High Salary Government Jobs : परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी; ‘इथे’ होणार मुलाखत; पगार तब्बल 89 हजार

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (High Salary Government Jobs) प्रत्येकजण धडपडतोय. या तुमच्या प्रयत्नांना आम्ही हातभार लावणार आहोत. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, AIIMS ने वैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, तर पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे.

या पदावर होणार भरती
AIIMS भोपाळमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हा करार आणखी 6 महिने किंवा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. या भरतीअंतर्गत एकूण 4 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 पद अनारक्षित आहे. प्रत्येकी एक पद SC, ST, OBC आणि EWS साठी राखीव आहे.

काय आहे पात्रता (High Salary Government Jobs)
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MBBS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय कमाल 40 वर्षे असावे. आरक्षणाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
अशी होणार निवड
या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. या पदासाठी 16 नोव्हेंबर रोजी मुलाखत होणार आहे. उमेदवारांनी पुढे दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रासह हजर रहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता – सरदार वल्लभ भाई पटेल भवन, एम्स, साकेत नगर, भोपाल-462020

इतकी आहे अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 1000 रुपये शुल्क (High Salary Government Jobs) आकारण्यात आले आहे. तसेच SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
इतका मिळेल पगार 
निवड झाल्यानंतर या पदांसाठी मासिक वेतन 89,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com