NIA MHA Recruitment 2022 : NIA मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी!! गृह मंत्रालयाने ‘या’ पदावर जाहीर केली भरती; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन। गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय तपास संस्थेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (NIA MHA Recruitment 2022) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक (SO/OS), सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक ग्रेड 1 आणि उच्च विभाग लिपिक (UDC) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – गृह मंत्रालय राष्ट्रीय तपास संस्था (Ministry of Home Affairs – National Investigation Agency)

भरली जाणारी पदे –

 1. विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक (Section Officer/Office Superintendent SO/OS)
 2. सहाय्यक (Assistant)
 3. लेखापाल (Accountant)
 4. लघुलेखक ग्रेड 1 (Stenographer Grade 1)
 5. उच्च विभाग लिपिक UDC (Upper Division Clerk UDC)

पद संख्या – 48 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NIA MHA Recruitment 2022)

 • वरील पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 • पात्रतेबाबतची अधिक माहिती NIA च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

मिळणारे वेतन –

 1. विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक (Section Officer/Office Superintendent SO/OS) – 44,900 ते 1,42,400 रुपये प्रतिमहिना
 2. सहाय्यक (Assistant) – 35,400 ते 1,22,400 रुपये प्रतिमहिना
 3. लेखापाल (Accountant) – 35,400 ते 1,22,400 रुपये प्रतिमहिना
 4. लघुलेखक ग्रेड 1 (Stenographer Grade 1) – 35,400 ते 1,22,400 रुपये प्रतिमहिना
 5. उच्च विभाग लिपिक UDC (Upper Division Clerk UDC) – 25,500 ते 81,000 रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

 1. Resume
 2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 3. शाळा सोडल्याचा दाखला (NIA MHA Recruitment 2022)
 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 6. पासपोर्ट साईझ फोटो
हे पण वाचा -
1 of 232

अर्ज करण्यासाठी पत्ता –

एसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –

india.gov.in

nia.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com