Career After M.Com : M.Com पूर्ण झालंय? चांगली नोकरी शोधताय? ‘हे’ आहेत कोर्सचे बेस्ट ऑप्शन्स

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असाल (Career After M.Com) आणि या क्षेत्रात तुम्हाला चांगले करिअर घडवायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अनेक विद्यार्थी बी. कॉम. नंतर एम.कॉम. करतात आणि नंतर त्यांची नोकरी शोधण्यासाठी धावपळ सुरु होते. कॉमर्समध्ये मास्टर्स केल्यानंतर नोकरी मिळू शकते, पण खूप चांगली नोकरी मिळण्याची अपेक्षा ठेवणं अनिश्चित ठरू शकतं. अशावेळी समोर हा प्रश्न उभा राहतो, की एम.कॉम नंतर नक्की कोणता कोर्स करायचा? सध्या स्पर्धेच्या युगात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत; पण योग्य मार्गदर्शनाशिवाय सर्वोत्तम करिअरची निवड करणे अवघड होते. म्हणूनच आज इथे आपण काही अभ्यासक्रम पाहणार आहोत जे तुम्ही M.Com नंतर शिकू शकता. यामुळे तुम्हाला सर्वाधिक पॅकेजची नोकरी मिळवणे सोपे होवू शकते.

1. एमबीए प्रोग्राम (MBA)
पदवीधर तरुणांमध्ये एमबीए क्षेत्र हा सर्वात लोकप्रिय आणि आवडता कोर्स आहे. एमबीए (MBA) पदवी पूर्ण केल्यानंतर, तुम्ही व्यवस्थापकीय पदांसाठी पात्र होऊन तुमच्या करिअरमध्ये (Career After M.Com) चांगली प्रगती साधू शकता. भारतातील एमबीए पदवीधरांचे सरासरी प्रारंभिक पगार प्रति वर्ष 7.2 लाख रुपये इतके आहे.

2. ACCA अभ्यासक्रम (ACCA)
जर तुम्हाला अकाउंटिंगमध्ये रस असेल तर तुम्ही ACCA कोर्स करू शकता. असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट (ACCA) द्वारे ऑफर केलेली चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट पदवी करिअरमध्ये वाढ करण्यसाठी चांगली संधी देते.

3. सनदी लेखापाल (Chartered Accountant)
M.Com नंतर चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) हा करिअरचा सर्वोच्च पर्याय आहे. सीपीटी(CPT), आयपीसीसी(IPCC) आणि फायनलचे तीन स्तर पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला व्यावसायिक सराव करण्यासाठी 2.5 वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण करावी लागेल. सीए पदवीधरांचे सरासरी पगार वर्षाला ७.९ लाख रुपये इतके आहे.

4. कंपनी सचिव (Company Secretary) (Career After M.Com)
कंपनी सचिव सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या कायदेशीर अनुपालन आणि नियामक आवश्यकतांचे पालन करतात. सीएस (CS) कोर्समध्ये फाऊंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन फेऱ्या असतात. भारतातील CS ची पगाराची श्रेणी वार्षिक 4 ते 10 लाख रुपये आहे.

5. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)
डिजिटल मार्केटिंगमध्ये, उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल तंत्रांचा वापर केला जातो. आजच्या काळात सर्व प्रकारचे व्यवसाय मग ते लहान असोत किंवा मोठे, इंटरनेटच्या मदतीशिवाय वाढू शकत नाहीत.डिजिटल मार्केटिंगने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

6. CFA कोर्स (CFA)
चार्टर्ड आर्थिक विश्लेषक म्हणजेच Chartered Financial Analyst चे (Career After M.Com) तीन स्तर पूर्ण केल्यानंतर, तुम्ही सर्वोच्च जागतिक वित्तीय कंपन्यांसोबत काम करू शकता. चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्टचा सरासरी पगार प्रति वर्ष 6.6 लाख रुपये इतका आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com