Career Opportunities in Intelligence Bureau : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ‘या’ पदावर घडवता येईल करिअर; पहा निवड प्रक्रिया आणि पात्रतेविषयी… 

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुण-तरुणींना (Career Opportunities in Intelligence Bureau) देशसेवा करायची आहे ते आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या सेवेत सामील होण्यासाठी प्राधान्य देतात. अनेकांना माहित आहे की देशाच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागात नोकरी मिळवणं हा तरुणांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुमच्यातही देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि ध्यास असेल आणि अशा क्षेत्रात करिअर करायचे असेल ज्यामध्ये तुम्हाला उत्तम पगरासोबतच देशसेवा करण्याची संधी मिळेल, तर इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB विभाग हा देशातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवून तुम्हाला देशसेवेबरोबरच प्रसिद्धीही मिळवता येते. IB मध्ये अनेक पदांवर थेट भरती केली जाते ज्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन या क्षेत्रात तुमचे करिअर घडवू शकता. पाहूया या विभागात कोणत्या पदावर भरती होते, यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते याविषयी…

या पदांवर थेट होते भरती
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये एक कार्यकारी म्हणून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) या पदासाठी थेट भरती केली जाते. या भरतीमध्ये सहभागी होऊन तुम्ही इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवू शकता. या व्यतिरिक्त, उमेदवारांना एसएससी (SSC) द्वारे दरवर्षी आयोजित केलेल्या संयुक्त पदवी स्तर (CGL) भरती परीक्षेद्वारे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी देखील मिळू शकते.

IB ACIO भरती (Career Opportunities in Intelligence Bureau)
हे अधिकारी स्तरावरील पद आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे निश्चित केले आहे. तर राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते. निवड प्रक्रिया पार करत असताना टियर 1 आणि टियर 2 या परीक्षा द्याव्या लागतात. दोन्ही टप्प्यांतील यशस्वी उमेदवारांना मुलाखत फेरी पार करावी लागते.
IB ASO भरती
SSO च्या पदांवर निवड होण्यासाठी, उमेदवारांना एकत्रित पदवी स्तर (CGL) परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेला पात्र होण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान (Career Opportunities in Intelligence Bureau) असावे. नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाते.
या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना प्रथम टियर 1 परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर टियर 2 परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. शेवटी उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेत हजर राहावे लागते. सर्व प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com