Career Success Story : भाडे भरले नाही तर घर सोडावे लागायचे; 2 शिलाई मशीनने केली सुरुवात; आज आहे देशातील श्रीमंत फॅशन डिझायनर

करिअरनामा ऑनलाईन । एक सामान्य गृहिणी ते 800 कोटींच्या (Career Success Story) कंपनीची मालकीण असा आहे अनीता डोंगरे यांचा प्रवास. ‘अनिता डोंगरे’ या नावाची भारतीय फॅशन जगतात सर्वाधिक चर्चा आहे. या प्रसिद्ध फॅशन डिझायनरची आताची जीवनशैली पाहिली तर कोणीही कल्पना करू शकत नाही की तिला तिच्या आयुष्यात कधीही वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला असेल. अनेक प्रसंगातून जात असताना आर्थिक अडचणींवर मात करत अनिता डोंगरे यांनी यश मिळवले आहे. आज ती जी काही आहे ती केवळ तिच्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर. आयुष्यात कोणकोणत्या वाईट प्रसंगांचा अनीता यांना सामना करावा लागला हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांच्यातील जिद्द पहिल्यानंतर तुम्हीही तुमच्यातील मरगळ झटकून आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करण्यास प्रवृत्त व्हाल.

15 व्या वर्षीच ठरवलं होतं फॅशन डिझायनर व्हायचं 
अनीता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्या जयपूरला जायच्या आणि तेथील महिलांना सुंदर आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले पहायच्या तेव्हा त्यांना खूप आनंद वाटायचा. त्यांची आई तिन्ही मुलांसाठी कपडे शिवायची. आईला कपडे शिवताना पाहून अनिताला या कामात रस निर्माण झाला. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी ठरवले होते की त्यांना फॅशनच्या दुनियेत प्रगती करायची आहे.

विरोध झुगारून सुरु केली इंटर्नशिप (Career Success Story)
सुट्टीच्या दिवशी आजी-आजोबांच्या घरी गेल्यावर त्यांना जाणवलं की स्त्रियांना पुरुषांइतकं स्वातंत्र्य मिळत नाही. अनिता डोंगरे यांचा जन्म एका सिंधी कुटुंबात झाला, जिथे महिलांना काम करण्याची मुभा नव्हती. पण अनीता यांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती होती. त्यांचे वडील मुंबईत असल्याने त्यांना यापेक्षा वेगळं वातावरण मिळालं होतं. याच कारणामुळे जेव्हा त्यांचा अभ्यास संपला आणि त्यांनी फॅशनच्या दुनियेत इंटर्नशिप करायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झाले होते. सर्वांनी त्यांना विरोध केला पण पालकांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्यांनी सर्वांचा विरोध झुगारला.
भाडे न भरल्याने जागा सोडावी लागायची
अनिता यांनी सुरवातीला बहिणीसोबत भाड्याने जागा घेऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे दोनच शिलाई मशीन होत्या. त्यांना त्यावेळी सर्व खर्च पेलवत नव्हता. त्यामुळे त्या वारंवार जागा बदलत असत. कधी जागेच्या भाड्यात वाढ झाल्यामुळे तर कधी घरमालकाने घराचे भाडे वेळेत न भरल्यामुळे घराबाहेर काढले.

स्वतःचा ब्रँड तयार केला
अनिता यांनी त्यांच्या कपड्यांच्या डिझाइन्स त्या काळातील नोकरदार महिलांना समोर ठेवून तयार केल्या होत्या. पण जेव्हा ती ही कपडे दुकानात घेऊन गेली तेव्हा सर्वांनी ते कपडे (Career Success Story) नाकारले कारण ते ट्रेंडनुसार नव्हते. वारंवार नकार मिळत असल्याने अनिता संतापल्या आणि त्यांनी स्वतःचा ब्रँड स्थापन करण्याची योजना आखली. आज त्यांची कंपनी AND Designs India Ltd मध्ये चार वेगवेगळ्या उप-कंपन्या काम करतात. त्यांची दुकाने भारतातच नाही तर परदेशातही सुरु आहेत. अनिता सकाळी 9 वाजता त्यांचे काम सुरु करतात जे दिवसभर अविरत सुरू असते. पण त्यांना अजूनही खंत वाटते की वेळ न घालवता हा ब्रॅंड आधीच सुरु करायला हवा होता. असे असले तरी त्या अजूनही त्यांच्या कामात आनंदी आहेत.

अनिता डोंगरे यांचा Net Worth
अनिता आता भारतातील सर्वात श्रीमंत फॅशन डिझायनर्सपैकी एक आहेत. त्यांच्या ग्राहकांच्या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि आंतरराष्ट्रीय (Career Success Story) पॉप गायिका बेयॉन्से यांचा समावेश आहे. एवढच नाही, तर बी-टाउन सेलिब्रिटींसोबतच परदेशातील प्रसिद्ध लोकही त्यांच्याकडून कपडे डिझाईन करुन घेतात. त्यांची कंपनी सध्या 1400 कोटी रुपयांची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com