Digital Marketing : ‘Digital Marketing’ मिळवून देईल बक्कळ पैसा; पहा या क्षेत्रात कशी मिळते करिअरची संधी

करिअरनामा ऑनलाईन । इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही (Digital Marketing) उत्पादनाची जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आज आम्ही तुमच्यासोबत काही खास टिप्स शेअर करणार आहोत, ज्यानुसार तुम्ही या क्षेत्रात करिअर करु शकता.
हे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. जगातील निम्म्याहून अधिक गोष्टी आज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात करिअर करणे हा अतिशय फायदेशीर पर्याय आहे. ज्यांना डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे माहित नसेल त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.

सर्वाधिक स्कोप असणारे क्षेत्र (Digital Marketing)
सर्वप्रथम या क्षेत्रातील स्कोपबद्दल बोलायचे झाले तर आजच्या काळात या क्षेत्रात सर्वाधिक स्कोप आहे. आपण डिजिटल मार्केटिंगद्वारे आपलं उत्पादन सहज लोकांपर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळेच मोठमोठ्या कंपन्या आज चांगल्या पगारावर डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान असलेल्या लोकांना कामावर घेत आहेत.

असे होते मार्केटिंग
या क्षेत्रातील सोशल नेटवर्किंग साइट्सवरही मार्केटिंग तंत्राचा वापर केला जातो. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर दिसणाऱ्या जाहिराती हा त्याचाच (Digital Marketing) एक भाग आहे.
ईमेल मार्केटिंग देखील याचाच एक भाग आहे. ईमेल मार्केटिंग ईमेल पाठवून लोकांना टार्गेट केले जाते यानंतर लोकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर विशेष लक्ष दिले जाते.

ग्रोथ हॅकिंग
1. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, ज्याला आपण ग्रोथ हॅकिंग म्हणतो. यामध्ये कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी फायनान्सशी संबंधित संकल्पना, कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट (Digital Marketing) आणि इतर अनेक गोष्टींच्या टिप्स दिल्या जातात.
2. याव्यतिरिक्त एक गोष्ट आहे, इनबाउंड मार्केटिंग. यामध्ये कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून ग्राहकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.

अशी वाढते Viewersची संख्या (Digital Marketing)
डिजिटल मार्केटिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ (SEO) या माध्यमातून वेबपेजवर गुगल आणि याहूसारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून पेज व्ह्यू वाढवला जातो.
ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते 12वी किंवा पदवीनंतर हा कोर्स करू शकतात. हा कोर्स करून तुम्ही कंटेंट मार्केटर, कॉपी रायटर, कन्व्हर्जन रेट ऑप्टिमाइझर बनू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com