Career After 12th : 12 वी नंतर काय? करा ‘हे’ डिप्लोमा कोर्स

करिअरनामा ऑनलाईन । बोर्डाच्या परीक्षा संपल्या असून (Career After 12th) आता विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत आहेत. काही दिवसानंतर निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल. सद्य परिस्थितीत 12वीचे विद्यार्थी पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. आज आम्ही या विद्यार्थ्यांना अशाच काही पदविका अभ्यासक्रमांविषयी सांगणार आहोत, जे पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. पाहूया हे पर्याय कोणते आहेत याविषयी….

12वी पास झाल्यानंतर काही उमेदवारांना बॅचलर प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर काहींना डिप्लोमा कोर्स करायचा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट ज्वेलरी डिझायनिंगसह इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत; यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना चांगली नोकरी आणि चांगला पगार मिळू शकतो.

१. ज्वेलरी आणि इंटिरियर डिझायनिंग (Career After 12th)
तुम्हाला इंटिरिअर डिझायनिंगमध्ये रस असेल किंवा तुम्हाला ज्वेलरी डिझाइन आवडत असेल तर तुम्ही या क्षेत्रात प्रगती करू शकता. जसजसा काळ बदलत आहे त्याप्रमाणे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि घराच्या आतील भागाबाबत खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासोबतच तुमच्यासाठी ज्वेलरी डिझायनिंग हाही एक करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.

२. हॉटेल मॅनेजमेंट
जर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीचे आकर्षण वाटत असेल आणि या क्षेत्रात करिअर करण्याचा कधी विचार केला असेल, तर तुम्ही बारावीनंतरही या क्षेत्रात प्रगती करू शकता. यासाठी बारावीनंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट करणे हा उत्तम पर्याय ठरेल. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र प्रवेश निकष आहेत, त्यामुळे संबंधित संस्थेचा तपशील मिळवून, आपण त्याच्याशी संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

३. इव्हेंट मॅनेजमेंट
प्रत्येकालाच आपले छोटे-मोठे कार्यक्रम संस्मरणीय बनवायचे असतात. यासाठी ते इव्हेंट मॅनेजमेंट टीमकडे काम सोपवून त्यांची मदत घेतात; त्यामुळे हा उद्योग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास या क्षेत्रात डिप्लोमा कोर्स करून चांगल्या प्रोफाइलवर नोकरी मिळू शकते.

हे पर्याय देखील आहेत उपलब्ध
– डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट
– डिप्लोमा इन ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट
– हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा
– मार्केटिंग आणि जाहिरात डिप्लोमा (Career After 12th)
– ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com