CBSE Results 2022 : ‘या’ तारखेला CBSE 10 वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । CBSE च्या इतिहासात प्रथमच, 10वी आणि 12वी दोन टर्ममध्ये विभागली (CBSE Results 2022) गेली. अभ्यासक्रमाचे दोन भाग केले गेले. अभ्यासक्रमाचा पहिला भाग टर्म 1 मध्ये आणि दुसरा अर्धा टर्म 2 मध्ये होता. टर्म 1 च्या परीक्षा MCQ-आधारित होत्या आणि टर्म 2 परीक्षा लेखी होती. गतवर्षी बोर्डाला परीक्षेशिवाय निकाल जाहीर करावे लागत असल्याने बोर्डाने नेहमीच्या परीक्षेच्या हंगामापूर्वी एक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यंदा ऑफलाईन परीक्षा घेऊनही अजून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. CBSE दहावीचा निकाल हा येत्या 22 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर यानंतर बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

लवकरच होणार अधिकृत घोषणा 

देशातील जवळपास सर्वच राज्य मंडळांचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे CBSE बोर्ड 10वी 12वीचा निकाल कधी लागेल याबाबत उत्सुकता कायम आहे. पण अद्याप निकालाबाबत अधिकृत अपडेट समोर आली नाही. दरम्यान, असे मानले जात आहे की सीबीएसई 10वी आणि 12वीच्या निकालांच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. CBSE दहावीचा निकाल हा येत्या 22 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर यानंतर बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकालाची सर्व तयारी पूर्ण – सूत्र

या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेस सुमारे 21 लाख विद्यार्थी बसले होते. ज्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलै महिन्यात निकाल जाहीर होईल. बोर्डाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार दहावी आणि बारावीच्या निकालाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रतींचे मूल्यांकन केल्यानंतर निकाल पोर्टलवर क्रमांक अपलोड करण्यात आला आहे.

येथे पहा निकाल –

cbseresults.nic.in

cbse.gov.in

parikshasangam.cbse.gov.in

कसा चेक कराल निकाल –

  • सर्वप्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.
  • येथे मुख्यपृष्ठावर जाऊन, CBSE 10वी निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पृष्ठ उघडेल, लॉगिन तपशीलांमध्ये रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • सबमिट केल्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • ते डाउनलोड करा आणि तपासा.
  • भविष्यासाठी निकालाची प्रिंट काढा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com