Career Mantra : खरं की काय?? ‘ही’ परदेशी विद्यापीठे देतात अगदी फ्री कोर्सेस; इथे आहेत सर्व डिटेल्स

करिअरनामा ऑनलाईन । वर्क फ्रॉम होमच्या जमान्यात आता (Career Mantra) तुम्ही घरबसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्स करू शकता. तुम्हाला माहीत आहे का जगभरातील नामांकित विद्यापीठे मोफत ऑनलाइन कोर्सेस करण्याची संधी देतात. तुम्हाला अगदी घरीच बसून हे कोर्स करता येतात आणि या माध्यमातून चांगल्या पगाराची नोकरीही तुम्ही मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विद्यापीठांची नावे सांगणार आहोत.
आजच्या बदलत्या युगात तुम्हाला स्वतःला सतत अपडेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची कौशल्ये वाढवत असताना पारंपारिक पदव्यांसोबत, काही सर्टिफिकेट कोर्स आणि ऑनलाइन पदव्या देखील घेणं फायद्याचं ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विद्यापीठांची नावे सांगणार आहोत.

1. हार्वर्ड विद्यापीठ – हे जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. इथे 600 हून अधिक विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करते. तुम्ही येथे हवामान (Career Mantra) बदलापासून न्यायापर्यंतचा अभ्यास करू शकता. संपूर्ण माहितीसाठी विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट द्या.
2. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया – येथे विविध क्षेत्रात मोफत ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. जसे बिझनेस रायटिंग इन इंग्लिश, इलेक्ट्रॉनिक्स इंट्रोडक्शन, इंटिग्रेशन गेम्स इत्यादि.

3. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – या विद्यापीठात अनेक वर्षांपासून ऑनलाइन अभ्यासक्रम चालवले जात आहेत. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी (Career Mantra) याच्या जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेतला आहे. डेटा स्टॅटिस्टिक्स, सप्लाय चेनची तत्त्वे यासारखे प्रगत अभ्यासक्रम करून तुम्ही तुमचे कौशल्य निश्चित वाढवू शकता.
4. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी – या युनिव्हर्सिटीमधून (Career Mantra) तुम्ही पत्रकारितेपासून ते पटकथा, खेळ कला कौशल्यांपर्यंतचे कोर्सेस करू शकता आणि घरबसल्या जागतिक दर्जाचा अभ्यास करू शकता.

5. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स – या विद्यापीठातूनही तुम्ही ग्राफिक डिझायनिंगसह अनेक उत्तम ऑनलाइन कोर्स करू शकता आणि तुम्ही तुमच्यातील क्रिएटिव्हिटीला नवी दिशा देवू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com