Gramsevak : कसं व्हायचं ग्रामसेवक? किती मिळतो पगार? काय असतं काम? इथे मिळतील संपूर्ण डिटेल्स

करिअरनामा ऑनलाईन । आपण अगदी लहानपणापासून (Gramsevak) तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील हे शब्द ऐकत आले आहोत. खेडेगावात राहणाऱ्या अनेकांनी या लोकांचं कामही बघितलं असेल. गावाचा विकास करण्यात सर्वात मोठा वाटा ग्रामसेवकाचा असतो. अनेकांना ग्रामसेवक होण्याची इच्छा असते. हा ग्रामसेवक नक्की असतो तरी कोण? त्यांचं काम काय असतं? ग्रामसेवक होण्यासाठी कोणती पात्रता असणं आवश्यक असतं? तसेच त्यांना पगार किती मिळतो? या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला इथे मिळतील.  तुम्हालाही ग्रामसेवक व्हायचं असेल तर ही माहिती निश्चित तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

ग्रामसेवकाचं काम काय असतं?
ग्रामसेवक हा शासनाकडून नियुक्त केलेला शासकीय कर्मचारी असतो. गावातील विकासकामे चांगल्या पद्धतीने होत आहेत की नाही याचा अहवाल पंचायतीकडून मागवणे हे (Gramsevak) त्यांचं मुख्य काम असतं. याशिवाय शासन ज्या योजना गावाच्या विकासासाठी आणते त्या योजना गावातील लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. गावातील लोकांना कोणत्याही प्रकारची समस्या भेडसावत असेल तर या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचं कामही ग्रामसेवकाकडून केलं जातं.

ग्रामसेवक होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता (Gramsevak)
ग्रामसेवक होण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही ग्रामसेवक होण्यासाठी पात्र ठरू शकता.
आवश्यक वयोमर्यादा
ग्रामसेवक होण्यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असणं आवश्यक आहे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील लोकांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सरकारकडून सवलत दिली जाते.

ग्रामसेवक पदासाठी अशी होते परीक्षा
ग्रामसेवक होण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागते. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ग्रामसेवक बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण सरकारकडून दिलं जातं. प्रशिक्षण (Gramsevak) पूर्ण झाल्यानंतर, सरकार तुम्हाला बीपीएल अंतर्गत 100 लोकांना जोडण्याचं काम देते. हे प्रशिक्षण 6 महिन्यांचं असतं. त्यानंतर तुम्ही ग्रामसेवक होता.

किती मिळतो पगार?
ग्रामसेवकाला उत्तम पगार दिला जातो. एका ग्रामसेवकाला सुरुवातीच्या काळात 5200 ते 20,200 रुपयांपर्यंत पगार मिळतो तर ग्रेड पे 2400 असतो. याशिवाय इतर ग्रामसेवकांना (Gramsevak) शासनाकडून विविध प्रकारच्या शासकीय सुविधा दिल्या जातात. तसंच नुकतीच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात सरकारकडून दहा हजार रुपयांची वाढही करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com