How to Make Resume : तुम्हाला स्वप्नातील नोकरी मिळवायची आहे? उत्तम रेझ्युमे कसा बनवायचा? जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या स्पर्धात्मक जॉब मार्केटमध्ये, रेझ्युमे (How to Make Resume) हे केवळ एका कागदापेक्षा बरेच काही आहे. ही तुमच्या व्यक्तिमत्वाची पहिली छाप आहे आणि स्वप्नातील नोकरीसाठी एक आवश्यक साधन आहे. तुम्हालाही 2024 मध्ये तुमची स्वप्नवत नोकरी मिळवायची असेल, तर एक चांगला रेझ्युमे कसा तयार करायचा ते येथे जाणून घेवूया.. जर तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करताना इतरांपेक्षा पुढे राहायचे असेल, तर तुम्ही नोकरीच्या प्रकारानुसार आणि कंपनीच्या गरजेनुसार वेळोवेळी तुमचा बायोडाटा अपडेट करत राहणं महत्वाचं ठरणार आहे.

रेझ्युमे बनवताना ATS ची मदत घेणं ठरेल फायद्याचं
जर तुमचा रेझ्युमे नोकरीच्या गरजेनुसार तयार केला (How to Make Resume) असेल तर त्याचा मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होईल. रेझ्युमे तयार करण्यासाठी, तुम्ही ATS म्हणजेच ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम ऑप्टिमाइज्ड रेझ्युमेची (Optimize Your Resume for Applicant Tracking Systems) मदत घेऊ शकता. देशभरात भरतीची क्रिया वाढत असताना आणि भर्ती करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन केलेले एटीएस-ऑप्टिमाइज्ड रेझ्युमे, हे नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

कोणत्या गोष्टी हायलाइट करायच्या? (How to Make Resume)
– फ्रेशर म्हणून तुमचा पहिला रेझ्युमे तयार करताना, शैक्षणिक यश, इंटर्नशिप, संबंधित प्रकल्प आणि प्रमाणपत्रे याबद्दल लिहिण्यावर लक्ष केंद्रित करा.
– सॉफ्ट स्किल्समध्ये तांत्रिक प्रवीणता तसेच टीमवर्क आणि समस्या सोडवणे यांचा समावेश होतो.
महाविद्यालयीन प्रकल्प किंवा अभ्यासेतर क्रियाकलापांचा उल्लेख करायला विसरू नका; या गोष्टी तुम्हाला वेगळे सिद्ध करण्यास आणि तुमचे बहुआयामी व्यक्तिमत्व दाखवण्यात मदत करतात.

रेझ्युमेसाठी योग्य फॉरमॅट निवडा
फ्रेशर्स उमेदवारांसाठी एक पानाचा रेझ्युमे आदर्श ठरतो. सुरुवात तुमच्या नावाने करा, त्यानंतर संपर्काचा तपशील, सारांश शीर्षक, आकर्षक परिचय, शिक्षण आणि कोणताही (How to Make Resume) व्यावसायिक अनुभव, कौशल्ये आणि अतिरिक्त यश या गोष्टींचा उल्लेख करा. तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात त्यानुसार क्रम तयार करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com