करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नियमित अर्ज ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत, तर विलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने ९ ते १६ डिसेंबर आणि अतिविलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने १७ ते २३ डिसेंबरपर्यंत भरता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.
NMMS Scholarship Exam 2021
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेसाठी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अर्ज करता येतो. शाळेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया www.mscepune.in आणि http://nmms.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर करता येणार आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येते. राज्यात १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा यात समावेश असतो. पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे.
प्रत्येक पेपर हा ९० गुणांचा असून, यात पात्रता गुण ४० टक्के मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२ टक्के असा निकष आहे. संबंधित परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेमार्फत सांगण्यात आले.
अधिकृत वेबसाईट – www.mscepune.in
अधिकृत वेबसाईट – http://nmms.mscescholarshipexam.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी
12 वी पास असणार्यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती