करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी नोकरी (Exam Tips) करताना सरकारी भरती परीक्षेचा अभ्यास करत असतात. पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मकच आहे. या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स निश्चितच तुम्हाला उपयोगी पडतील. पाहूया…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला स्पर्धात्मक परीक्षा म्हटले जाते. भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येने तरुण उमेदवार परीक्षेचा अर्ज भरतात. अभ्यासासाठी जीवतोड मेहनत घेतात. पण फार कमी लोकांना यामध्ये यश मिळते. UPSC परीक्षा पास होण्यासाठी तीन टप्पे पार करावे लागतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन फेरीतून प्रत्येक उमेदवाराला जावे लागते. या परीक्षेसाठी काहीजण कोचिंग क्लासचा आधार घेतात तर काहीजण सेल्फ स्टडी करतात. अनेकजण घरापासून लांब राहून परीक्षेची तयारी करताना दिसतात. पण असेही काही उमेदवार आहेत जे नोकरी करत असताना ही परीक्षा देतात. त्यांच्यासाठी परीक्षेची तयारी करणे आव्हानात्मक असते. त्यामुळे नोकरीवर असणारे अनेकजण इच्छा असूनही या परीक्षेसाठी अर्जच करत नाहीत; तर काहीजण हे आव्हान धाडसाने स्वीकारतात.
पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणे म्हणजे तारेवरची कसरतच. या समस्येवर भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काही टिप्स दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी सांगितले आहे….
1. दिवसभर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असता. त्यामुळे सकाळी 3.30 वाजता उठून किमान 4 तास अभ्यास करा.
2. काम संपल्यानंतर अर्धा तास वाचन करा.
3. तुम्ही प्रवास करत असाल तर त्या वेळेचा योग्य वापर करा आणि या काळात अभ्यास करा.
4. तुमच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये अभ्यासाचे साहित्य ठेवा. जेणेकरून तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करता येईल. (Exam Tips)
5. वीकेंडला दहा तास अभ्यास करा.
6. आव्हानात्मक वाटणाऱ्या परीक्षेबाबत आत्मविश्वास मिळवण्यासाठी हे वेळापत्रक एक ते दोन वर्षे सतत पाळा. हिमांशू त्यागी यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
हिमांशू त्यागीच्या टिप्सला नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या टिप्सचे कौतुक केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी (Exam Tips) सांगितले की त्याच्या टिप्स व्यावहारिक आणि उपयुक्त आहेत. तर काही वापरकर्त्यांनी त्याच्या टिपांवर टीका केली आणि त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की त्याच्या टिप्स अवास्तव आणि अशक्य आहेत. त्यांनी त्याच्या सत्यतेवरही शंका घेतली आणि त्यांच्या ओळखीचा आणि पदाचा पुरावा मागितला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com