HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या.

नालासोपा-याच्या भंडार आळीत राहणा-या आकांक्षा आणि अक्षता ठाकूर या जुळ्या बहिणी वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात विज्ञान शाखे शिकतात. गुरूवारी आलेल्या बारावीच्या निकालात आकांक्षाला ९२.९२ टक्के तर अक्षताला ९०.७६ टक्के गुण मिळाले. आकांक्षाला तर गणिता शंभरापैकी शंभर गुण मिळाले आहेत.

इयत्ता दहावीला देखील त्यांनी असेच यश मिळवले होते. दहावीला होलीक्रॉस शाळेतून अक्षता आणि आकांक्षा अनुक्रमे ९४.८० आणि ९४.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या. सलग दुस-या महत्वाच्या परीक्षेत दोन्ही जुळ्या बहिणींनी नव्वदीपार बाजी मारली आहे. आकांक्षाला वास्तुविशारद व्हायचं आहे तर अक्षताला लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन सनदी अधिकारी बनायचं आहे.

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com