MPSC Update : PSI होण्यासाठी तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी अशी असतील नवीन मानके

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे. स्वतःची (MPSC Update) लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता आणि स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीचा तपशील
1. गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण- १५
2. पुलअप्स- कमाल गुण – २० (MPSC Update)
3. लांब उडी- कमाल गुण- १५ (MPSC Update)
4. धावणे (८०० मीटर)- कमाल गुण – ५०

स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीचा तपशील
1. गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण- २०
2. धावणे (४०० मीटर) – कमाल गुण- ५०
3. लांब उडी- कमाल गुण- ३०

मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक गुण (सन 2022 परीक्षा)
शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के म्हणजे ६० गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

शारीरिक चाचणीत पात्र होण्यासाठी आवश्यक गुण (MPSC Update)
शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के म्हणजे ७० गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही. तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिका-याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. सदर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com