Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीसाठी असं असेल शारीरिक चाचणीचं मार्किंग पॅटर्न

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात अनेक वर्ष रखडून असलेल्या पोलीस भरतीने (Maharashtra Police Bharti) आता निवड प्रक्रियेत वेग घेतला आहे. राज्य सरकारकडून तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल 1 हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे या चाचणीमध्ये मार्किंग पॅटर्न नक्की कसं असेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर…

शारीरिक चाचणी (Maharashtra Police Bharti)

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक (Maharashtra Police Bharti) चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

गोळाफेक (पुरुष : 7.260 किलोचा गोळा)

गोळाफेक (पुरुष : 7.260 किलोचा गोळा) मिळणारे मार्क्स

8.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी – 15 गुण
7.90 मीटर ते 8.50 मीटर – 12 गुण
7.30 मीटर ते 7.90 मीटर – 10 गुण
6.70 मीटर ते 7.30 मीटर – 08 गुण (Maharashtra Police Bharti)
6.10 ते 6.70 मीटर 06 गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण
कमीतकमी 3.10 मीटर ते 3.70 मीटरपर्यंत – 1 गुण

गोळाफेक (महिला : 4 किलोचा गोळा)

गोळाफेक (महिला : 4 किलोचा गोळा) मिळणारे मार्क्स

6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी – 15 गुण
5.50 ते 6 मीटर – 12 गुण
5 ते 5.50 मीटर – 10 गुण
4.50 ते 5 मीटर – 5 गुण
4 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण 4.50 मीटरपेक्षा कमी – 3 गुण
4 मीटरपेक्षा कमी गुण नाही

100 मीटर धावणे (पुरुष) (Maharashtra Police Bharti)

100 मीटर धावणे (पुरुष) मिळणारे मार्क्स

11.50 सेकंद – 15 गुण
11.50 सेकंदापेक्षा जास्त व 12.50 सेकंदापेक्षा कमी – 12 गुण
12.50 सेकंद व 13.50 सेकंदापेक्षा कमी – 10 गुण
13.50 सेकंद ते 14.50 सेकंद – 8 गुण
14.50 ते 15.50 सेकंद – 6 गुण
15.50 ते 16.50 सेकंद – 4 गुण
16.50 ते 17.50 गुण – 1 गुण

100 मीटर धावणे (महिला)

100 मीटर धावणे (महिला) मिळणारे मार्क्स

14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 15 गुण
14 ते 15 सेकंद – 12 गुण
15 ते 16 सेकंद – 10 गुण
16 ते 17 सेकंद – 8 गुण (Maharashtra Police Bharti)
17 ते 18 सेकंद – 6 गुण
18 ते 19 सेकंद – 4 गुण
19 ते 20 सेकंद वेळ लागल्यास एक गुण

800 मीटर धावणे (महिला)

800 मीटर धावणे (महिला) मिळणारे मार्क्स

2 मिनिटे 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
2 मिनिटे 50 सेकंद ते 3 मिनिटे – 18 गुण
3 मिनिटे ते 3 मिनिटे 10 सेकंद – 16 गुण
3 मिनिटे 10 सेकंद ते 3 मिनिटे 20 सेकंद – 14 गुण
3.20 ते 3.30 मिनिटे – 12 गुण
3.30 ते 3.40 मिनिटे – 10 गुण
3.40 मिनिटे ते 3.50 मिनिटे – 8 गुण
3.50 मिनिटे ते 4 मिनिटे – 5 गुण

1600 मीटर धावणे (पुरुष) (Maharashtra Police Bharti)

1600 मीटर धावणे (पुरुष) मिळणारे मार्क्स

5.10 मिनिटे – 20 गुण
5.10 ते 5.30 मिनिटे – 18 गुण
5.30 ते 5.50 मिनिटे – 16 गुण
5.50 मिनिटे ते 6.10 मिनिटे – 14 गुण
6.10 ते 6.30 मिनिटे – 12 गुण
6.30 ते 6.50 मिनिटे – 10 गुण
6.50 ते 7.10 – 8 गुण
7.10 ते 7.30 मिनिटे – 5 गुण
ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण

अशा पद्धतीनं शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांना (Maharashtra Police Bharti) गुण दिले जाणार आहेत. तरी उमेदवारांनी यानुसार सराव करत राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com