‘एकाग्रता’ : यशाची गुरुकिल्ली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लाईफस्टाईल फंडा । एकाग्रता ही आपले ध्येय साध्य करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आजच्या गुंतागुंतीच्या युगात आपण एकाग्रता विसरत चाललो आहे. यात तंत्रज्ञान याचा बऱ्यापैकी वाटा आहे. एकाग्रता म्हणजे आपण हाती घेतलेले किंवा ठरवले ध्येय यात पूर्ण लक्ष केंद्रित करणे होय. एकाग्रता देऊन केलेले काम याने स्मरणशक्ती ही चांगली राहते.

बऱ्याच वेळा आपण कामाची रुपरेखा आखतो, मात्र त्यात आपण भरकटुन जातो. घेतलेले काम हे अपूर्ण राहते. याला कारण म्हणजे आपण ते काम आपले शंभर टक्के प्रयत्न न देता केलेले असते. यात एकाग्रतेचा अभाव असतो. ही एकाग्रता टिकवून ठेवायची असल्यास आपण त्यात पूर्ण झोकुन देणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आपण हाती घेतलेल्या कामात नक्की यश संपादन करू.

हे पण वाचा -
1 of 60

एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी योगाभ्यास व ध्यानधारणा केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. शालेय जीवनात आपल्याला यांची चांगली सवय लागल्यास किंवा जितक्या लवकर आपण हे साध्य करू तेवढे याचे आपल्याला फायदे आहे. एकाग्रता ही आपल्याला व्यावहारीक कामात सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे आपण सदैव जागरूक अवस्थेमध्ये असतो.

सध्या एकाग्रता वाढविण्यासाठी अनेक छोट्या छोट्या कृप्त्या विकसित होत आहेत. यात मग प्रश्नमंजूषा, सुडोकू, शाब्दिक कोडी सोडवणे वा अन्य एखादी मोबाईल वर गेम खेळणे होय. याने आपली स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते , मनात येणारे असंख्य विचार याने नियंत्रित होतात व आपले लक्ष एका ठिकाणी व्यवस्थित केंद्रित होते.Get real time updates directly on you device, subscribe now.