Career Success Story : “उरी चित्रपट पाहिला आणि ठरवलं सैन्यात भरती व्हायचं;” फ्लाइंग ऑफिसर बनून ‘लक्ष्य’ केलं पूर्ण

करिअरनामा ऑनलाईन । म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात (Career Success Story) दिसतात; हे खरच आहे. राजसमंद जिल्ह्यातील सरदारगड गावातील लक्ष्य जोशी याच्याबाबतही असंच बोललं जातं. लक्ष्य जेव्हा भारतीय हवाई दलात ‘फ्लाइंग ऑफिसर’ बनला तेव्हा संपूर्ण गाव आनंदित झाला. लक्ष्य जोशीने (Lakshya Joshi) 2019 मध्ये उरी हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटापासून प्रेरित होवून त्याने सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. लक्ष्यने आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी अथक परिश्रम केले, त्याचे फळ म्हणजे त्याची हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली.

वयाच्या 24 व्या वर्षी गाठले ‘लक्ष्य’ (Career Success Story)
लक्ष्यने उरी हा चित्रपट पाहिला तेव्हा तो B.TECH चे शिक्षण घेत होता. शिक्षणासोबत तो नोकरीही करत होता. वयाच्या 24 व्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण केल्याबद्दल लक्ष्यला खूप आनंद (Career Success Story) झाला आहे. त्याचे आजोबा श्यामलाल जोशी, वडील ललित कुमार जोशी, आई सुनीता शर्मा, मामा निरज जोशी आणि धाकटा भाऊ विनय जोशी हे देखील त्याच्या यशाने खूप आनंदी झाले आहेत.

वडिलांना वाटतो अभिमान
आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना (Career Success Story) वडील ललित कुमार जोशी म्हणाले की; “डिसेंबर 2020 मध्ये हवाई दलाच्या सामायिक प्रवेश चाचणी परीक्षेअंतर्गत त्यांच्या मुलाची भारतीय हवाई दलात फ्लाइट कॅडेट शाखा ‘फ्लाइंग पायलट’ या पदासाठी निवड झाली आहे. यानंतर, एअर फोर्स अकादमी, डुंडीगल, हैदराबाद येथे दीड वर्षाचे ग्राउंड आणि फ्लाइंग ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर, 18 जून रोजी तो भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्त झाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com