Educational Scholarship : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती’; मिळणार USD 1 लाख इतका खर्च

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उच्च शिक्षणाच्या वाटचालीत शिष्यवृत्ती (Educational Scholarship) हा महत्त्वाचा भाग आहे. आज आपण अशाच काही शिष्यवृत्तीबाबत जाणून घेणार आहोत ज्या तुमचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर करतील. अशीच एक शिष्यवृत्ती आहे जी ‘इनलाक्स शिवदासानी फाऊंडेशन’ (Inlaks Shivdasani Foundation) कडून दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता येईल? यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? फाऊंडेशन पात्र विद्यार्थ्यांचा किती खर्च उचलणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढे वाचा….

शिष्यवृत्तीची रक्कम किती? कोणत्या परदेशी विद्यापीठात शिकता येणार?
१९७६ पासून, इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती ४८० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना यूएसए, यूके आणि युरोपियन संस्थांमध्ये पूर्ण-वेळ मास्टर्स, एमफिल किंवा डॉक्टरेट प्रोग्राममध्ये शिक्षण (Educational Scholarship) घेण्याण्यासाठी मदत करते. यामध्ये प्रोग्राम, शिकवणी, राहण्याचा खर्च, आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांचे एकेरी विमान भाडे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी अंदाजे खर्च USD १,००,००० पर्यंत असतो आणि हा खर्च संस्था उचलते. उच्च शिक्षणासाठी मदत देणाऱ्या या फाऊंडेशनची इम्पीरियल कॉलेज, लंडन, रॉयल कॉलेज ऑफ आर्ट (RCA), लंडन, केंब्रिज विद्यापीठ (केंब्रिज ट्रस्ट), किंग्ज कॉलेज लंडन (पीएचडी विद्यार्थ्यांसाठी) आणि हर्टी स्कूल, बर्लिन अशा विविध नामांकित विद्यापीठांसोबत संयुक्त-शिष्यवृत्ती व्यवस्था आहे.

‘हे’ विषय शिकता येणार (Educational Scholarship)
या फाऊंडेशनकडून सामाजिक विज्ञान, सार्वजनिक धोरण, कला आणि मानविकी विद्याशाखा या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच इंपीरियल कॉलेज, लंडन येथे अभियांत्रिकी आणि नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या अर्जांचाही विचार केला जातो. यासह डॉक्युमेंटरी, फिल्म मेकिंग व वेस्टर्न शास्त्रीय गायनाचा अभ्यास करणाऱ्या अर्जांचाही विचार केला जातो. थोडक्यात काय तर नेहमीच्या अभ्यासक्रमापेक्षा थोड्या वेगळ्या शाखांचा यामध्ये विचार केला गेला आहे; हे लक्षात येते.

काय आहे आवश्यक पात्रता –
1. १ जानेवारी १९९४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या आणि भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले सर्व भारतीय पासपोर्ट धारक जे अर्जाच्या वेळी भारतात रहिवासी आहेत असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील.
2. तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात असाल आणि निकालाची (Educational Scholarship) वाट पाहत असाल, तरी देखील तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात.
3. ज्या उमेदवारांनी परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून चांगली अंडरग्रॅज्युएट पदवी घेतली आहे आणि त्यांनी सतत वास्तव्य केलेले असेल किंवा नोकरी केली असेल त्यासोबत अंडर-ग्रॅज्युएशननंतर किमान दोन वर्षे भारतात शिक्षण घेतले असे विद्यार्थी देखील यासाठी पात्र आहेत.

आवश्यक किमान टक्केवारी/ग्रेड –
1. सामाजिक विज्ञान, मानविकी, कायदा, ललित कला, आर्किटेक्चर आणि संबंधित विषयांसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून किमान शैक्षणिक ग्रेड ६५ टक्के, CGPA ६.८/१०, किंवा GPA २.६/४ असणे आवश्यक आहे.
2. गणित, विज्ञान, पर्यावरण आणि संबंधित विषयांसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून किमान शैक्षणिक ग्रेड ७० टक्के, CGPA ७.२/१०, किंवा GPA २.८/४ असणे आवश्यक आहे. अशा गुणांसह तुम्ही या विविध कोर्ससाठी इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र आहात.

शिष्यवृत्तीसाठी अशी होणार निवड – (Educational Scholarship)
1. शिष्यवृत्तीसाठी यशस्वी अर्ज निवडण्यासाठी स्वतंत्र, इनलॅक्स निवड समिती नेमण्यात आली आहे.
2. अर्जदारांचे मूल्यांकन केवळ त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमान यशावरच नव्हे तर त्यांच्या भविष्यातील संभाव्यतेवर देखील केले जाते.
3. कला आणि डिझाइन (ललित/परफॉर्मिंग आर्ट्स) मध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे प्रामुख्याने त्यांच्या पोर्टफोलिओवर मूल्यांकन केले जाईल.

तीन टप्प्यात पार पडणार निवड प्रक्रिया –
1. पात्र अर्जांचे पुनरावलोकन
2. पुनरावलोकनातून निवडलेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन प्राथमिक मुलाखती आणि प्राथमिक मुलाखतीत यशस्वी झालेल्यांची अंतिम वैयक्तिक मुलाखत.
महत्वाची सूचना – विद्यार्थ्यांनी काही खास गोष्टींची मात्र काळजी व खबरदारी घ्यायची आहे. उमेदवारांना त्यांच्या ऑफर लेटरचा सशर्त भाग म्हणून इंग्रजी भाषेचे प्रमाणपत्र आहे त्यांनी (Educational Scholarship) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी ते प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. उमेदवारांना प्रवेशाची स्थगित ऑफर प्राप्त झाली आहे त्यांच्याकडे २०२४ शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी वैध ऑफर असणे आवश्यक आहे. परदेशातील संस्थेतून पदव्युत्तर पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत. जे उमेदवार आधीच शिकत आहेत किंवा परदेशातील संस्थेत त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सुरू केले आहे ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.
अधिकृत वेबसाईट – या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही www. inlaksfoundation. org वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com