Home Blog Page 112

Big News : खुषखबर!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 10वी-12वीची परीक्षा फी माफी; करावा लागणार अर्ज

Big News

करिअरनामा ऑनलाईन | निसर्गाने साथ न दिल्याने यावर्षी (Big News) राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळसदृश्य महसूल मंडळातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेची फी भरली होती ती परीक्षा फी त्या विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे. आतापर्यंत त्यासाठी पाच ते सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन्ही वर्गातील 5 लाख 75 हजार 559 विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले होते यासाठी साधारणपणे 28 कोटी रुपये लागणार असल्याचा अंदाज आहे.

विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी मिळणार मुदतवाढ
यावर्षी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ झाला आहे, तर 158 तालुक्यांमध्ये 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्या परिसरातील (Big News) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फी माफीसाठी पात्र असलेल्या माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयांनी बोर्डाला ऑनलाईन माहिती पाठवायची आहे. बोर्डाकडून त्यासाठी वारंवार माहिती देखील येत आहे. या वेळा आधी पाच ते सहा वेळा मुदत वाढ दिलेली आहे, तरी अजून सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती बोर्डाकडे दिलेली नाही. त्यामुळे बोर्ड अजून काही दिवसांची मुदतवाढ देणार आहे.

निधीसाठी शासनास पत्र (Big News)
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा फी भरली होती. त्यांना ही परीक्षा फी परत मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत 8 कोटी 90 लाख रुपयांचा निधी बोर्डाकडे प्राप्त झालेला आहे. परंतु परीक्षा शुल्क माफीसाठी 28 कोटी रुपये लागणार आहेत.

3 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त (Big News)
आतापर्यंत 10 वी च्या 3 लाख 37 हजार 44 विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला प्राप्त झाली आहे. तर इयत्ता बारावीतील 2 लाख 38 हजार 515 विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला मिळाली नाही. तसेच विद्यापीठासह उच्च महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफीचा देखील लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी माहिती विद्यापीठ आणि उच्च महाविद्यालयाने सादर केली आहे. परंतु अजूनही विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळाला नाही.

परीक्षा शुल्क माफीसाठी प्राप्त झालेले अर्ज
1. इयत्ता 10 वी – 3,37,044 विद्यार्थी
2. इयत्ता 12 वी – 2,38,515 विद्यार्थी
एकूण – 5,75,559 विद्यार्थी
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : बापरे!! 25 हजार शिक्षकांना घरी बसावे लागणार; व्याजासह पगार वसूल होणार; न्यायालयाचा आदेश

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून (Big News) लाच दिलेल्या तब्बल 25 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 2016 मध्ये पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती प्रकरणी उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे, ज्यामध्ये या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी नियुक्त झालेल्या शिक्षकांकडून व्याजासह वेतन वसूल करण्यात यावे; असे या आदेशात म्हटले आहे. यासाठी न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

शिक्षक भरतीमध्ये पैशांचा खेळ (Big News)
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर 25 हजारांहून अधिक सरकारी शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 2016 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने सुमारे 2 हजार 750 पदांवर शिक्षकांची भरती जाहीर केली होती. शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ झाल्याचा आरोप केला जात आहे. या भरतीसाठी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची लाच घेण्यात आली होती. त्यानंतर त्याला ‘शिक्षक भरती घोटाळा’ असे नाव देण्यात आले. या प्रकरणी (Big News) पश्चिम बंगाल हायकोर्टात रिट दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने या सर्व नोकऱ्या रद्द करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशाचा परिणाम 25 हजार 750 शिक्षकांच्या नोकऱ्यांवर होणार आहे. न्यायमूर्ती देबांशू बसाक आणि न्यायमूर्ती मोहम्मद सब्बीर रशीद यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करताना असे सांगितले आहे; “शिक्षक भरती घोटाळ्यातून जे लोक दीर्घकाळापासून बेकायदेशीरपणे काम करत आहेत त्यांना आता त्यांचे वेतन व्याजासह परत करावे लागणार आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Update : आता पी. एच.डी.ला थेट प्रवेश मिळणार; पदवीधारकांना मिळवावे लागणार ‘एवढे’ मार्क

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन । जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवीपूर्व (UGC Update) अभ्यासक्रम करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला (Ph. D) प्रवेश घेऊ शकणार आहेत. शिवाय हे विद्यार्थी यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहेत. मात्र यासाठी त्यांना आता पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज भासणार नाही; अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार यांनी दिली आहे.

मात्र विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने यामध्ये एक अट ठेवली आहे. पीएचडीच्या प्रवेशासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना आता चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी मिळवावी लागणार आहे. ही प्रणाली या वर्षीपासून लागू केली जाईल; अशी माहिती UGC अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आपल्या X अकौंटवरून दिली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत सुरू करण्यात (UGC Update) आलेल्या चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी UGCने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. SC, ST, OBC (नॉन-क्रिमी लेयर), अपंग आणि EWS विद्यार्थ्यांना देखील पीएचडी प्रवेशामध्ये पाच टक्के किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीची सूट मिळेल. यामुळे चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आता थेट UGC NET साठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये, चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतील.

विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा (UGC Update)
दरम्यान, चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. UGC NET साठी, त्यांना विषयाच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आता विद्यार्थी कोणताही विषय निवडू शकणार आहे. यापुढे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले विषय निवडणे बंधनकारक असणार नाही. मात्र, पीएचडी साठी अर्ज करतानाच त्यांना त्यासाठीचे विषय ठरवावे लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : मुलीसाठी वडिलांनी जमीन विकली; शेतकऱ्याची पोर मर्चंट नेव्हीमध्ये बनली ‘डेक ऑफिसर’

Career Success Story of Simran Thorat

करिअरनामा ऑनलाईन । इंदापूरची सिमरन थोरात ही तरुणी… हिचा प्रेरणादायी (Career Success Story) प्रवास ऐकल्यावर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते; याची प्रचिती येते. समाजामध्ये असे अनेक ध्येयवेडे तरुण आहेत जे स्वतः बरोबर आई-वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही तडजोड करु शकतात. यापैकीच एक आहे सिमरन थोरात (Simran Thorat Deck Officer). तिच्या आई-वडीलांनी अपार कष्ट करुन तिला शिकवले. तिने देखील रात्रीचा दिवस करून आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज केलं आणि तिने पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्याचा बहुमान पटकावला.

लहानपणीच ठरवलं होतं
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सिमरन… लहानपणीच तिने समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचे स्वप्न पाहिले आणि मोठेपणी ते पुर्णही केले. मात्र हा प्रवास (Career Success Story) तिच्यासाठी सोपा नव्हता. मर्चंट नेव्हीमध्ये स्थान मिळवायचे आणि तेही एका महिलेने ही गोष्ट नक्कीच आव्हानात्मक आहे. तरीही ती हरली नाही. असंख्य अडचणींवर मात करत तिने आपली वाटचाल ध्येयापर्यंत पोहचवली.

आई-वडिलांनी शेती विकण्याचा निर्णय घेतला (Career Success Story)
सिमरनच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती. मर्चंट नेव्हीतील शिक्षणासाठी भरपूर पैसा लागतो. मर्चंट नेव्हीमध्ये सामील होण्यासाठी तीन वर्षाचा कोर्स करावा लागतो. या कोर्सची फी 9 लाखाच्या पुढे आहे. यासोबत इतर खर्च आहेतच. सिमरनचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. वडिलांनी मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होती नव्हती तेवढी शेती विकून टाकली. त्याानंतर आईने एका फॅक्टरीत तर वडिलानी इलेक्ट्रशियनचे काम करत कुटुंबाचा खर्च चालवला. मुलीला लागेल तेव्हा, लागेल तेवढा पैसा पुरवला. तिने देखील या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून ‘पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर’ होण्याचा मान मिळवला.

शिक्षणामध्ये भाषेचा अडसर
आपल्या प्रवासा बद्दल बोलताना सिमरन सांगते की; शिक्षणामध्ये (Career Success Story) येणारे आर्थिक अडथळे आई वडिलांच्या कृपेने दूर झाले. मात्र प्रत्यक्ष शिक्षण घेत असताना काही भाषेशी संबंधित अडचणी आल्या. माझं प्राथमिक शिक्षण केवळ मराठी माध्यम आणि त्यानंतर सेमी इंग्रजीत झालं आहे. मर्चंट नेव्हीचा संपूर्ण इंग्रजी भाषेत असलेला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे हे माझ्यासाठी आव्हानच होते. तरीही मी कठोर मेहनत करुन हा कोर्स पूर्ण केला.”

तासनतास इंग्रजी बोलण्याचा सराव केला (Career Success Story)
कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवताना तिच्या समोर आव्हाने उभी होती. या आव्हानांपासून ती लांब पळाली नाही. ती सांगते; “मी माझ्या बॅचमधील इतर मुलींप्रमाणेच गुणवत्ताधारक विद्यार्थीनी होते. पण सुरुवातीच्या प्लेसमेंट फेरीत मला नाकारण्यात आले. माझे इंग्रजी अस्खलित नसल्यामुळे मला एका मोठ्या शिपिंग कंपनीतील नोकरी नाकारली गेली. मी निराश झाले, पण त्यातूनही स्वतःला सावरत आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला. मी भावाशी फोनवर इंग्रजीत बोलू लागले. आरशासमोर उभी राहून तासनतास इंग्रजी बोलण्याचा सराव केला. अखेरच्या वर्षात सीस्पॅन कंपनी जेव्हा प्लेसमेंटसाठी आली, तेव्हा त्यांनी माझी महिला डेक कॅडेट म्हणून निवड केली. याआधी सीस्पॅन कंपनीत एकाही महिलेने काम केलेले नाही; तिथे माझी निवड झाली.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RPF Recruitment 2024 : RPF अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’च्या 4660 पदांवर भरती; कसा कराल अर्ज? अकाउंट कसे उघडायचे?

RPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेने आरपीएफ अंतर्गत (RPF Recruitment 2024) कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 4660 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना अडचणी येतात; यावर उपाय काढत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या भरतीसाठी उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQ) यादी जारी केली आहे; याविषयी माहिती घेवूया.

यामध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात का? त्यांच्यासाठी पात्रता, निकष, फॉर्म कसा भरायचा, ऑफलाइन किंवा ऑनलाइन फॉर्म भरताना कोणत्या कागदपत्रांची गरज असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रेल्वे मंत्रालयाने दिली आहेत.

1. कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख?
उत्तर – रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पदासाठी अर्ज प्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ मे असणार आहे. (RPF Recruitment 2024)
2. ज्या उमेदवारांनी आधीच्या भरतीसाठी खाते तयार केले आहे, त्यांनी नवीन खाते तयार करावे की नाही?
उत्तर – नाही. ज्या उमेदवारांनी आधीच CEN No.01/2024 (ALP) किंवा 02/2024 (तंत्रज्ञ) किंवा RPF 01/2024 उपनिरीक्षक (कार्यकारी) पदासाठी अर्ज करताना खाते तयार केले असेल तर त्यांना पुन्हा खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी CEN No.RPF 02/2024 कॉन्स्टेबल (कार्यकारी) साठी अर्ज करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायला हवे.

3. अकाउंट कसे उघडायचे?
उत्तर – जर उमेदवारांनी वर नमूद केलेल्या CEN साठी खाते तयार केले नसेल तर त्यांनी अर्ज लिंक होम पेजवर ‘Create an Account’ टॅबवर क्लिक करा. ऑनलाइन ‘Create an Account’ फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. पासवर्ड हे कॅपिटल अक्षरे, लहान अक्षरे, स्पेशल कॅरेक्टर्स आणि संख्या यांचे एकत्रीकरण असावे. अकाउंट तयार झाल्यानंतर उमेदवारांना SMS आणि E-Mail प्राप्त होईल.
4. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना आधार कार्ड नसेल तर कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जावीत?
उत्तर – परीक्षा केंद्रात प्रवेश करताना आधार (RPF Recruitment 2024) कार्ड असणे महत्त्वाचे आहे. जर उमेदवारांकडे आधार नसल्यास तुम्ही खालीलपैकी कोणत्याही कागदपत्रांचा तपशील देऊ शकता.
1. वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) , पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र
2. कर्मचारी आयडी (सरकारी नोकरी)
3. शाळा/कॉलेज/विद्यापीठाचा आयडी (अजून शिकत असल्यास)

5. पासवर्ड विसरला तर उमेदवारांनी काय करावे?
उमेदवार लॉगिन पेजवरील ‘Forgot Password’ पर्यायावर क्लिक करू शकतात. तुमची जन्मतारीख, तुमचा ईमेल किंवा मोबाइल नंबर Enter करा. सुधारित पासवर्ड उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठविला जाईल. त्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवलेला सुधारित (RPF Recruitment 2024) पासवर्ड वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. लॉग इन केल्यानंतर, उमेदवार ऑनलाइन अर्ज पेजच्या वरच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘Reset Password’ पर्यायावर प्रवेश करून नवीन पासवर्ड तयार करू शकतात.
6. ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवार माहितीमध्ये बदल करू शकतात का?
उत्तर – जर उमेदवारांना ‘Account’ तयार करताना ऑनलाइन भरलेल्या फॉर्ममध्ये ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि आरआरबी (RRB) व्यतिरिक्त इतर माहिती बदलायची असल्यास किंवा Edit करायची असल्यास उमेदवार २५० रुपयांचे शुल्क भरून फॉर्ममध्ये बदल करू शकतात.

या भरतीविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय? कोणत्या शहरांना जुळी शहरे म्हणतात? चक्रावून टाकणारे प्रश्न पहाच

GK Updates (2)

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न- भारतीय राज्यघटनेत पहिल्यांदा केव्हा दुरुस्ती करण्यात आली?
उत्तर- 1950 मध्ये प्रथमच (GK Updates) भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली.
प्रश्न- तलावाच्या पाण्यात हत्ती गेला, आता तो बाहेर कसा येणार?
उत्तर – तलावात पाणी होते, त्यामुळे हत्ती ओला होवून बाहेर येणार.

प्रश्न- कोणत्या शहराला ‘द क्वीन ऑफ हिल्स’ म्हणतात?
उत्तर- दार्जिलिंगला ‘द क्वीन ऑफ द हिल्स’ म्हणतात. चहासाठी दार्जिलिंग जगभर प्रसिद्ध आहे.
प्रश्न- ‘Canis Lupus Familiaris’ हे कोणत्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे?
उत्तर – कुत्र्याचे वैज्ञानिक नाव Canis lupus familiaris आहे.

प्रश्न – भारतात कोणती नोट इश्यू सिस्टीम पाळली जाते?
उत्तर- मिनिमम रिज़र्व सिस्टम
प्रश्न – (GK Updates) कोणत्या दोन शहरांना जुळी शहरे म्हणतात?
उत्तर- हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जुळी शहरे म्हणून ओळखली जातात, कारण दोन्ही शहरांची सभ्यता आणि संस्कृती आजही सारखीच आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCL Recruitment 2024 : पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळेल सरकारी नोकरी; इथे आहे अर्जाची लिंक

NCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (NCL Recruitment 2024) अंतर्गत ‘प्रोजेक्ट असोसिएट-I’ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

संस्था – CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे
भरले जाणारे पद – प्रोजेक्ट असोसिएट-I
पद संख्या – 03 जागा
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NCL Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Master’s degree in General, Physical / Inorganic/ Chemistry from a recognized university or equivalent
मिळणारे वेतन – Rs.31,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या (NCL Recruitment 2024) सविस्तर सूचना ncl-india.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024आहे.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – (NCL Recruitment 2024)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : पात्रता फक्त 8 वी पास; ‘इथे’ आहे सरकारी नोकरीची संधी; त्वरा करा

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात (Job Notification) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारत कोकिंग कोल लिमिटेड अंतर्गत ‘ड्रायव्हर(टी) कॅट-एल’ पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. 8 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. जाणून घेवूया भरती प्रक्रिया….

संस्था – भारत कोकिंग कोल लिमिटेड
भरले जाणारे पद – ड्रायव्हर(टी) कॅट-एल
पद संख्या – 59 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय HOD, NEE (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज – (Job Notification)
1. वरील पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.bcclweb.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ‘या’ नामांकित पतसंस्थेत लिपिक, सेवक पदावर भरती सुरू; पात्रता 10 वी पास ते पदवीधर

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । समृद्धी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद (Job Alert) अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक आणि सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.

संस्था – समृद्धी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद
भरले जाणारे पद –
1. लिपिक
2. सेवक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि, श्री संत ज्ञानेश्वर मंदीर, सोलापुर-येडशीरोड उस्मानाबाद-४१३५०१

नोकरी करण्याचे ठिकाण – उस्मानाबाद
वयो मर्यादा – 43 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकCandidate is B. Com, M.Com, B.Sc, M.Sc, BCA. MCA B.C. S., M.C.S branch graduate, at least 50% marks in degree examination required for B.C.A., B.C.S., MCA. MCS will be given preference.
नोकर10th Pass (Job Alert)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Job Alert) सादर करावा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://samruddhisociety.biz/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIATSL Recruitment 2024 : मोठी बातमी!! AIATSLमध्ये नोकरीची मोठी संधी; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

AIATSL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/हँडीवूमन पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 ते 7 मे 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/हँडीवूमन
पद संख्या – 39 पदे
वयो मर्यादा – 28 वर्षे
अर्ज फी – ५००/- रु. (AIATSL Recruitment 2024)
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 2 मे ते 7 मे 2024 (पदांनुसार)
मुलाखतीचा पत्ता – तळमजला, नागरी विभाग ओटीबी (जुनी टर्मिनल बिल्डिंग) च्या पुढे, नागरी विमानतळ, हर्णी, वडोदरा – गुजरात – 390022.

भरतीचा तपशील – (AIATSL Recruitment 2024)

पदपद संख्या 
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा07
ग्राहक सेवा कार्यकारी03
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह05
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर03
हॅन्डीमन/हँडीवूमन21

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवाGraduate from a recognized university under 10+2+3 pattern with 09 years’ experience, in pax handling.OrGraduate from a recognized university under 10+2+3 pattern with M.B.A. or equivalent in any discipline (2-years full time course or 3-years part time course) from a recognized university with 06 years aviation experience in pax handling.
ग्राहक सेवा कार्यकारीGraduate from a recognized university under 10+2+3 pattern
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह3 –years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government. (AIATSL Recruitment 2024)
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हरSSC /10th Standard Pass.Must Carry Original Valid HMV Driving License at the time of appearing for trade test.
हॅन्डीमन/हँडीवूमनSSC /10th Standard Pass.Must be able to read and understand English Language.Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable.

मिळणारे वेतन – (AIATSL Recruitment 2024)

पदवेतन
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवाRs. 29,760/-
ग्राहक सेवा कार्यकारीRs. 24,960/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 24,960/-
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हरRs.21,270/-
हॅन्डीमन/हँडीवूमनRs.18,840/-

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
2. उमेदवार संबंधित तारखेला (AIATSL Recruitment 2024) मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. या पदांकरिता मुलाखत 2 मे ते 7 मे 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com