Home Blog Page 107

NCERT Recruitment 2024 : NCERT अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

NCERT Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment 2024) परिषदे मार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 30 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 10, 11 आणि 13 मे 2024 रोजी (पदांनुसार) होणार आहे. पहा सविस्तर तपशील…

संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT)
पद संख्या – 30 पदे (NCERT Recruitment 2024)
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शैक्षणिक सल्लागार / Academic Consultant – 03 पदे
पात्रता – Post Graduation (पदव्युत्तर शिक्षण) NET/SET/SLET पात्र
2. द्विभाषिक अनुवादक / Bilingual Translator – 23 पदे
पात्रता – Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)
4. कनिष्ठ प्रकल्प फेलो / Junior Project Fellow – 04 पदे
पात्रता – Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)

वय मर्यादा – (NCERT Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 45 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 29,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 10, 11 आणि 13 मे 2024 (NCERT Recruitment 2024)
मुलाखतीचे ठिकाण – Section Officer (SO), Planning & Research Division (P&RD), Room No.242, CIET 2nd floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi-110 016

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
www.ncert.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Scheme : इथे हमखास मिळेल प्रत्येक हाताला काम; ‘या’ सरकारी योजनेबद्दल जाणून घ्याच

Government Scheme

करिअरनामा ऑनलाईन । देशातील नागरिकांना रोजगार उपलब्ध (Government Scheme) व्हावा या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना आखत असते. या योजनेद्वारे कौशल्य प्रशिक्षण देण्यापासून ते कर्ज उपलब्ध करुन देण्यापर्यंत तरतूद केली जाते; जेणेकरून गरजूंना निश्चित रोजगार मिळू शकेल. याशिवाय शासनाकडून रोजगारही उपलब्ध करून दिला जातो.

महाराष्ट्र रोजगार हमी योजना –
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शारीरिक श्रम करू शकणार्‍या सर्व नागरिकांना या (Government Scheme) योजनेचा लाभ मिळू शकतो. सन 1977 मध्ये महाराष्ट्र शासनाने बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार कायदा केला. या कायद्यांतर्गत २ योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्र रोजगार हमी योजना आहे.

असं आहे योजनेचं स्वरूप (Government Scheme)
या योजनेद्वारे बेरोजगार नागरिकांना १ वर्षाच्या कालावधीत 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गत मजुरीचे दर केंद्र सरकार ठरवते. ही योजना केंद्र सरकारने २००८ मध्ये संपूर्ण देशात लागू केली होती. देशभरात ही योजना ‘महात्मा गांधी रोजगार हमी कायदा’ म्हणून ओळखली जाते.

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
1. ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना वर्षभरात 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. जेणेकरून ते त्यांच्या दैनंदिन गरजा भागवू शकतील. या योजनेतून लाभार्थ्यांना अंगमेहनतीच्या स्वरूपात रोजगार मिळतो. (Government Scheme)
2. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिक सक्षम आणि स्वावलंबी होतील आणि त्यांचे जीवनमानही सुधारेल. विशेषत: ज्या कुटुंबांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा कुटुंबांना या योजनेद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
इथे मिळेल संपूर्ण माहिती –
https://egs.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना या सुविधा पुरविल्या जातात
1. ६ वर्षांखालील मुलांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आणि काळजी सुविधा.
2. मजूर किंवा त्याच्या मुलांना दुखापत झाली तर अशा परिस्थितीत संपूर्ण खर्च सरकार उचलेल. याशिवाय कर्मचार्‍यांना ५० टक्के पगारही दिला जाईल. अपंगत्व आल्यास (Government Scheme) किंवा मृत्यू झाल्यास ₹ 5 हजारची आर्थिक मदत देखील दिली जाईल.
3. ग्रामीण भागापासून ५ किमी अंतरावर काम दिल्यास, मजुरीच्या दरात १०% वाढ केली जाईल.
4. जर रोजगार उपलब्ध झाला नाही तर दैनंदिन मजुरीच्या २५% रक्कम बेरोजगारी भत्ता म्हणून दिला जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : सावधान!! निकालानंतर बँजो, फटाके, गुलाल उधळल्यास होणार कारवाई; भावी अधिकाऱ्यांना पोलिसांचा इशारा

Big News

करिअरनामा ऑनलाईन । कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणं हा क्षण (Big News) त्या उमेदवाराच्या आयुष्यातील अतुलनीय आनंदाचा क्षण समजला जातो. वर्षानुवर्षे, रात्रंदिवस कष्ट घेतल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. निकालाचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्युच्च आनंदाचा दिवस समजला जातो. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, मित्रांसाह डिजे किंवा बँजोच्या तालावर नाचताना आढळून येतात. पण आता सावधान!! यापुढील काळात असे प्रकार समोर आल्यास संबंधित उमेदवारावर गुन्हे दाखल केले जातील; असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भावी अधिकाऱ्यांना सूचना वजा इशारा देण्याची वेळ पोलीस प्रशासनावर येणे लज्जास्पद असल्याचे समितीने म्हटले आहे.

“स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवार ज्या पद्धतीने (Big News) विजयोत्सव साजरा करतात या पध्दती विरुद्ध आम्ही फार आधीपासून आहोत. मित्रांनो तुम्ही पोस्ट कष्टाने आणि संघर्षाने मिळवता यात शंका नाही, तुमच्या यशाचे कौतुक आहेच, तुमचं यश इतरांना प्रेरणादायी ठरावे त्रासदायक ठरू नये;” असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्स या सोशल मीडिया अकाऊंट वर म्हटले आहे.

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल, फटाके, कर्णकर्कश वाद्ये इत्यादींचा वारंवार वापर करताना निदर्शनास आलेले आहे. याचा आजूबाजूच्या रहिवाशांना प्रचंड त्रास होत असल्याने रहिवाशांनी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार केलेली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना तशी समज सुद्धा दिली आहे.

तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाचा आम्हाला सार्थ (Big News) अभिमान व आनंद आहे. आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की, आपण आपल्या यशाचा आनंद पेढे वाटून तसेच पुष्पगुच्छ देऊन साजरा करावा. यापुढे गुलाल, फटाके, कर्णकर्कश वाद्ये इत्यादींचा वापर केल्यास गुन्हे दाखल केले जातील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारचे मुजकूर असलेले फलक पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत.

सध्या देशात लग्न सराईचा हंगाम सुरू आहे; तसेच संपूर्ण (Big News) देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी, फटाक्यांची आतिषबाजी; जेसीबीतून गुलालाची उधळण तसेच डिजे, बॅण्ड-बँजोच्या तालावर तरुणाई बेभान होताना दिसते. तर दुसरीकडे असं चित्र आहे; की स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवार आनंदोत्सव साजरा करताना आढळला तर त्या उमेदवारावर गुन्हे दाखल केले जातील; असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भावी अधिकाऱ्यांना सूचना वजा इशारा देण्याची वेळ पोलीस प्रशासनावर येणे ही बाब लज्जास्पद आणि न पटणारी आहे; असं समितीने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RTE Admission 2024-25 : RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; अर्जासाठी त्वरा करा

RTE Admission 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राखीव (RTE Admission 2024-25) जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आधी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.

उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज कमी
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 76 हजार 52 शाळांमधील 8 लाख 86 हजार 411 जागांकरिता (RTE Admission 2024-25) मंगळवारी रात्रीपर्यंत केवळ 62 हजार 277 अर्ज आले होते. अधिकाधिक पालकांनी अर्ज भरावेत म्हणून मुदतवाढ दिल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

25 टक्के जागा राखीव (RTE Admission 2024-25)
RTE अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. यंदा प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांमधील प्रवेशाचा पर्याय प्राधान्याने दिसणार आहे.
संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तरच त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत आरटीई जागांवर प्रवेश मिळेल, असा नवा निर्णय सरकारने घेतला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIIT Nagpur Recruitment 2024 : प्राध्यापकांनो… इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी

IIIT Nagpur Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (IIIT Nagpur Recruitment 2024) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर माहिती…

संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक प्राध्यापक – CSE – 09 पदे
पात्रता – पीएच.डी. / एम. टेक. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा बी.टेक. आणि एम. टेक.
2. सहाय्यक प्राध्यापक – ECE – 02 पदे
पात्रता – पीएच.डी. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग किंवा बी.टेक. आणि एम. टेक.
3. अधिकारी (प्रशिक्षण आणि नियुक्ती) – 01 पद
पात्रता – पदवीधर (IIIT Nagpur Recruitment 2024)
पद संख्या – 12 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2024
मिळणारे वेतन – 60,000/- रुपये ते 65,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (IIIT Nagpur Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (PDF पहा)
अधिकृत वेबसाईट –
www.iiitn.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Update : MPSC कडून घेण्यात येणाऱ्या विमा सहायक संचालक पदांच्या मुलाखती ‘या’ दिवशी होणार; इथे पहा वेळापत्रक

MPSC Update (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून (MPSC Update) विमा सहायक संचालक सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती येत्या दि. 9 मे रोजी होणार आहेत. आयोगाच्या मुंबई येथील कार्यलयात या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक इथे करा डाउनलोड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विमा सहायक संचालक गट-अ पद संवर्गाच्या (MPSC Update) मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करता येईल. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

महत्वाची सूचना (MPSC Update) –
विमा सहायक संचालक निवड प्रक्रियेनुसार, मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील मुलाखत फेरीत उपस्थित रहावे लागेल. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार वेळापत्रक तपासू शकतात आणि त्यांना रोल नंबर, मुलाखतीची तारीख आणि वेळेनुसार उपस्थित राहावे लागेल. अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या रोल नंबर आणि नावानुसार उमेदवार मुलाखतीची तारीख आणि वेळ पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PERA CET 2024 Exam Date : खासगी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी ‘या’ तारखेला होणार ‘PERA CET’

PERA CET 2024 Exam Date

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील खासगी विद्यापीठांच्या (PERA CET 2024 Exam Date) प्रीमिनेंट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (PERA) वतीने दरवर्षीप्रमाणे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. 24 ते 26 मे दरम्यान PERA CET घेण्यात येणार आहे. खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी दि. 19 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे तर परीक्षेचा निकाल दि. 31 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे; अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली. पेरा सीईटीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी ही माहिती दिली. राज्यातील नामांकित २५ खासगी विद्यापीठांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.

‘या’ अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते प्रवेश परीक्षा (PERA CET 2024 Exam Date)
अभियांत्रिकी, जैवअभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी, मरीन इंजिनिअरिंग, कृषी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, फाइन आर्ट्स, डिझाइन, व्यवस्थापन, विधी आणि वास्तुविशारद यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.

‘पेरा सीईटी’बाबत अधिक माहितीसाठी www.peraindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

‘PERA’ अंतर्गत येणारी विद्यापीठे
एमआयटी-एडीटी, एमआयटी-डब्ल्यूपीयू, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, स्पायसर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमजीएम युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सोमैया विद्याविहार (PERA CET 2024 Exam Date) युनिव्हर्सिटी, विजयभूमी युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, जेएसपीएम युनिव्हर्सिटी, एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, जी.एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठ आणि संजीवनी विद्यापीठ.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे प्राध्यापकांच्या विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापकांसाठी नोकरीची उत्तम संधी (Job Notification) निर्माण झाली आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसापर्यंत अर्ज करता येणार आहे.

संस्था – डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
भरली जाणारी पदे – (Job Notification)
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहायक प्राध्यापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
E-MAIL ID– [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
डॉडॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे 411 018
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित (Job Notification) पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://dpu.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : अधिकारी, लेखापाल, लिपिक पदावर भरती सुरू; इथे आहे अर्जाची लिंक

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लि., नाशिक अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

संस्था – सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लि., नाशिक
भरली जाणारी पदे –
1. प्रशासकीय अधिकारी
2. लेखापाल
3. शाखा अधिकारी
4. अधिकारी
5. लिपिक
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल ते 14 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
वय मर्यादा – 30 वर्षे

अर्ज/परीक्षा फी – (Job Alert)
1. अर्ज मागविण्याचे शुल्क रु. ५००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ५९०/-
2. परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ९४४/- (Online Payment)
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्रशासकीय अधिकारी01
लेखापाल01
शाखा अधिकारी02
अधिकारी02
लिपिक10

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवीMS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
लेखापालमान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवीMS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
शाखा अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवीMS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course) (Job Alert)
अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवीMS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
लिपिकमान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवीMS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)

असा करा अर्ज –
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल ते 14 मे 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RUHS Recruitment 2024 : डेंटल मेडिकल ऑफिसर पदावर मोठी भरती सुरु; ‘इथे’ करा अर्ज

RUHS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू (RUHS Recruitment 2024) इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर तुम्ही या रिक्त जागेसाठी अर्ज करू शकता. राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठ (RUHS) जयपूरने अनेक रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ruhsraj.org वर भेट देऊन दंत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि पगाराबद्दल जाणून घ्या…

संस्था – राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जयपूर
या पदावर भरती सुरू –
राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, जयपूरमध्ये डेंटल मेडिकल ऑफिसरच्या एकूण 172 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. (RUHS Recruitment 2024)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2024

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RUHS Recruitment 2024)
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून बीडीएस पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय राजस्थान डेंटल कौन्सिलमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
दंत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा 22 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
मिळणारे वेतन – या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पगार म्हणून प्रत्येक महिन्याला 15,600 ते 39,100 रुपये दिले जातील.

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम संस्थेच्या अधिकृत वेबसाइट ruhsraj.org वर जा.
2. येथे मुख्यपृष्ठावर, ‘RUHS Bharti 2024’ या लिंकवर क्लिक करा.
3. सर्व आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
4. त्यानंतर विहित अर्जाची फी भरा. (RUHS Recruitment 2024)
5. अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट करा.
6. पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – ruhsraj.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com