New Education Policy 2023 : मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा आग्रह; सप्टेंबर अखेर उपलब्ध होणार भाषांतरीत पुस्तके

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण व्हावं (New Education Policy 2023) यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही आहे. नव्या शिक्षण धोरणांनुसार मराठी (Marathi) भाषेत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने (Education Department) महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व विद्यापिठांमधील (University) विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पुस्तकं विद्यार्थ्यांना मराठीत देखील उपलब्ध होतील. त्यासाठी विद्यापीठांना सप्टेंबर अखेर मुदत  देण्यात आली आहे. हा निर्णय घेण्यात आल्यानंतरही अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तक उपलब्ध झाली नसल्याचं चित्र आहे. आता सप्टेंबर अखेर विज्ञान आणि वाणिज्य शाखेची मराठीत भाषांतर केलेली पुस्तकं विद्यापिठांना विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहेत.

शिक्षणात येणार नाही भाषेचा अडसर
शाळेत मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये इंग्रजी अभ्यासक्रम लवकर आत्मसात करण्यास अडचण निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेकदा अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाने (New Education Policy 2023) मातृभाषेतून शिक्षण घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजण्यास मदत होणार आहे. अभ्यासक्रमातील विविध बाबींच्या संदर्भासाठी मराठीत भाषांतर केलेली ही पुस्तकं उपयोगात पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

IIT मुंबई कडून उपलब्ध होणार भाषांतरीत पुस्तके
आयआयटी मुंबई (IIT Mumbai) कडून विद्यापीठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटी सोबत सामंजस्य करार देखील केले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने विद्यापीठांना भाषांतर करण्याचे निर्देश दिले आहेत. पण अर्ध शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आलं तरीही विद्यार्थ्यांना भाषांतर केलेली पुस्तकं उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे ही पुस्तकं लवकरात लवकर विद्यापीठांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहेत.
भाषांतराच्या कामास गती (New Education Policy 2023)
शिक्षण विभागाच्या या सूचनेमुळे भाषांतराचे काम वेगाने सुरु झालं आहे. तसेच या सूचनेमुळे विद्यापीठांना पुढील दोन आठवड्यांमध्ये विज्ञान (Science) आणि वाणिज्य (Commerce) शाखेतील किमान दहा पुस्तकं तरी भाषांतरीत करावी लागणार आहेत. तसे न झाल्यास शासनाकडून योग्य ती पावलं उचलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

शिक्षण विभागाकडून परित्रपक जारी
उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातले परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी विद्यापिठांना निर्देश दिले आहेत. सध्या (New Education Policy 2023) राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना मराठीतून पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com