Job Fair 2023 : सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात होतोय रोजगार मेळावा; 1200 उमेदवारांना मिळणार नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील बेरोजगार (Job Fair 2023) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 डिसेंबर 2023 रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यातून सुमारे 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. पाहूया तपशील…

संस्था – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा
मेळावा – पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
पद संख्या – 1200 पदे (Job Fair 2023)
मेळाव्याची तारीख – दि. 15 डिसेंबर 2023
मेळाव्याचा पत्ता – (Job Fair 2023)
कृष्णाकाठ इन्स्ट्ट्यिुट फॉर स्किल डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च, कराड नगरपरिषद जवळ, कराड

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 8 वी, 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल, अर्धकुशल कामगार
संपर्क क्रमांक – (02162) 239938
(सूचना – इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थितरहायचे आहे. काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवहनही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिकृत वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com