Home Blog Page 114

Career Success Story : “उरी चित्रपट पाहिला आणि ठरवलं सैन्यात भरती व्हायचं;” फ्लाइंग ऑफिसर बनून ‘लक्ष्य’ केलं पूर्ण

Career Success Story of Lakshya Joshi

करिअरनामा ऑनलाईन । म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात (Career Success Story) दिसतात; हे खरच आहे. राजसमंद जिल्ह्यातील सरदारगड गावातील लक्ष्य जोशी याच्याबाबतही असंच बोललं जातं. लक्ष्य जेव्हा भारतीय हवाई दलात ‘फ्लाइंग ऑफिसर’ बनला तेव्हा संपूर्ण गाव आनंदित झाला. लक्ष्य जोशीने (Lakshya Joshi) 2019 मध्ये उरी हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटापासून प्रेरित होवून त्याने सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. लक्ष्यने आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी अथक परिश्रम केले, त्याचे फळ म्हणजे त्याची हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली.

वयाच्या 24 व्या वर्षी गाठले ‘लक्ष्य’ (Career Success Story)
लक्ष्यने उरी हा चित्रपट पाहिला तेव्हा तो B.TECH चे शिक्षण घेत होता. शिक्षणासोबत तो नोकरीही करत होता. वयाच्या 24 व्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण केल्याबद्दल लक्ष्यला खूप आनंद (Career Success Story) झाला आहे. त्याचे आजोबा श्यामलाल जोशी, वडील ललित कुमार जोशी, आई सुनीता शर्मा, मामा निरज जोशी आणि धाकटा भाऊ विनय जोशी हे देखील त्याच्या यशाने खूप आनंदी झाले आहेत.

वडिलांना वाटतो अभिमान
आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना (Career Success Story) वडील ललित कुमार जोशी म्हणाले की; “डिसेंबर 2020 मध्ये हवाई दलाच्या सामायिक प्रवेश चाचणी परीक्षेअंतर्गत त्यांच्या मुलाची भारतीय हवाई दलात फ्लाइट कॅडेट शाखा ‘फ्लाइंग पायलट’ या पदासाठी निवड झाली आहे. यानंतर, एअर फोर्स अकादमी, डुंडीगल, हैदराबाद येथे दीड वर्षाचे ग्राउंड आणि फ्लाइंग ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर, 18 जून रोजी तो भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्त झाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2024 : मोठा ब्रेक घेतलेली शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा झाली सुरू; उमेदवारांना मोठा दिलासा

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Shikshak Bharti 2024) पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते. संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया राबवली जात असताना लोकसभा आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेवर निर्बंध आले होते. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पवित्र पोर्टल मार्फत 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्व साधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, केेंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 निवडणुकीचा (Shikshak Bharti 2024) कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. याविषयीची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केेंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात केेंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे; असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास 19 एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे.त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत; असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10 th Board Results 2024 : क्या बात है!! 10 वी मध्ये अपयश आल्यास आता ‘नापासा’चा शिक्का बसणार नाही; करावे लागणार ‘हे’ काम

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आता (10 th Board Results 2024) निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही विद्यार्थी या निकालाबाबत उत्सुक आहेत तर काही विद्यार्थी निकलाबाबत चिंताग्रस्त आहेत. निकालामध्ये कोण उत्तीर्ण होणार तर कोण अनुत्तीर्ण होईल; याबाबत निकालादिवशीच स्पष्ट होईल. मात्र, आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही. हे स्वप्नवत वाटत असले तरी हे सत्य आहे.

नापास विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही (10 th Board Results 2024)
दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येईल तसे आता मुलांना निकालाचे टेन्शन आले आहे. निकालात कोणी पास तर कोणी नापास होईल. मात्र, आता नापास विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसणार नाही. अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे; तसेच जुलैमध्ये पुरवणी परीक्षेच्या सहाय्याने त्यांना उत्तीर्ण होण्याची संधीदेखील मिळणार आहे.

शैक्षणिक वर्ष वाया न जाता कौशल्य प्रशिक्षण मिळणार
दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास पुढील शिक्षणात या विद्यार्थ्यांना आवड राहत नाही. अनेकांना नापास झाल्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा नसते. त्यामुळे नापास (10 th Board Results 2024) झालेल्या विद्यार्थी व पालकांचे शाळेतच समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीचे रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी दहावीच्या पुरवणी परीक्षेलादेखील बसू शकतील. याचदरम्यान एटीकेटीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना कौशल्याचे धडे घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पालकांची भूमिका महत्त्वाची
दहावी, बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येतो. त्यानंतर निकाल त्या-त्या केंद्रांवरून वितरित केला जातो. शाळा, महाविद्यालयांचा निकाल घेण्यासाठी आलेल्या (10 th Board Results 2024) शिक्षकांना बोर्डाच्या प्रतिनिधीकडून समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर हे शिक्षक नापास विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणार आहेत.
विद्यार्थी नापास झाला की, पालक मुलांवर अपयशाचे खापर फोडतात; तर पास झाला तरी अनेक पालक मुलांना टक्केवारीच्या कोंडीत पकडले जाते. अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना सांभाळून घेण्याची गरज असते. त्यामुळे पाल्यांना सावरून त्यांना योग्य दिशा देणाची पालकांची तयारी असायला हवी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राचार्य, प्राध्यापक पदावर भरती सुरू; ‘इथे’ करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । दत्ता मेघे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर (Job Notification) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (EMAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 आहे.

संस्था – दत्ता मेघे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
भरले जाणारे पद –
1. प्राचार्य
2. प्राध्यापक (Job Notification)
3. सहयोगी प्राध्यापक
4. सहायक प्राध्यापक
पद संख्या – 28 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2024
अर्ज पाठवण्यासाठी E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
डीएमएएमसीएचआरसी, YCCE कॅम्पस वानाडोंगरी, हिंगणा रोड, नागपूर-441110.

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदाचे नावपद संख्या 
प्राचार्य01
प्राध्यापक07
सहयोगी प्राध्यापक10
सहायक प्राध्यापक10

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत संबंधित (Job Notification) कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
https://dmamchrc.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : थेट द्या मुलाखत!! खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती

Job Alert (6)

करिअरनामा ऑनलाईन । खेड शिक्षक प्रसारक मंडळ, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदव्युत्तर विभाग पदांच्या एकूण 181 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 आहे. पहा संपूर्ण तपशील….

संस्था – खेड शिक्षक प्रसारक मंडळ, पुणे
भरले जाणारे पद –
1. वरिष्ठ विभाग
2. प्रशासकीय विभाग
3. कनिष्ठ विभाग
4. पदव्युत्तर विभाग
पद संख्या – 181 पदे (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 26, 27 आणि 30 एप्रिल 2024

भरतीचा तपशील –

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ विभाग92
प्रशासकीय विभाग44
कनिष्ठ विभाग34
पदव्युत्तर विभाग11

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला (Job Alert) मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. या पदांकरिता मुलाखत 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 तारखेला घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://sbmrajgurunagar.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NVS Recruitment 2024 : मेगाभरती!! नवोदय विद्यालय समिती अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

NVS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मोठी (NVS Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून TGT, PGT पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.

संस्था – नवोदय विद्यालय समिती
भरले जाणारे पद – TGT, PGT
पद संख्या – 500 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2024
वय मर्यादा – 65 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (NVS Recruitment 2024)

पदाचे नावपद संख्या 
TGT283
PGT217

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
TGTBachelors Honors Degree (NVS Recruitment 2024)
PGTPost Graduate CourseM.Sc. (Computer Science/IT)/ MCAM.E. Or M.Tech. (Computer Science/IT)

मिळणारे वेतन –

पदाचे नाववेतन
TGTRs. 34,125/- p.m.Rs. 40,625/- p.m.
PGTRs. 35,750/-p.m.Rs. 42,250/- p.m.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NVS Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना ncl-india.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा (TGT)APPLY
ऑनलाईन अर्ज करा (PGT) – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://navodaya.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : “तरूणांनो.. राजकारण आणि क्रिकेटच्या मागे न धावता ध्येयावर लक्ष केंद्रीत करा”; सांगत आहे 7 वेळा नापास झालेला अधिकारी

UPSC Success Story of Shantappa K

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर (UPSC Success Story) झाला आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांपैकी अनेकजण घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे आले आहेत; तर काही उमेदवार असे आहेत जे या परीक्षेत अनेकदा अपयशी झाले होते, मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून यश मिळवलं आहे. कर्नाटकमध्ये असाच एक होतकरू उमेदवार आहे. ज्याच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. पोलीस उपनिरीक्षक शांताप्पा के. (Shantappa K) उर्फ शांताप्पा जादमानवर असं त्याचं नाव आहे. यूपीएससीत (UPSC) तब्बल सात वेळा अपयशी झाल्यानंतर आठव्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली आहे. जाणून घेवूया त्याच्या जीवन प्रवासाविषयी….

लहानपणी हरपलं वडिलांचं छत्र
शांताप्पा अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं. त्यानंतर त्यांच्या आईने शांतप्पांचं पालनपोषण करण्यासाठी इतरांच्या शेतात मोलमजुरी केली. शांताप्पा पदवी परीक्षेत चार विषयांमध्ये नापास झाले होते. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून हा तरूण पुढे यूपीएससीसारख्या परीक्षेत (UPSC Success Story) बाजी मारेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र शांताप्पा यांनी प्रचंड मेहनतीने यूपीएससी परिक्षेत यश मिळवलंच. एक-दोन नव्हे तर सात वेळा अपयश आल्यावरही शांताप्पांनी हार मानली नाही, त्यांचं मनोबल खचलं नाही. यावर्षी त्याने आठव्यांदा प्रयत्न केला आणि या परीक्षेत संपूर्ण भारतातून ६४४ वी रॅंक मिळवली. या कामगिरीने त्याच्या कुटुंबाच्या आणि सहकाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

शिक्षणात प्रगती कशी झाली..
शांताप्पा अभ्यासात फार हुशार नव्हता. त्याची आई मोलमजुरी करून घराचा आर्थिक गाडा ओढत होती. शांताप्पाची शाळा-महाविद्यालयात जेमतेम प्रगती चालू होती. कॉलेजमध्ये शिकत (UPSC Success Story) असताना तो नापास झाला होता. यानंतर दिलेल्या परीक्षेत त्याला अवघे ३९ टक्के मार्क मिळाले. शांताप्पा सांगतात; “माझी शिक्षणातील प्रगती पाहून माझ्या कॉलेजमधील आणि गावातील मित्रांचं माझ्याबरोबरचं वागणं बदललं. त्यामुळे मला समजलं की शिक्षणाशिवाय या जगात आपल्याला काहीच किंमत मिळणार नाही. यामुळे मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. मी वीरशैव महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.”

एकीकडे ड्यूटी आणि दुसरीकडे अभ्यास
यूपीएससीच्या तयारीसाठी शांताप्पा दिल्लीला गेला. तिथे त्याने एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. इथून पुढचा मार्ग सोपा नव्हता. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ सात वेळा परीक्षा दिली. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी अपयश आलं. दरम्यान, सुरुवातीच्या काळात यूपीएससीत अपयश आल्यानंतर त्याने दुसऱ्या बाजूला पोलीस होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिथे मात्र त्याला यश पहायला मिळालं. २०१६ मध्ये हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला. पोलीस झाल्यानंतरही त्याने या पदावर समाधान न मानता यूपीएससीचा अभ्यास चालूच ठेवला. त्याची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली होत होती. पोलीस खात्यात काम करताना तो आपली जबाबदारी चोख पार पाडत होता. नोकरी करत असताना यूपीएससीची तयारी त्याने सोडली नाही. एकीकडे ड्यूटी आणि दुसरीकडे अभ्यास; अशी त्याची तारेवरची कसरत सुरू होती. सलग सात अपयश पचवणाऱ्या शांताप्पा याने अखेर यावर्षी यूपीएससीत यश खेचून आणलं. त्याने संपूर्ण देशातून 644 वा क्रमांक मिळवला आहे.

पोलीस उपिरीक्षक शांताप्पा बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील कमांड सेंटरमध्ये तैनात आहे. शांताप्पाने मिळवलेली यूपीएससी रँक पाहता त्याची आयपीएस (IPS) किंवा आयआरएस (IRS) अधिकारी पदावर नेमणूक होऊ शकते. शांताप्पाला आणि त्याच्या कुटुंबाला आयुष्यात खूप संघर्ष पहावा लागला आहे. बेल्लारी जिल्ह्यातील होसा जेनिकेहल गावातून आलेल्या या तरुणाचं बालपण हलाखीत गेलं. वडील गेल्यानंतर त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र आईने काबाडकष्ट करून मुलाला वाढवलं, शिकवलं आणि पोलीस उपनिरीक्षक केलं.

तरुणांना दिला हा सल्ला (UPSC Success Story)
अतूट दृढ निश्चयाच्या जोरावर शांताप्पाने हे यश खेचून आणलं आहे. आपल्या देशातील तरुणांना काय सल्ला द्याल? या प्रश्नावर तो सांगतो; “मी तरुणांना एवढंच सांगेन की शिक्षणामुळेच आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं. मला वाटतं, आपल्या देशातील तरुणांनी क्रिकेट किंवा राजकारणामागे धावून बहुमोल वेळ आणि आयुष्य वाया घालवू नये. त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : पूर्व प्राथमिक शिक्षण बोली भाषेतून मिळणार; खान्देशी भाषेचाही समावेश; NCERT कडून 54 अभ्यासक्रम प्रसिध्द

Education

करिअरनामा ऑनलाईन । पूर्वप्राथमिक शिक्षणात आता (Education) खान्देशी भाषेचा समावेश केला जाणार आहे. एनसीईआरटीने देशभरातील 54 स्थानिक भाषांमध्ये पूर्वप्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून प्रसिद्ध केला आहे.

मराठीसह खान्देशी भाषेचा समावेश
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy 2020) नुसार शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करण्यात येत आहेत. NEP अंतर्गत स्थानिक भाषा आणि मातृभाषेतून शिक्षणास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार एनसीईआरटीने (NCERT) देशभरातील ५४ स्थानिक भाषांमध्ये पूर्वप्राथमिक (Education) ते दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून प्रसिद्ध केला आहे. या भाषांमध्ये मराठी भाषेसह खान्देशी भाषेचाही समावेश केला असून, या खान्देशी भाषेतील अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना खान्देशी भाषेतील अक्षरे, शब्द आणि अंकांचे उच्चार, लेखन शिकता येणार आहे.

आदिवासीबहुल भागातील मुलांना वर्गशिक्षण पद्धती समजू शकत नसल्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२२ मध्ये तीन ते आठ या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मातृभाषा, घरात बोलली जाणारी भाषा, प्रादेशिक भाषेत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ३ ते ५ या वयोगटांतील मुलांना, 1 ली ते 2 रीच्या मुलांना प्राथमिक स्तरावर मुलभूत साक्षरता देण्याची व्यवस्था केली आहे.

असे दिले जाणार शिक्षण (Education)
पुस्तकातील कथा, चित्रे, संवाद याद्वारे हे शिक्षण दिले जाणार आहे. मुलांच्या सोयीसाठी खान्देशी भाषेतील गाणी, शब्द, अक्षरे देण्यात आली आहेत. त्यामुळे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून मराठी ध्वनी आणि लिपी शिकता, वाचता, बोलता येईल. मातृभाषेतील उपलब्ध अक्षरे आणि मातृभाषेत नसलेली मराठी अक्षरे एकत्र करून खान्देशी भाषा शिक्षण प्रवेशिका हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाद्वारे ध्वनिची ओळख तसेच वर्णमालेची ओळख होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांचे भाषेमुळे काही प्रमाणात होणारे नुकसान कमी होईल.

अशा पद्धतीने शिकवली जाणार अक्षरे
खान्देशी भाषा शिक्षण प्रवेशिका या पुस्तकानुसार (Education) खान्देशी भाषेतील अक्षरे, शब्द, अंक देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, अ अऊत (नांगर), दा (दहा), आकरा (अकरा), आ आकटी (शेकोटी), इ इज (वीज), ई इस्तो (विस्तव), ऐ ऐना (आरसा) अशा पद्धतीने अक्षरे शिकवली जातील. तर यक (एक), सऊ (सहा), सोया (सोळा) अशा पद्धतीने अंक शिकवले जाणार आहेत. तसेच कविता, चित्रेही देण्यात आली आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Start Up : मराठा/कुणबी तरुणांसाठी उद्योजक होण्याची मोठी संधी!! ‘या’ योजनेंतर्गत मिळवा भरघोस आर्थिक मदत

Start Up

करिअरनामा ऑनलाईन । मराठा/कुणबी समाजातील युवकांसाठी (Start Up) उद्योजक होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. ‘सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमा’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरीत करण्यासाठी अर्थ सहाय्य केले जाणार आहे. राज्यातील विविध इनक्युबेशन केंद्रांमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मार्फत ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनसाठी नोंदणीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

आता इच्छुक तरुण ३० एप्रिल पर्यंत या (Start Up) योजनेसाठी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा किंवा कुणबी गटातील नवउद्योजकांची ही निवड एका वर्षासाठी करण्यात येते.
इथे करा अर्ज – https://sarthi-maharashtragov.in/
अर्ज करण्यासाठी मुदत – 30 एप्रिल 2024

काय आहे आवश्यक पात्रता – (Start Up)
1. इच्छुक विद्यार्थी किमान पदवीधर असावा.
2. विद्यार्थ्यांकडे स्वतःची तंत्रज्ञान व्यवसाय कल्पना असावी.
3. एका वर्षामध्ये त्याने कल्पनेचे रूपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये करणे आवश्यक आहे
4. आर्थिक साहाय्य दिलेल्या काळात विद्यार्थ्यांनी उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्ण वेळ पाठपुरावा करणे आवश्यक आहे

इनक्युबेशन केंद्राचे नाव आणि उपलब्ध जागा
1. एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे – १० जागा
2. उद्यम सोलापुर विद्यापीठ (Start Up) इनक्युबेशन सेंटर, सोलापूर – १० जागा
3. शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅन्ड लिंकेजेस, कोल्हापूर – १० जागा
4. मराठवाडा एक्सलरेटर फॉर ग्रोथ अॅन्ड इनक्युबेशन कॉंन्सिल, छत्रपती संभाजीनगर – १० जागा
5. नेत्ररित फाउंडेशन, सांगली – १० जागा
6. जी. एच. रायसोनी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर फाउंडेशन, नागपूर – १० जागा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

College Admission : कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जाताय? आधी ‘या’ गोष्टी करा चेक

College Admission

करिअरनामा ऑनलाईन । बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर (College Admission) विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते; ती म्हणजे चांगले कॉलेज शोधून प्रवेश घेण्यासाठी. ज्यामध्ये ते चांगला अभ्यास करू शकतात आणि चांगले भविष्य घडवू शकतात. तुमच्या या कामात आम्ही तुम्हाला मदत करत आहोत; ज्यामुळे तुम्हाला चांगले कॉलेज शोधण्यास मदत होईल.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सर्वात मोठी चिंता असते ती त्यांच्या मुलाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी. तुम्हीही कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेणार असाल तर काही गोष्टी नक्की तपासा, यामुळे तुम्हाला त्या कॉलेजची माहिती मिळेल. त्यानंतर जर ते कॉलेज तुमच्या अपेक्षा पूर्ण करत असेल तर तुम्ही यामध्ये प्रवेश घेऊ शकता.

महाविद्यालयाची ओळख तपासा (College Admission)
प्रवेश घेण्यापूर्वी, विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयाची संलग्नता तपासणे आवश्यक आहे. वेळोवेळी, विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी यूजीसीने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता न केल्यास त्यांची मान्यता रद्द केली जाते. अशा परिस्थितीत, सर्वत्र मान्यता असलेल्या महाविद्यालयातून तुमचा अभ्यास पूर्ण करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

लोकेशन तपासा
कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी, त्याचे ठिकाण (College Admission) निश्चितपणे तपासा जेणेकरून तुम्हाला ये-जा करताना सोयीसुविधा मिळू शकतील. जर तुमचा संपूर्ण दिवस रोज कॉलेजला जाण्यात-येण्यात वाया जात असेल तर तो वेळेचा अपव्यय होईल ज्यामुळे तुम्ही अभ्यासाला जास्त वेळ देवू शकणार नाही.

प्लेसमेंटची माहिती घ्या
आजकाल, अनेक महाविद्यालये आहेत जी अभ्यास (College Admission) पूर्ण करण्याबरोबरच प्लेसमेंट देतात. तुम्हाला अशा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास, तुमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते.

कॉलेज/कॅम्पसला प्रत्यक्ष भेट द्या (College Admission)
याशिवाय, अधिक माहितीसाठी तुम्ही कॉलेज/कॅम्पसलाही भेट देऊ शकता. तिथे जाऊन तुम्हाला फी, कोर्सेस तसेच इतर माहिती मिळू शकेल. जर तुम्ही चांगल्या ठिकाणाहून अभ्यास केलात तर तुमचे भविष्य उत्तम घडवण्यात नक्कीच मदत होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com