UIDAI Recruitment 2024 : परीक्षा नाही, अर्ज फी नाही… आधार कार्ड तयार होणाऱ्या कंपनीत नोकरीची संधी; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी (UIDAI Recruitment 2024) एक उत्तम संधी चालून आली आहे. आधार कार्ड (Aadhar Card) तयार करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI मध्ये नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लगेच अर्ज करुण या संधीचा फायदा घ्यायचा आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

UIDAI अंतर्गत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परीक्षेशिवाय यामध्ये नोकरी मिळवता येणार आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात (UIDAI Recruitment 2024) आलं आहे. सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी वयोमर्यादा 56 वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज 13 जून पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या (UIDAI Recruitment 2024)
www.uidai.gov.in
या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार अधिसूचना पाहू शकतात. ही भरती ऑफलाइन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना पूर्ण मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे; पण उमेदावाराला कागदपत्रे आणि वैद्यकीय पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे.

आवश्यक वय मर्यादा –
या भरती प्रक्रियेसाठी वयाची मर्यादा ही 56 वर्ष ठेवण्यात आली आहे. त्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचं वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावं, 56 वर्षाच्या आतील सर्व उमेदवार या पदासाठी पात्र असतील. सहाय्यक लेखाधिकारी आणि विभाग अधिकारी या दोघांसाठी विशेष पात्रता ठेवण्यात आली आहे.
इतके मिळणार वेतन –
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

असा करा अर्ज –
1. रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी www.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
2. विभागाने दिलेला अर्ज डाऊनलोड करुन भरा.
3. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करावा लागेल.
4. सर्व माहिती अचूक भरा. (UIDAI Recruitment 2024)
5. अर्जासोबत योग्य कागदपत्रे जोडा.
6. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवा.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – (UIDAI Recruitment 2024)
संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.uidai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com