Journalism Courses : पत्रकारितेची आवड आहे?? पुणे विद्यापीठात कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु 

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारीतेमध्ये करिअर करण्याची इच्छा (Journalism Courses) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर स्वतःचे प्रोफाईल तयार करून ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज विद्यापीठाकडे सादर करावे लागणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार 17 जून 2023 पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरु राहणार आहे.

प्रवेशासंदर्भात  महत्वाच्या लिंक्स – (Journalism Courses)
1. विद्यापीठाचे अधिकृत माहितीपत्रक – https://campus.unipune.ac.in/…/Revised_Notification… 
2. ऑनलाइन प्रवेश परीक्षेचा अर्ज – https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx
3. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक – https://campus.unipune.ac.in/…/Revised_Notification…

महत्त्वाच्या तारखा –
1. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 17 जून 2023 (Journalism Courses)
2. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची अखेरची मुदत – 8 जुलै 2023
3. एमए-जेएमसीसाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षेची तारीख व वेळ – 24 जुलै 2023 (दुपारी 2 ते 4)

तसेच कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विभागाच्या प्रवेश परीक्षेविषयी, तसेच या विभागातील इतर अभ्यासक्रमांविषयी http://www.unipune.ac.in/…/communication…/default.htm या लिंकवर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com