगदीश कुमार यांनी दिली आहे.

पूर्वीचा नियम काय होता?
यापूर्वी UGC NET साठी पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य होते.
उमेदवार त्याच विषयात पीएचडी करू (UGC NET 2024) शकतात ज्यामध्ये त्यांनी 2 वर्षांची पीजी पदवी केली आहे. मात्र नियमात दुरुस्ती केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. त्यांना आता पदव्युत्तर पदवीची गरज भासणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CET Exam 2024 : B.BCA/BBA/BMS/BBM प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Exam 2024) चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता बीसीए/बीबीए/बीएमएस/बी. बीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा’ प्रथमच महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी येत्या 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या तारखेला होणार परीक्षा (CET Exam 2024)
सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेशासाठी महा- बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ या सामाईक प्रवेशमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता (CET Exam 2024) ज्या उमेदवारांना एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमाना प्रवेश घ्यावयाचे आहेत, अशा उमेदवारांकरीता महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. याची सर्व संबंधित उमेदवार/पालक/संस्थांनी नोंद घ्यावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ आणि एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड ही सामाईक प्रवेश परीक्षा येत्या 27 ते 29 मे दारम्यान घेतली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत!! आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल येथे 90 पदांवर भरती सुरू

Job Alert (7)

करिअरनामा ऑनलाईन । आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, प्रशासकीय व्यवस्थापक, शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22, 23, 27 आणि 28 एप्रिल 2024 आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर….

संस्था – आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल
भरली जाणारी पदे –
1. प्राचार्य (Job Alert)
2. प्रशासकीय व्यवस्थापक
3. शिक्षक कर्मचारी
4. शिक्षकेतर कर्मचारी
पद संख्या – 90 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 22, 23, 27 आणि 28 एप्रिल 2024

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदाचे नावपद संख्या 
प्राचार्य 02
प्रशासकीय व्यवस्थापक 01
शिक्षक कर्मचारी41
शिक्षकेतर कर्मचारी46

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राचार्यΜ.Α./M.Sc.B.Ed
प्रशासकीय व्यवस्थापकGraduate with MBA/MPM
शिक्षक कर्मचारीTET किंवा CET उत्तीर्ण पदवी, पदव्युत्तर पदवी, ECCED,B.A./Μ.Α./ B.Sc./M.Sc. B.Ed./ M.Ed., B.P.Ed., M.P.Ed. B.S.W./M.S.W., Α.Ν.Μ./G.Ν.Μ.
शिक्षकेतर कर्मचारी८ वी ते १२ वी, पदवीधर/पदव्युत्तर

निवड प्रक्रिया –
1. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. उमेदवार दिलेल्या तारखेला (Job Alert) मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. इच्छुक उमेदवारांची मुलाखत 22, 23, 27 आणि 28 एप्रिल 2024 या तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://atmamalik.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Naval Dockyard Recruitment 2024 : 8 वी/10 वी/ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Naval Dockyard Recruitment 2024) तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे; असे आवाहन करण्यात आले आहे.

खास बाब म्हणजे 8 वी, 10 वी पास तसेच ITI पास उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. या भरतीत पात्र ठरलेले उमेदवार डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे नोकरी करु शकतात. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

संस्था – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 301 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील – (Naval Dockyard Recruitment 2024)

Vacancy Details
Trade Apprentice
Trade NameTotal
Fitter50
Mason (BC)08
I&CTSM03
Electrician40
Electronics Mechanic26
Electroplater01
Foundry Man01
Mechanic (Diesel)35
Instrument Mechanic07
MMTM13

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस1. Rigger Posts: 8th passed2. Forger and Heat Treater Posts: 10th Pass3. All Others Posts: (i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade with 65% marks

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
3. उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Naval Dockyard Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. इतर कोणत्याही मार्गाने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://indiannavy.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RBI Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांना RBI अंतर्गत नोकरीची मोठी संधी; लगेच करा APPLY

RBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत (RBI Recruitment 2024) वैद्यकीय सल्लागार पदावर भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

संस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – वैद्यकीय सल्लागार
पद संख्या – 01 पद (RBI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुख्य कार्यालयाची इमारत दवाखाना, 6, संसद मार्ग, नवी दिल्ली -110001

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RBI Recruitment 2024)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय सल्लागार1. Applicant should possess MBBS degree of any University recognized by the Medical Council of India in the Allopathic system of medicine
2. Applicants having Post Graduate Degree in General Medicine can also apply for this post

मिळणारे वेतन –

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय सल्लागार₹1000/- per hour

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (RBI Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचा आहे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rbi.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ASRB Recruitment 2024 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात ‘या’ पदावर नोकरी; दरमहा 56,100 रुपये पगार

ASRB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत (ASRB Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे. जणून घेवूया भरती विषयी सविस्तर…

संस्था – कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ
भरले जाणारे पद – सहाय्यक संचालक
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त (ASRB Recruitment 2024) विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये समकक्ष शिक्षण घेतले असावे.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे असावे.
सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट देण्यात आली आहे.
परीक्षा फी – (ASRB Recruitment 2024)
1. जनरल/ओबीसी/1000/- रुपये
2. Women/SC/ST/PwBD/Trangender – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 56,100/- ते 1,77,500/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.asrb.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com