Career in Hotel Management : हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अशा आहेत करिअरच्या संधी; पहा कोर्स, पात्रता आणि इन्कमविषयी 

करिअरनामा ऑनलाईन । भारताची संस्कृती आणि परंपरा (Career in Hotel Management) यांच्याविषयी विदेशी लोकांना खास आकर्षण वाटतं. भारतात राज्या राज्यांमध्ये होणाऱ्या परंपरांचा बदल आपल्याला माहीती आहेच. प्रत्येक राज्याचं राहणीमान, त्यांची खाद्य संस्कृती, रुढी आणि परंपरा या इतर राज्यांपासून वेगळ्या असतात. आणि म्हणूनच आपल्याला नेहमीच शेजारच्या राज्याबद्दल कुतूहल असतं. या कुतूहला पोटीच भारतात पर्यटकांचं प्रमाण फारच वाढत आहे. आपल्या देशात अशी अनेक राज्यं आहेत जी पर्यटनामुळेच आपली आर्थिक वाढ करू शकतात. पर्यटकांच्या राहण्यासाठी अनेक हॉटेल्सची निर्मिती केली गेली आणि यातूनच हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सची सुरुवात झाली. तर काय आहे हॉटेल मॅनेजमेंट? ही डिग्री कशी मिळवावी? आणि हॉटेल मॅनेजमेंट ह्या कोर्स मधून आपल्याला करिअर घडवता येईल का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असल्यास नक्की वाचा…

कसा असतो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स? (Career in Hotel Management)
हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स हा हॉस्पिटालिटी इंडस्ट्रीचा (Hospitality Industry) एक भाग आहे. एखाद्या हॉटेलशी निगडित सर्व कामांची जबाबदारी घ्यायला हा कोर्स शिकवतो. रिसॉर्ट, हॉटेल यासारख्या ठिकाणी पर्यटक किंवा प्रवासी आश्रय घेत असतात. याच प्रवाशांच्या गरजा पुरवणं म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट. ज्यामध्ये पर्यटकाच्या राहण्यापासून त्यांच्या खाण्या पिण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते.

हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर या पदांवर काम करण्याची संधी मिळते –
१) हॉटेल मॅनेजर
२) रेस्टॉरंट मॅनेजर
३) हॉटेल डिरेक्टर
४) एक्झिक्युटिव्ह शेफ
५) हाउसकीपिंग मॅनेजर
६) इव्हेंट कोऑर्डिनेटर
याशिवाय तुम्ही क्लब मॅनेजमेंट, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, हॉटेल अँड टुरिझम असोसिएशन, हॉटेल अँड केटरिंग इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये करिअर घडवू शकता.

कसा असतो हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम?
हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स चार प्रमुख भागांमध्ये विभागलेला आहे ज्यात फूड अँड ब्रेवरीज सर्विस, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, सेल्स अँड मार्केटिंग, अकाउंटिंग यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.
भारतात अनेक कॉलेजेस मध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. डिग्री कोर्स हा किमान चार वर्षांचा असतो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट (Career in Hotel Management) स्किल्स शिकवल्या जातात. विशेषतः आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य कसं करावं, एखादा खाद्यपदार्थ आपल्या अतिथ्यांपर्यंत कसा पोहोचवायचा हे कोर्स अंतर्गत शिकवलं जातं .
याशिवाय विद्यार्थ्यांना काही महिन्यांसाठी इंटर्नशिप देखील करावी लागते ज्यामधून ते वर्गात शिकवलेल्या गोष्टींचा प्रत्यक्षात अनुभव घेतात.

12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा असल्यास कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवावा?
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचे असल्यास एमबीए (MBA) इन हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ टुरिझम अँड हॉटेल मॅनेजमेंट, एमएससी टुरिझम अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट यासारखे अनेक कोर्स केले जाऊ शकतात. कॉलेजच्या नियमांनुसार प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षांना देखील समोर जावं लागतं. कमीत कमी ५० टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 12वीनंतर हा कोर्स करता येतो.

भारतात नावाजलेली कॉलेजेस खालीलप्रमाणे आहेत –
१) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
२) भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी.
३) एस आर एम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
४) चंदीगड युनिव्हर्सिटी (Career in Hotel Management)
या कोर्सची फी सुमारे दीड लाख ते 2 लाख असते आणि हाच कोर्स जर तुम्हाला भारताबाहेर करायचा असेल तर किमान फी 10 ते 30 लाखांपर्यंत जाऊ शकते.
हॉटेल मॅनेजमेंट हे दिवसेंदिवस वाढणारं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात जम बसल्यानंतर 4 ते 5 लाख पर्यंत रुपयांची कमाई केली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com