Home Blog Page 108

7 th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! पगारात होणार मोठी वाढ

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांची (7 th Pay Commission) रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. होळी पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्क्यांनी वाढून 50 टक्केपर्यंत पोहोचला होता .यानंतर निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढवण्याची देखील घोषणा केली होती. डीए वाढ हा 1 जानेवारी 2024 पासून लागू झाला. आता केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उच्च भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा देखील वाढवलेली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुखद धक्का (7 th Pay Commission)
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारने त्यांच्या मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अन्नदानाच्या मर्यादेबाबत सुधारणा केल्याचे जाहीर केलेले आहे. 2018 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मंत्रालयाने म्हटले आहे की, या पगारातील महागाई भत्ता जेव्हा जेव्हा 50 टक्क्यांनी वाढतो, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा देखील 25 टक्क्यांनी वाढणार आहे. असे त्यांनी आदेशामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तीगृहाच्या अनुदानाच्या रकमेबद्दल देखील सरकारने माहिती मागवली आहे.

शिक्षण भत्ता आणि वस्तीगृहासाठी वाढीव तरतूद
कार्मिक मंत्रालयाने जाहीर केलेल्या या आदेशानुसार आता मुलांच्या शिक्षण भत्त्याची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या वास्तविक खर्चाची परवाना करता दर महिन्याला 2812.5% आणि वस्तीगृह अनुदान हे 8437.5% प्रति महिना दिला जाईल. होळी पूर्वी केंद्र सरकारचे सरकारी कर्मचारी आणि (7 th Pay Commission) पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) हा 46 टक्क्यावरून 50% पर्यंत केला होता. आणि याची बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली होती. या बैठकीत डीए वाढीचा निर्णय घेतला, असून 1 जानेवारी ते 30 जून 2024 पर्यंत कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ मिळेल असे देखील सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे किमती कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ करण्यात आली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : आत्महत्येचा प्रयत्न.. पैशांवरुन सतत अपमान; IIT च्या माजी विद्यार्थ्याची कहाणी तुम्हाला धक्का देईल

Success Story of Deepak Baghel

करिअरनामा ऑनलाईन । “आयआयटीयन म्हणून, आज मी एक (Success Story) यशस्वी उद्योजक आणि प्रेरक वक्ता आहे, परंतु भूतकाळात मी मानसिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरा गेलो आहे. मी एकदा आत्महत्येचा विचारही केला होता. आत्महत्येचे विचार आणि ढासळणारे मानसिक आरोग्य यामधील संघर्ष वेगवेगळे रूप घेतो.” आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि प्रेरक वक्ते बनलेले दीपक बघेल (IITian Deepak Baghel) यांनी अलीकडेच त्यांचा वैयक्तिक प्रवास लिंक्डइनवर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, त्यांच्या आयुष्यातील आव्हानात्मक काळात आत्महत्येच्या विचारांसोबतच्या लढाईची आठवण सांगितली आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याविषयी भाष्य केले आहे. महाविद्यालयीन काळात त्यांना आलेल्या तीन प्रमुख समस्यांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. आहे

मित्रांसमोर अपमानाने मान खाली झुकायची (Success Story)
घरापासून लांब वसतिगृहात राहून दीपक शिक्षण घेत होते. ते सांगतात; “माझ्यासमोर आर्थिक अडचण उभी होती. फी भरता येत नव्हती त्यामुळे मला वसतीगृह सोडावे लागले. मला माझ्या रुममेट समोर अपमानित व्हावे लागले. मित्रांसमोर होणारा अपमान सहन होत नव्हता. अशातच आईचा पगारही उशीर झाला होता त्यामुळे मला माझ्या बहिणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या फीसाठी पैशाची व्यवस्था करावी लागली होती, हा प्रसंग माझ्यासाठी फारच कठीण होता.”

इंग्रजी प्रश्न समजायला एक वर्ष लागले
दीपक सांगतात; “आयआयटी बॉम्बेमधील एका प्राध्यापकाने माझ्यावर जाहीरपणे टीका केली आणि मी मध्य प्रदेशातील सरकारी हिंदी माध्यमाच्या शाळेतून आल्यामुळे अशा मूलभूत (Success Story) अभ्यासक्रमाचा सामना कसा करू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला. आयआयटी बॉम्बेमध्ये एक वर्ष इंग्रजी प्रश्न समजून घेण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. प्रथम वर्षाच्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापकांच्या या शब्दांनी मला लाज वाटली. त्यावेळी मला माझे अश्रू रोखता आले नाहीत.”

एकच एक प्रश्नामुळे प्राध्यापकासमोर लाजिरवाणे व्हावे लागले
दीपक बघेल यांनीही संस्थात्मक कठोरतेमुळे येणाऱ्या अडथळ्यांविषयी सांगितले. कठोर शैक्षणिक मजबुतीकरण कार्यक्रम नियमांमुळे एका प्राध्यापकाने त्यांना परीक्षेत नापास (Success Story) केल्याचे उदाहरण त्यांनी दिले. ते सांगतात “माझे मूडल खाते सहा महिन्यांसाठी अक्षम करण्यात आले होते, मला कोर्स नोंदणीसह सर्व कामे ऑफलाइन हाताळण्यास भाग पाडले होते. अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी मी प्रत्यक्ष स्वाक्षरीसाठी संपर्क साधलेल्या प्रत्येक प्राध्यापकाने मी नापास का झालो? असा प्रश्न केला. या सततच्या पेच प्रसंगामुळे माझा संघर्ष आणखी वाढला.”

आत्महत्या करण्यापर्यंत मजल गेली (Success Story)
दीपक यांनी आपल्या पोस्टमध्ये आत्महत्येच्या प्रयत्नाची आठवण लिहली आहे. ते म्हणाले की, “मी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण नंतर मला माझ्या वडिलांचा सततचा संघर्ष आणि शेवटी त्यांचे दुःखद निधन आठवले. मग काही सेकंदाच्या क्षणात, सर्व समस्या नाहीशा झाल्या, कारण मी 5 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार केला. पण नंतर, मी माझ्या वडिलांचा फोटो पाहिला आणि 2004 मध्ये समाजाकडून त्यांची निर्घृण हत्या होईपर्यंतचा त्यांचा संघर्ष आठवला.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Educational Scholarship : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती’; मिळणार USD 1 लाख इतका खर्च

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । उच्च शिक्षणाच्या वाटचालीत शिष्यवृत्ती (Educational Scholarship) हा महत्त्वाचा भाग आहे. आज आपण अशाच काही शिष्यवृत्तीबाबत जाणून घेणार आहोत ज्या तुमचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर करतील. अशीच एक शिष्यवृत्ती आहे जी ‘इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन’ (Inlaks Shivdasani Foundation) कडून दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता येईल? यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? फाऊंडेशन पात्र विद्यार्थ्यांचा किती खर्च उचलणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढे वाचा….

शिष्यवृत्तीची रक्कम किती? कोणत्या परदेशी विद्यापीठात शिकता येणार?
१९७६ पासून, इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती ४८० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना यूएसए, यूके आणि युरोपियन संस्थांमध्ये पूर्ण-वेळ मास्टर्स, एमफिल किंवा डॉक्टरेट प्रोग्राममध्ये शिक्षण (Educational Scholarship) घेण्याण्यासाठी मदत करते. यामध्ये प्रोग्राम, शिकवणी, राहण्याचा खर्च, आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांचे एकेरी विमान भाडे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी अंदाजे खर्च USD १,००,००० पर्यंत असतो आणि हा खर्च संस्था उचलते. उच्च शिक्षणासाठी मदत देणाऱ्या या फाऊंडेशनची इम्पीरियल कॉलेज, लंडन, रॉयल कॉलेज ऑफ आर्ट (RCA), लंडन, केंब्रिज विद्यापीठ (केंब्रिज ट्रस्ट), किंग्ज कॉलेज लंडन (पीएचडी विद्यार्थ्यांसाठी) आणि हर्टी स्कूल, बर्लिन अशा विविध नामांकित विद्यापीठांसोबत संयुक्त-शिष्यवृत्ती व्यवस्था आहे.

‘हे’ विषय शिकता येणार (Educational Scholarship)
या फाऊंडेशनकडून सामाजिक विज्ञान, सार्वजनिक धोरण, कला आणि मानविकी विद्याशाखा या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच इंपीरियल कॉलेज, लंडन येथे अभियांत्रिकी आणि नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या अर्जांचाही विचार केला जातो. यासह डॉक्युमेंटरी, फिल्म मेकिंग व वेस्टर्न शास्त्रीय गायनाचा अभ्यास करणाऱ्या अर्जांचाही विचार केला जातो. थोडक्यात काय तर नेहमीच्या अभ्यासक्रमापेक्षा थोड्या वेगळ्या शाखांचा यामध्ये विचार केला गेला आहे; हे लक्षात येते.

काय आहे आवश्यक पात्रता –
1. १ जानेवारी १९९४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या आणि भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले सर्व भारतीय पासपोर्ट धारक जे अर्जाच्या वेळी भारतात रहिवासी आहेत असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील.
2. तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात असाल आणि निकालाची (Educational Scholarship) वाट पाहत असाल, तरी देखील तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात.
3. ज्या उमेदवारांनी परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून चांगली अंडरग्रॅज्युएट पदवी घेतली आहे आणि त्यांनी सतत वास्तव्य केलेले असेल किंवा नोकरी केली असेल त्यासोबत अंडर-ग्रॅज्युएशननंतर किमान दोन वर्षे भारतात शिक्षण घेतले असे विद्यार्थी देखील यासाठी पात्र आहेत.

आवश्यक किमान टक्केवारी/ग्रेड –
1. सामाजिक विज्ञान, मानविकी, कायदा, ललित कला, आर्किटेक्चर आणि संबंधित विषयांसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून किमान शैक्षणिक ग्रेड ६५ टक्के, CGPA ६.८/१०, किंवा GPA २.६/४ असणे आवश्यक आहे.
2. गणित, विज्ञान, पर्यावरण आणि संबंधित विषयांसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून किमान शैक्षणिक ग्रेड ७० टक्के, CGPA ७.२/१०, किंवा GPA २.८/४ असणे आवश्यक आहे. अशा गुणांसह तुम्ही या विविध कोर्ससाठी इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र आहात.

शिष्यवृत्तीसाठी अशी होणार निवड – (Educational Scholarship)
1. शिष्यवृत्तीसाठी यशस्वी अर्ज निवडण्यासाठी स्वतंत्र, इनलॅक्स निवड समिती नेमण्यात आली आहे.
2. अर्जदारांचे मूल्यांकन केवळ त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमान यशावरच नव्हे तर त्यांच्या भविष्यातील संभाव्यतेवर देखील केले जाते.
3. कला आणि डिझाइन (ललित/परफॉर्मिंग आर्ट्स) मध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रामुख्याने त्यांच्या पोर्टफोलिओवर मूल्यांकन केले जाईल.

तीन टप्प्यात पार पडणार निवड प्रक्रिया –
1. पात्र अर्जांचे पुनरावलोकन
2. पुनरावलोकनातून निवडलेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन प्राथमिक मुलाखती आणि प्राथमिक मुलाखतीत यशस्वी झालेल्यांची अंतिम वैयक्तिक मुलाखत.
महत्वाची सूचना – विद्यार्थ्यांनी काही खास गोष्टींची मात्र काळजी व खबरदारी घ्यायची आहे. उमेदवारांना त्यांच्या ऑफर लेटरचा सशर्त भाग म्हणून इंग्रजी भाषेचे प्रमाणपत्र आहे त्यांनी (Educational Scholarship) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी ते प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. उमेदवारांना प्रवेशाची स्थगित ऑफर प्राप्त झाली आहे त्यांच्याकडे २०२४ शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी वैध ऑफर असणे आवश्यक आहे. परदेशातील संस्थेतून पदव्युत्तर पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत. जे उमेदवार आधीच शिकत आहेत किंवा परदेशातील संस्थेत त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सुरू केले आहे ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.
अधिकृत वेबसाईट – या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही www. inlaksfoundation. org वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : असे ‘6’ प्रश्न ज्याची उत्तरे माहित असायलाच हवीत

GK Update 29 Apr.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1- क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये एकूण ७९.१ गुणांसह अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात IIT बॉम्बे कोणत्या स्थानावर आहे? (GK Update)
40 वा
45 वा
50 वा
55 वा
उत्तर- क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात IIT बॉम्बे 45 व्या क्रमांकावर आहे.

प्रश्न 2- जागतिक व्यापार संघटनेने जारी केलेल्या वर्ल्ड ट्रेड आउटलुक आणि सांख्यिकीवरील अहवालानुसार, भारत आता डिजिटली वाटप केलेल्या सेवांचा कोणता सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे?
तिसऱ्या
दुसरा
चौथा (GK Update)
पहिला
उत्तर- भारत चौथा सर्वात मोठा निर्यातदार बनला.

प्रश्न 3- अलीकडेच कोणत्या राज्यात लष्कराच्या त्रि-शक्ती कॉर्प्सने 17,000 फूट उंचीच्या अतिउच्च उंचीच्या भागात अँटी-टँक गाइडेड मिसाईल फायरिंगचा प्रशिक्षण सराव केला?
सिक्कीम
आसाम
बिहार
ओडिशा
उत्तर- सिक्कीम कॉर्प्सने याचे आयोजन केले होते.

प्रश्न 4 – चांद्रयान-3 च्या यशाबद्दल, त्याच्या (GK Update) टीमला अंतराळ संशोधनासाठी कोणता पुरस्कार देण्यात आला?
ॲलन डी. एमिल मेमोरियल अवॉर्ड
आर्यभट्ट पुरस्कार
डर्क ब्रॉवर पुरस्कार
जॉन एल. ‘जॅक’ स्विगर्ट जूनियर पुरस्कार
उत्तर- जॉन एल. ‘जॅक’ स्विगर्ट जूनियर पुरस्कार

प्रश्न 5 – कोणत्या देशाकडून भारतीय लष्कराला 24 Igla-S Man Portable Air Defence Systems (MANPADS) आणि 100 क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी मिळाली आहे?
चीन
रशिया
जपान
अमेरिका
उत्तर- रशिया

प्रश्न 6 – भारत आणि उझबेकिस्तानमध्ये १५ ते २८ एप्रिल २०२४ या कालावधीत होणाऱ्या सरावाचे नाव काय आहे?
सूर्यकिरणे (GK Update)
हातात हात घालून
सध्या
डस्टलिक
उत्तर- डस्टलिक
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC-NET Exam Calendar 2024 : UGC-NET चे वेळापत्रक पुन्हा बदलले; कधी होणार परीक्षा?

UGC-NET Exam Calendar 2024

करिअरनामा ऑनलाईन । येत्या 16 जून रोजी होणारी विद्यापीठ अनुदान (UGC-NET Exam Calendar 2024) आयोगाची नेट परीक्षा येत्या 18 जून रोजी घेण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे आलेल्या उमेदवारांच्या विनंत्या आणि अभिप्राय यांचा विचार करुन NTA एकाच दिवशी संपूर्ण भारतभर OMR मोड (OMR mode) मध्ये UGC-NET परीक्षा आयोजित करणार आहे. याबाबत NTA लवकरच औपचारिक अधिसूचना जारी करणार आहे.

जे उमेदवार चार वर्ष/ 8 सेमिस्टर बॅचलर डिग्री प्रोग्राम करत आहेत आणि त्यांच्या शेवटच्या सेमिस्टर/वर्षात आहेत ते देखील नेट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. जगदीश कुमार यांनी दिलेल्या (UGC-NET Exam Calendar 2024) माहितीनुसार, पात्रतेमध्ये चार वर्षांचा किंवा आठ-सेमिस्टरचा बॅचलर पदवी प्रोग्राम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. ज्यांना एकूण किमान 75 टक्के गुण किंवा बिंदू स्केलवर समतुल्य ग्रेड असणे आवश्यक आहे, जेथे ग्रेडिंग सिस्टमचे पालन केले जाते.

या तारखेला होणार परीक्षा (UGC-NET Exam Calendar 2024)
याबाबतची अधिकृत माहिती UGC चेअरमन एम.जगदीश कुमार यांनी आपल्या ‘एक्स’ या अकाउंट वर शेअर केली आहे. पुढील माहितीची NTA लवकरच औपचारिक अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. UPSC CSE परीक्षा 16 जून रोजी होणार आहे. हा वाद टाळावा यासाठी एनटीएने हा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UIDAI Recruitment 2024 : परीक्षा नाही, अर्ज फी नाही… आधार कार्ड तयार होणाऱ्या कंपनीत नोकरीची संधी; त्वरा करा

UIDAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी (UIDAI Recruitment 2024) एक उत्तम संधी चालून आली आहे. आधार कार्ड (Aadhar Card) तयार करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI मध्ये नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लगेच अर्ज करुण या संधीचा फायदा घ्यायचा आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

UIDAI अंतर्गत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परीक्षेशिवाय यामध्ये नोकरी मिळवता येणार आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात (UIDAI Recruitment 2024) आलं आहे. सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी वयोमर्यादा 56 वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज 13 जून पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या (UIDAI Recruitment 2024)
www.uidai.gov.in
या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार अधिसूचना पाहू शकतात. ही भरती ऑफलाइन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना पूर्ण मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे; पण उमेदावाराला कागदपत्रे आणि वैद्यकीय पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे.

आवश्यक वय मर्यादा –
या भरती प्रक्रियेसाठी वयाची मर्यादा ही 56 वर्ष ठेवण्यात आली आहे. त्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचं वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावं, 56 वर्षाच्या आतील सर्व उमेदवार या पदासाठी पात्र असतील. सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग अधिकारी या दोघांसाठी विशेष पात्रता ठेवण्यात आली आहे.
इतके मिळणार वेतन –
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

असा करा अर्ज –
1. रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी www.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
2. विभागाने दिलेला अर्ज डाऊनलोड करुन भरा.
3. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करावा लागेल.
4. सर्व माहिती अचूक भरा. (UIDAI Recruitment 2024)
5. अर्जासोबत योग्य कागदपत्रे जोडा.
6. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवा.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – (UIDAI Recruitment 2024)
संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.uidai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HURL Recruitment 2024 : मॅनेजर, इंजिनीअर, ऑफिसर पदावर HURL मध्ये मोठी भरती सुरू; महिना 7 लाख ते 24 लाख पगार

HURL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान उर्वरक अ‍ॅण्ड रसायन लिमिटेड (HURL Recruitment 2024) म्हणजेच HURL अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध जागांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. HURLच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. पाहूया भरतीचा तपशील सविस्तर….

संस्था – हिंदुस्थान उर्वरक अ‍ॅण्ड रसायन लिमिटेड (HURL)
भरली जाणारी पदे –
1. मॅनेजर
2. इंजिनीयर
3. ऑफिसर
पद संख्या – 80 पदे
वय मर्यादा – (HURL Recruitment 2024)
३० ते ४७ वर्षे

मिळणारे वेतन –
1. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) – २४ लाख रुपये
2. मॅनेजर (Manager) – १६ लाख रुपये
3. इंजिनीयर, ऑफिसर – ७ लाख रुपये
4. सहायक व्यवस्थापक (एफटीसी) {Assistant Manager (FTC)} – ११ लाख रुपये
5. ऑफिसर एफटीसी (Officer FTC) – ७ लाख रुपये

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम hurl.net.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. करिअर बटणावर क्लिक करून नोकरीच्या संधींवर क्लिक करा
3. एक नवीन पेज उघडेल तेथे रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करा.
4. तेथील सूचना काळजीपूर्वक (HURL Recruitment 2024) वाचा आणि अर्ज भरा.
5. सबमिशन केल्यावर एक Unique क्रमांक तयार केला जाईल.
6. त्यानंतर आवश्यक अर्ज शुल्क भरा.
7. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

निवड प्रक्रिया –
1. उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित असेल.
2. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
3. संगणक आधारित चाचणी (CBT)
4. व्यापार चाचणी
5. दस्तऐवज पडताळणी
6. वैद्यकीय तपासणी

काही महत्वाच्या लिंक्स – (HURL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – hurl.net.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO ARDE Recruitment 2024 : ज्युनियर रिसर्च फेलो आणि अन्य पदावर भरती; DRDO अंतर्गत नोकरीची संधी

DRDO ARDE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक मोठी संधी (DRDO ARDE Recruitment 2024) निर्माण झाली आहे. शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (Armament Research and Development Establishment) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेविषयी सविस्तर…

संस्था – शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (Armament Research and Development Establishment)
भरले जाणारे पद –
1. ज्युनियर रिसर्च फेलो
2. रिसर्च असोसिएट
पद संख्या – 20 पदे (DRDO ARDE Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, आममिंट रिसर्च अँड डेव्हलमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), आममेिंट पोस्ट, पाषाण, पुणे ४११ ०२१
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 वर्षे

भरतीचा तपशील – (DRDO ARDE Recruitment 2024)

पदपद संख्या 
ज्युनियर रिसर्च फेलो19 पदे
रिसर्च असोसिएट01 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलोB.E./B.Tech.
रिसर्च असोसिएटPh.D

मिळणारे वेतन –

पदवेतन
ज्युनियर रिसर्च फेलोरु.३७,०००/-
रिसर्च असोसिएटरु.६७,०००/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज (DRDO ARDE Recruitment 2024) सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (DRDO ARDE Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAR IARI Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी!! भारतीय कृषी संशोधन संस्थेत ‘या’ पदावर नोकरीची संधी

ICAR IARI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये रिक्त (ICAR IARI Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन E-MAIL पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2024 आहे.

संस्था – भारतीय कृषी संशोधन संस्था
भरली जाणारी पदे –
1. रिसर्च असोसिएट (RA) – 4 पदे
2. वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) – 6 पदे
3. यंग प्रोफेशनल II (YP II) – 4 पदे
4. यंग प्रोफेशनल II IT- 1 पद
पद संख्या – 15 पदे (ICAR IARI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. रिसर्च असोसिएट (RA) – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पीएच.डी. पदवी असणे आवश्यक आहे.
2. सीनियर रिसर्च फेलो (SRF) – उमेदवाराकडे कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. (ICAR IARI Recruitment 2024)
3. यंग प्रोफेशनल II- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –
1. संशोधन सहयोगी (RA) – 40 वर्षे ते 45 वर्षे
2. वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) – 35 वर्षे ते 40 वर्षे
3. यंग प्रोफेशनल II – 21 वर्षे ते 45 वर्षे

मिळणारे वेतन – (ICAR IARI Recruitment 2024)
1. रिसर्च असोसिएट (RA) – रु. 54,000/- दरमहा
2. सीनियर रिसर्च फेलो (SRF) – रु. 35,000/- दरमहा
3. यंग प्रोफेशनल II – रु. 42,000/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – iari.res.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : भांडी विक्रेत्याची मुलगी IAS बनली; कोचिंग क्लासशिवाय मिळवली 17 वी रॅंक

UPSC Success Story of IAS Namami Bansal

करिअरनामा ऑनलाईन । नमामी बन्सल यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Success Story) परीक्षेचे कोचिंग घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तिने कोचिंगशिवायच परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. या प्रवासात तिला अनेक अपयशांचा सामना करावा लागला पण ती हरली नाही. यश खेचून आणत संपूर्ण भारतात 17 वा क्रमांक मिळवत ती आयएएस (IAS) अधिकारी बनली. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की, ‘जर कोणी आपल्या निर्णयावर ठाम असेल आणि त्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला त्याच्या मार्गावर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’ याचं मूर्तिमंत उदाहरण आहे नमामी बन्सल (IAS Namami Bansal). आज आपण तिच्या यशोगाथेविषयी जाणून घेणार आहोत… ज्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अनेक अपयश येऊनही हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करून अखेर आयएएस पद मिळवलंच.

वडील भांड्यांचे दुकान चालवायचे (UPSC Success Story)
नमामी बन्सल ही उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील रहिवासी आहे. नमामीच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांचे वडील राज कुमार बन्सल भांड्यांचे दुकान चालवत होते, यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. याशिवाय नागरी सेवांमध्ये करिअर करण्यासाठी नमामीच्या घरात वेगळे वातावरण नव्हते. तरीही तिने आपले शिक्षण गांभीर्याने सुरू ठेवले.

नमामी यांनी शाळेत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तिने नेहमीच प्रत्येक विषयात चांगले गुण मिळवले आहेत. ती पहिल्यापासून वाचनात आणि लेखनात खूप हुशार होती. पण जेव्हा तिने प्रत्यक्षात नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा तिला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. नागरी सेवा परीक्षेत (UPSC Success Story) तिला तिनवेळा अपयश आले. तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर त्यांनी कधीही हार मानली नाही आणि ती परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात संपूर्ण भारतातून 17 वा क्रमांक घेत UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली.

ग्रॅज्युएशननंतर केली नोकरी (UPSC Success Story)
नमामी यांचा जन्म ऋषिकेश येथे झाला आणि तिचे प्राथमिक शिक्षणही तिथेच झाले आहे. तिने 10वी मध्ये 92.4 आणि 12वी मध्ये 94.8 गुण मिळवले होते. या कामगिरीमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिचा अभिमान वाटत होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी पूर्ण करण्यासाठी ती दिल्लीत आली. येथे तिने अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली. ग्रॅज्युएशननंतर तिने काही काळ नोकरी केली आणि नंतर काही कारणांमुळे यूपीएससीकडे आपला मोर्चा वळवला.

कोचिंगशिवाय यश मिळवलं
नमामीसाठी यूपीएससी प्रवास खूपच कठीण होता आणि यामध्ये तिला (UPSC Success Story) यश मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. नमामीकडे UPSC कोचिंग घेण्यासाठी महागडे क्लास लावण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, म्हणून तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय या परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक अडथळे आले तरी तिने कधीही हार मानली नाही आणि अखेरीस तिची चौथ्या प्रयत्नात थेट IAS पदासाठी निवड झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com