दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर वर या ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. #Duagainstonlineexamination असा ट्रेंड या विद्यार्थ्यांनी चालविला आहे.

 

दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीने ट्विट करून लिहिले आहे, ‘मॉक टेस्ट मध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. आपल्याला काय वाटते की, परीक्षेची वेळ काय होती? आम्ही उंदीर नाही आहोत. ज्यावर तुमच्या साईटचे परीक्षण केले जाईल.’ एका विद्यार्थ्याने लिहिले आहे, ‘आता कोणी या समस्यांचे निराकरण करणार आहे का? आम्हाला वाटते आहे एका आठवड्यानंतर आम्ही या परीक्षेला उपस्थित राहू शकू, कृपया #scrapOBE करा. आम्ही परीक्षेच्या विरोधात नाही आहोत, आम्ही त्या मुद्द्यांच्या विरोधात आहोत ज्यांचा आम्ही सामना करतो आहोत.

 

 

दिल्ली विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वागविणे हा वेडेपणा आहे, आमचे करिअर आणि मानसिक स्वास्थ्य दावणीला टांगून ओबीई घेऊन प्रशासन काय सिद्ध करू पाहते आहे? शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही या परीक्षेच्या विरोधात आहेत. याबरोबर हे काय सुरु आहे? ओबीई मॉकमध्ये प्रश्नपत्रिकाच मिळत नाही आहे आणि ओबीई मध्ये माहित नाही काय होईल. असे ट्विटही करण्यात आले आहे. तर काही मिम्स देखील शेअर केले जात आहेत.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा :  www.careernama.com