IAS Success Story : तब्बल 8 वेळा नापास होवूनही मानली नाही हार; अखेर IAS झालाच; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। आपण पाहतो कि एक-दोनदा स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतर (IAS Success Story) अनेकजण या परीक्षेची तयारी करणं सोडून देतात. मात्र, देशातील सर्वांत कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्यांनी हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. आठव्या प्रयत्नात UPSC च्या परीक्षेत यश मिळवत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसमोर त्यांनी आदर्श ठेवलाय. ती व्यक्ती म्हणजे IAS Officer वैभव छाबडा.

मिळवलं AIR 32 रँकिंग

यूपीएससी ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे, आणि त्यात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत जे या परीक्षेत नापास झाल्यावर निराश होऊन तयारी सोडून देतात. मात्र, वैभव छाबडा यांना या परीक्षेत तब्बल आठ वेळा अपयश आल्यानंतरही हिंमतीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर 2018 साली या परीक्षेत त्याने संपूर्ण भारतातून 32 वा क्रमांक मिळवला आहे.

IAS Vaibhav chhabada

‘मी बॅक बेंचर विद्यार्थी’ (IAS Success Story)

दिल्लीत राहणार वैभव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. त्यांच्या शिक्षणातील प्रवासाविषयी ते सांगतात; “मी सुरुवातीचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं होतं. पण मला अभ्यासात अजिबात रस नव्हता. सुरुवातीपासून मी बॅकबेंचर विद्यार्थी होतो. मला बीटेक पूर्ण करण्यासाठी 5 वर्षं लागली तरीही मला केवळ 56 टक्केच गुण मिळाले होते.”

अपघातात जखमी होवूनही न खचता केला अभ्यास

बीटेक पूर्ण केल्यानंतर वैभव यांनी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फिजिक्स विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. या वेळी त्यांच्या मनात पहिल्यांदाच यूपीएससीची परीक्षा देण्याचा विचार आला, आणि शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. यूपीएससीची तयारी करताना त्यांना तब्बल 8 वेळा अपयश आलं; पण त्यांनी हिंमत (IAS Success Story) सोडली नाही. याच काळात, त्यांचा अपघात झाला, व त्यात पाठीला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट सांगितली होती. या कठीण काळातही त्यांनी अभ्यास थांबवला नाही. अखेर वैभव यांच्या कष्टाला यश आलं, व ते 2018 मध्ये यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले.

IAS Vaibhav Chhabada

या यशानंतर वैभव म्हणतात, “तुमचं मनोधैर्य कधीही खचू देऊ नका आणि ध्येय मिळवण्यासाठी लढत राहा.” वैभव छाबडा यांनी दिलेला हा सल्ला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी खूपच मोलाचा आहे. देशामध्ये सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. काही जण परीक्षेत पास होतात तर काहींना अपयश येतं. अशातच वैभव छाबडा यांनी या परीक्षेत मिळवलेलं यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com