Career After 12th : शिक्षक होवून करिअर करायचं आहे? तर मग 12 वी नंतर करा ‘हे’ कोर्स

करिअरनामा ऑनलाईन । थोड्याच दिवसात 12वी परीक्षेचा (Career After 12th) निकाल जाहीर होईल. जे तरुण-तरुणी शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहेत, ते आतापासूनच तयारी करू शकतात. 12वी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही B.El.Ed/D.El.Ed/BA B.Ed/B.Sc B.Ed यासारख्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता आणि नंतर शिक्षक होवून करिअर करु शकता.

देशभरात बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लवकरच (Career After 12th) जाहीर होणार आहेत. जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होणार आहेत आणि शिक्षण क्षेत्रात करिअर करून शिक्षक बनू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचे दरवाजे खुले होणार आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊन या क्षेत्रात तुमचे करिअर घडवू शकता. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन करण्याची गरज नाही; कारण या कोर्सेसमुळे तुम्ही शिक्षक होण्यास पात्र व्हालच आणि त्यासोबत तुम्हाला पदवीही मिळवता येईल. जाणून घेवूया 12 वी नंतर कोणते कोर्स उपलब्ध आहेत, या कोर्सला प्रवेश कसा मिळवायचा याविषयी….

12वी नंतर हे आहेत विविध अभ्यासक्रम (Career After 12th)
जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही B.El.Ed/D.El.Ed/BA B.Ed/B.Sc B.Ed या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण केली असावी. यामध्ये B.El.Ed/BA B.Ed/B.Sc B.Ed हे सर्व चार वर्षांचे अभ्यासक्रम आहेत तर D.El.Ed हे दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत.

कसा मिळवाल प्रवेश
B.El.Ed/BA B.Ed/B.Sc.B.Ed या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्यांकडून प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. आता या एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशभरात (Career After 12th) परीक्षा घेण्याचीही तरतूद आहे. याशिवाय D.El.Ed अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनेक राज्यांमध्ये प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते, तर काही ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे प्रवेशही दिला जातो.

कोणत्या विद्यार्थ्यांना शिक्षण देवू शकता
B.Ed करणारे उमेदवार सहावी ते आठवीच्या वर्गात (Career After 12th) शिकवण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे, ज्या उमेदवारांनी B.El.Ed पदवी प्राप्त केली आहे ते 6 वर्षांवरील आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना शिकवण्यासाठी पात्र ठरतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार D.El.Ed पास असलेले उमेदवार प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यास पात्र ठरतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com