Career Opportunities in Management : हे आहेत जास्त पगार मिळवून देणारे कोर्स; पहा PGDM आणि MBA मध्ये काय आहे बेस्ट?

करिअरनामा ऑनलाईन । व्यवस्थापनाच्या (Career Opportunities in Management) अभ्यासक्रमातील एमबीए आणि पीजीडीएम हे दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. दोन्ही अभ्यासक्रम अनेक बाबतीत समान जरी असले तरी यामध्ये काही प्रमाणात फरक पहायला मिळतो. या अभ्यासक्रमांतील मुख्य फरक सांगायचा झाल्यास; एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे तर पीजीडीएम हा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. आणखी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

MBA आणि PGDM मध्ये काय आहे फरक?
एमबीएमध्ये (MBA) शैक्षणिक आणि सैद्धांतिक ज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाते; तर पीजीडीएममध्ये (PGDM) रोजगाराभिमुख आणि व्यवसायानुसार व्यावहारिक ज्ञान शिकवले जाते. डिप्लोमा पदवीला संलग्नतेची आवश्यकता नसल्यामुळे, पीजीडीएम प्रमाणपत्र सामान्यतः स्वायत्त संस्थांमध्ये (Autonomous Institutions) दिले जाते. तर एमबीएची प्रमाणपत्रे पदवी विद्यापीठे आणि संलग्न संस्थांमध्ये दिली जातात.चांगल्या पगारासाठी आणि चांगल्या वस्तुस्थिती अशी आहे; की करिअरसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना व्यवस्थापन पदवी मिळवायची आहे. पण कोणती मॅनेजमेंटची पदवी सर्वोत्तम आहे आणि कोणती पदवी जास्त पगार मिळवून देईल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. हा गोंधळ कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला या दोन अभ्यासक्रमांशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

MBA की PGDM काय निवडायचं?
नोकरीच्या दृष्टिकोनातून, एमबीए आणि पीजीडीएम दोन्ही (Career Opportunities in Management) समान स्तराचे कोर्स आहेत, कारण उद्योगात दोन्ही अभ्यासक्रमांना समान मूल्य दिले जाते. तरीही एमबीएला जास्त मागणी आहे कारण हा पदवी अभ्यासक्रम आहे. डिप्लोमा ही पदवीइतकी मौल्यवान नसते असा सर्वसामान्य समज आहे. अभ्यासक्रमाचा विचार केला तर एमबीएचा अभ्यासक्रम विद्यापीठाने ठरवला असतो त्यामुळे अभ्यासक्रमात झटपट बदल होत नाहीत. तर पीजीडीएम अभ्यासक्रमांमध्ये संस्था त्यांच्या स्तरावर बदल करू शकतात. त्यामुळे ते अधिक लवचिक, प्रगत आणि आजच्या जॉब मार्केटच्या मागणीनुसार आहेत. कॉर्पोरेट उद्योगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या किंवा उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी पीजीडीएम अधिक योग्य असल्याचे तज्ञांचे मत आहे.

कोणाला मिळतो जास्त पगार (Career Opportunities in Management)
जॉब मार्केटमध्ये दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवळपास समान मूल्य आहे. अशा परिस्थितीत दोन्ही अभ्यासक्रम करणाऱ्यांच्या पगारात फारसा फरक नाही. उमेदवाराची (Career Opportunities in Management) कॉलेजमधील परफॉर्मन्स, त्याची स्वतःची क्षमता किंवा प्लेसमेंट यावर उमेदवाराचा पगार अवलंबून असतो. MBA किंवा PGDM हे दोन्ही कोर्स केल्यानंतर तुम्हाला जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळण्याची संधी आहे; हे निश्चित.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com