GK Updates : कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय? कोणत्या शहरांना जुळी शहरे म्हणतात? चक्रावून टाकणारे प्रश्न पहाच

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न- भारतीय राज्यघटनेत पहिल्यांदा केव्हा दुरुस्ती करण्यात आली?
उत्तर- 1950 मध्ये प्रथमच (GK Updates) भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली.
प्रश्न- तलावाच्या पाण्यात हत्ती गेला, आता तो बाहेर कसा येणार?
उत्तर – तलावात पाणी होते, त्यामुळे हत्ती ओला होवून बाहेर येणार.

प्रश्न- कोणत्या शहराला ‘द क्वीन ऑफ हिल्स’ म्हणतात?
उत्तर- दार्जिलिंगला ‘द क्वीन ऑफ द हिल्स’ म्हणतात. चहासाठी दार्जिलिंग जगभर प्रसिद्ध आहे.
प्रश्न- ‘Canis Lupus Familiaris’ हे कोणत्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे?
उत्तर – कुत्र्याचे वैज्ञानिक नाव Canis lupus familiaris आहे.

प्रश्न – भारतात कोणती नोट इश्यू सिस्टीम पाळली जाते?
उत्तर- मिनिमम रिज़र्व सिस्टम
प्रश्न – (GK Updates) कोणत्या दोन शहरांना जुळी शहरे म्हणतात?
उत्तर- हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जुळी शहरे म्हणून ओळखली जातात, कारण दोन्ही शहरांची सभ्यता आणि संस्कृती आजही सारखीच आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com