RTE Admission 2024-25 : RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; अर्जासाठी त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राखीव (RTE Admission 2024-25) जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आधी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.

उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज कमी
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 76 हजार 52 शाळांमधील 8 लाख 86 हजार 411 जागांकरिता (RTE Admission 2024-25) मंगळवारी रात्रीपर्यंत केवळ 62 हजार 277 अर्ज आले होते. अधिकाधिक पालकांनी अर्ज भरावेत म्हणून मुदतवाढ दिल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

25 टक्के जागा राखीव (RTE Admission 2024-25)
RTE अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. यंदा प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांमधील प्रवेशाचा पर्याय प्राधान्याने दिसणार आहे.
संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तरच त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत आरटीई जागांवर प्रवेश मिळेल, असा नवा निर्णय सरकारने घेतला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com