How to Become Lawyer : वकिली क्षेत्रात होवू शकते उत्तम करिअर; कसं व्हायचं वकील? काय असते पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । वकिली क्षेत्रात उत्तम करिअर (How to Become Lawyer) होवू शकते. आपल्या देशात वकिली करणे हा उत्तम व्यवसाय मानला जातो. चाणाक्ष आणि प्रसिध्द वकील होण्याचे स्वप्न लाखो तरुण उराशी बाळगतात. तुम्‍हीही असे स्‍वप्‍न पाहत असाल आणि लोकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तुम्हाला लढायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही 12वी झाल्या नंतरच या क्षेत्रात करिअर करण्‍याचा विचार करू शकता. जर तुम्ही बॅचलर डिग्री मिळवली असेल तर तुम्ही कायद्याचा अभ्यास करु शकता. जर तुमचेही लोकांना हक्क आणि न्याय मिळवून देण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही या क्षेत्रात तुमचे करिअर घडवू शकता. पाहूया अधिक माहिती…

वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी अशी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
वकील होण्यासाठी तुम्ही 12वी किंवा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. बारावीनंतर विद्यार्थ्यांना पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, तर पदवीनंतर तीन (How to Become Lawyer) वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. जर
12वीनंतर सुरु करता येईल अभ्यास
कायद्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही बारावी पास असणे आवश्यक आहे. बारावीनंतर तुम्ही पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला BA LLB, BBA LLB, B.Tech LLB, B.Com LLB आणि B.Sc LLB मध्ये प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेत सहभागी व्हावे लागते. पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, तुम्हाला CLAT, LSAT India, AILET किंवा SET साठी हजर रहावे लागेल.

तीन वर्षे LLB करण्यासाठी ही आहे पात्रता (How to Become Lawyer)
तुम्ही जरी 12वी पूर्ण केली असेल आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करणार असाल तरीही तुम्ही कायद्याचा अभ्यास करू शकता. पदवीनंतर तुम्ही एलएलबीच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. LLB अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, तुम्ही LSAT India, DU LLB, MHT CET किंवा BHU LLB सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये भाग घेऊ शकता.
प्रवेश प्रक्रियेविषयी
तसेच अनेक खाजगी आणि सरकारी विद्यापीठे या अभ्यासक्रमांना (How to Become Lawyer) थेट किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश देतात. जर तुम्ही वर सांगितलेल्या परीक्षेत यशस्वी झाला नाही, तरी तुम्ही थेट पद्धतीने किंवा विद्यापीठ स्तरावर आयोजित केलेल्या प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com