UGC-NET Exam Calendar 2024 : UGC-NET चे वेळापत्रक पुन्हा बदलले; कधी होणार परीक्षा?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । येत्या 16 जून रोजी होणारी विद्यापीठ अनुदान (UGC-NET Exam Calendar 2024) आयोगाची नेट परीक्षा येत्या 18 जून रोजी घेण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे आलेल्या उमेदवारांच्या विनंत्या आणि अभिप्राय यांचा विचार करुन NTA एकाच दिवशी संपूर्ण भारतभर OMR मोड (OMR mode) मध्ये UGC-NET परीक्षा आयोजित करणार आहे. याबाबत NTA लवकरच औपचारिक अधिसूचना जारी करणार आहे.

जे उमेदवार चार वर्ष/ 8 सेमिस्टर बॅचलर डिग्री प्रोग्राम करत आहेत आणि त्यांच्या शेवटच्या सेमिस्टर/वर्षात आहेत ते देखील नेट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. जगदीश कुमार यांनी दिलेल्या (UGC-NET Exam Calendar 2024) माहितीनुसार, पात्रतेमध्ये चार वर्षांचा किंवा आठ-सेमिस्टरचा बॅचलर पदवी प्रोग्राम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. ज्यांना एकूण किमान 75 टक्के गुण किंवा बिंदू स्केलवर समतुल्य ग्रेड असणे आवश्यक आहे, जेथे ग्रेडिंग सिस्टमचे पालन केले जाते.

या तारखेला होणार परीक्षा (UGC-NET Exam Calendar 2024)
याबाबतची अधिकृत माहिती UGC चेअरमन एम.जगदीश कुमार यांनी आपल्या ‘एक्स’ या अकाउंट वर शेअर केली आहे. पुढील माहितीची NTA लवकरच औपचारिक अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. UPSC CSE परीक्षा 16 जून रोजी होणार आहे. हा वाद टाळावा यासाठी एनटीएने हा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com