Computer Courses for Government Jobs : सरकारी नोकरीसाठी कोण कोणते कॉम्प्युटर कोर्स आहेत आवश्यक? इथे मिळेल माहिती

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याचं (Computer Courses for Government Jobs) प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकजण सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यासक्रम निवडतात, मात्र गेल्या काही वर्षात संगणक आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकच अभ्यासक्रम करणे पुरेसे मानले जात नाही. आजच्या काळात संगणक आणि तंत्रज्ञानाने खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी क्षेत्रातही आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे आता अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये संगणक अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. तुम्हीही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर यासोबतच हे कॉम्प्युटर कोर्स तुम्हाला नोकरी मिळवण्यास मदत करतील. या अभ्यासक्रमांची माहिती या लेखात दिली आहे.

1. ‘O’ Level कॉम्प्युटर कोर्स
हा संगणक अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये तांत्रिक सहाय्यक अशा अनेक पदांवर भरतीसाठी पात्र ठरता. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU), भारतीय रेल्वे, बँकिंग, संरक्षण, SSC यासह अनेक भरतींमध्ये सहभागी होता येवू शकते. हा कोर्स तुम्ही पूर्णवेळ अभ्यासक्रमासोबत करू शकता.
2. CCC संगणक अभ्यासक्रम (Computer Courses for Government Jobs)
या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिन्यांचा असून त्याचे संपूर्ण नाव ‘Course on Computer Concepts’ असे आहे. हे केल्यानंतर, तुम्ही लिपिक, लघुलेखक, पटवारी इत्यादी पदांसाठी सरकारी नोकरीसाठी पात्र होवू शकता.

3. BCA (बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)
BCA हा पदवी अभ्यासक्रम आहे ज्याचा कालावधी 3 वर्षांचा आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. एसएससी, रेल्वे बँकिंग, महसूल विभाग, आयकर विभाग यासह हा कोर्स केल्यानंतर अनेक नोकऱ्या आहेत.
याशिवाय असे अनेक कोर्सेस आहेत जे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करू शकतात. यापैकी काही अभ्यासक्रम म्हणजे DEO (डेटा एंट्री ऑपरेटर), ADCA (Advance Diploma in Computer Application), B.Sc आणि M.Sc in Computer Science इ.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com