Career Mantra : B.Tech in Computer Science केल्यानंतर ‘हे’ आहेत करिअरचे सर्वोत्तम पर्याय; पॅकेज मिळेल लाखात

करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये B.Tech in Computer Science (CS) चा ट्रेंड (Career Mantra) झपाट्याने वाढत आहे. B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याची आणि त्यांच्या पालकांची पहिली पसंती असते ती B.Tech in Computer Science करण्यासाठी. कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केल्यानंतर इथे इतर शाखांपेक्षा उत्तम करिअरचे पर्याय उपलब्ध असतात.

CS मध्ये B.Tech हा 12 वी नंतरचा लोकप्रिय कोर्स मानला जातो. जे विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech करत आहेत किंवा B.Tech करण्याचा विचार करत आहेत ते विद्यार्थी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट यासह इतर पदांवर काम करू शकतात.

कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केल्यानंतर, तुम्हाला चांगल्या (Career Mantra) पगाराच्या पॅकेजसह नोकरी मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तुम्ही जर कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक करत असाल किंवा करू इच्छित असाल तर तुम्हाला विविध नोकऱ्यांच्या संधी आहेत. यापैकी काहींची माहिती तुम्ही येथून तपासू शकता.

सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) (Career Mantra)
बी.टेक. केल्यानंतर करिअरचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग. यामध्ये नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, ॲप्लिकेशन विकसित करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे आणि त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग करणे असे काम केले जाते. यासोबतच, सॉफ्टवेअरमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे कोडिंग, चाचणी आणि काळजी घेणे या गोष्टींचा देखील समावेश आहे. विविध सॉफ्टवेअर कंपन्या आणि आयटी सल्लागारांसह विविध ठिकाणी सॉफ्टवेअर अभियंत्यांची मागणी कायम आहे. कोर्स संपताच या कंपन्या तुम्हाला लाखोंच्या पॅकेजवर नोकरी देतात.

डेटा वैज्ञानिक (Data Scientist)
सध्या आपल्या देशात, बँकिंग, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स आणि इतर (Career Mantra) ठिकाणी डेटा सायंटिस्टची प्रचंड मागणी आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केल्यानंतर तुम्ही या क्षेत्रातही करिअर करू शकता. डेटा सायंटिस्ट पदासाठी तुमचा प्रारंभिक पगार प्रति वर्ष 5 ते 6 लाख रुपये असू शकतो.

वेब डेव्हलपर (Web Developer)
कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केल्यानंतर तुम्ही वेब डेव्हलपरही बनू शकता. वेब डेव्हलपरचे काम वेबसाइट तयार करणे आणि त्याची देखभाल करणे आहे. वेबसाइटवर काही समस्या असल्यास, त्याचे निराकरण करणे आणि वेबसाईट अधिक चांगली सुरळीत करणे हे वेब डेव्हलपरचे काम आहे. आपल्या देशात वेब डेव्हलपरचा पगार वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत असतो.

या सर्वांशिवाय, संगणक विज्ञान विषयात बी.टेक करणारे (Career Mantra) उमेदवार संगणक नेटवर्क अभियंता, सायबर सुरक्षा तज्ञ, संगणक विज्ञान ब्लॉगर, ब्लॉकचेन विकसक, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ, आयटी सल्लागार, गेम डेव्हलपर इत्यादी पदांवर सहजपणे नोकरी मिळवू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यातच वार्षिक ५ लाख रुपये वार्षिक पगार सहज मिळू शकतो. वेळ आणि अनुभवानुसार पगार सतत वाढत जातो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com