New Education Policy : यावर्षी कॉलेजच्या शिक्षणात होणार मोठे बदल; जाणून घेवूया नवीन धोरण

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल (New Education Policy) एज्युकेशन पॉलिसी ही टप्याटप्याने देशात लागू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षा धोरण लवकरच लागू होणार आहे. येत्या जूनपासून हे धोरण लागू होईल; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण यामुळे राज्यातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठे बदल होणार आहेत. नक्की कोणते असतील हे बदल जाणून घेवूया.

क्रेडिट पद्धत आणली जाणार (New Education Policy)
राष्ट्रीय शिक्षा धोरण हे महाराष्ट्रातील जवळपास अकरा विद्यापीठांमध्ये लागू केलं जाणार आहे; अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. त्यामुळे हे बदल राज्यातील सर्वच 11 विद्यापीठांमध्ये लागू केले जाणार आहेत. यामध्ये पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे क्रेडिट सिस्टम.
राज्यातील जे विद्यार्थी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा इतर काही कोर्सच्या पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाला असतील त्यांना क्रेडिट पद्धतीनं मार्क्स देण्याचा निर्णय घेण्यात (New Education Policy) आला आहे. म्हणजेच या विषयांमध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयांचे क्रेडिट मार्क्स ठरवून दिले जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात येणार आहेत. क्रेडिटचे हे मार्क्स सर्व विद्यापीठांसाठी सामान असणार आहेत; अशी माहिती देण्यात आली आहे.

डिग्री आणि ऑनर्स पदवी मिळणार
साधारणतः ग्रॅज्युएशन हे तीन वर्षांमध्ये पूर्ण होतं. मात्र ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतर ऑनर्सही करायचं आहे त्यांच्यासाठी मोठी खूशखबर आहे. कोणताही पदवी (New Education Policy) अभ्यासक्रमाचा 04 वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना डिग्री आणि ऑनर्स अशी पदवी मिळणार आहे.

मध्येच शिक्षण सोडणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाची संधी (New Education Policy)
काही कारणास्तव ज्यांना मध्येच शिक्षण सोडावं लागलं अशा विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण सोडल्यानंतर सात वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे यामध्ये ते जिथून शिक्षण सोडलं तिथून परत शिक्षण सुरु करु शकणार आहेत.

शिक्षणानुसार मिळणार प्रमाणपत्र
पहिल्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना UG प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तसंच दुसऱ्या वर्षानंतर म्हणजे चार सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा प्रमाणपत्र दिलं जाणार (New Education Policy) आहे. तर तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com