१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । देशाचे संरक्षण करणाऱ्या लष्कर, नौदल आणि वायुदलातील अधिकारी घडवण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy) करते. तुम्ही नुकतीच बारावीची परीक्षा दिली असेल किंवा सध्या बारावीच्या परीक्षेला बसलेले असाल तर तुम्हाला सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे. एन. डी. ए. ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत . एनडीएत प्रवेश घेण्यासाठी एकूण तीन टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रथम किमान पात्रता गुणांसह लेखी परीक्षेस पात्र होणे गरजेचे आहे. त्यानंतर एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया या पदधतीने परीक्षा पार पडेल. पात्र आणि इच्छुक उमेवारांना प्रवेश परीक्षा अर्ज 28 जानेवारी 2020 पर्यन्त ऑनलाईन पदधतीने मागवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता-
१) वायुसेना आणि नेव्हल विंग्स (कॅडेट प्रवेश योजना) – भौतिकशास्त्र आणि गणिताचे मुख्य विषय असलेल्या                                                           मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण
२) नॅशनल डिफेन्स अकॅडमी आर्मी विंग – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी आणि                                                                     बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण
३) अविवाहीत आणि फक्त पुरुषच अर्ज करण्यास पात्र

शारीरिक पात्रता –
१) आयोगाने निश्चित केलेल्या शारीरिक मानकांनुसार अर्ज करणारे उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजेत.
२) शिस्तबद्ध कारणास्तव सशस्त्र दलाच्या कोणत्याही प्रशिक्षण अकादमींमधून राजीनामा देणे किंवा माघार घेणे या उमेदवारास अर्ज करण्यास पात्र मानले जाणार नाही.

वयाची अट – 16.5 ते 19.5 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक

फी – सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी 100 रुपये आहे. ST/SC/NCOs/Ors/Sons – फी नाही

परीक्षा पद्धत व तारीख –
१) एनडीए I ची परीक्षा 19 एप्रिल 2020 आणि एनडीए II ची परीक्षा 6 सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात येईल. लेखी पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल .
२) प्रश्नांचा प्रकार- परीक्षेच्या पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.
३) एकूण गुण- लेखी परीक्षा एकूण 900 गुणांची असेल (गणित – 300; सामान्य क्षमता चाचणी – 600). एसएसबी मुलाखत 900 गुणांची असेल.
४) भाषेचे माध्यम- प्रश्नपत्रिका इंग्रजी तसेच हिंदी भाषेतही उपलब्ध असेल.
५) वेळ कालावधी – पेपर पूर्ण करण्यासाठीचा कालावधी 5 तासांचा (प्रत्येकी 2½ तास) असेल.
६) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.33 टक्के वजा केले जाईल.

हे पण वाचा -
1 of 33

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2020

पहा जाहिरात –  Click Here (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज – Apply Here (www.careernama.com)

नोकरी विषयक माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”

Examination will be conducted by the UPSC on 19th April, 2020 for admission to the Army, Navy and Air Force wings of the NDA for the 145th Course, and for the 107th Indian Naval Academy Course (INAC) commencing from 2nd January, 2021.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: