Career After 12th : ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण ॲकेडमी’ मधून घ्या पायलट होण्याचे प्रशिक्षण; १२ वी पास करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासून मुलांना पायलट (Career After 12th) होण्याचं आकर्षण असतं. तुम्हाला माहित आहे का, की या क्षेत्रात 2 प्रकारच्या संधी आहेत. पहिली संधी म्हणजे भारतीय संरक्षण दलामध्ये वैमानिक बनण्याची आणि दुसरी म्हणजे व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये वैमानिक होण्याची संधी. भारतीय वायु दलामध्ये 12 वीनंतर एनडीएमधून (NDA) शिक्षण घेतल्यानंतर पायलट होण्याची संधी मिळते तसेच पदवीनंतर सीडीएस (CDS) किंवा ॲफकॅट परीक्षांमधून पायलट होण्याची संधी मिळते. आज आपण जाणून घेणार आहोत; व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये वैमानिक बनण्याच्या संधी विषयी.

भारतात दिवसेंदिवस विमान प्रवाशांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या व्यवसायामुळे खासगी विमान कंपन्यांमध्ये वैमानिकांची गरज वाढत चालली आहे. वैमानिकांना मिळणारा तगडा पगार, तसेच देशविदेशात फिरण्याची संधी, समाजात मिळणारे मानाचे स्थान यामुळे या करिअरचे तरुणांना आकर्षण वाटते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण ॲकेडमी (Career After 12th)
वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक खासगी संस्था भारतात आहेत. देशात एकच शासकीय प्रशिक्षण संस्था आहे जी रायबरेलीमध्ये स्थापन करण्यात आली आहे. भारत सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत स्थापित करण्यात आलेल्या या संस्थेचे नाव आहे ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण ॲकेडमी’. या संस्थेमध्ये वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व अद्ययावत सुविधा आहेत. ज्यामध्ये स्वत:चा चोवीस विमानांचा ताफा, दीड किलोमीटरची धावपट्टी, अद्यायावत यंत्रशाळा, सिम्युलेटर इ. गोष्टींचा समावेश आहे.

काय आहे आवश्यक पात्रता
या संस्थेमध्ये १२ वीनंतर करता येणाऱ्या दोन वर्षांच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी जाहीरात प्रसिद्ध झाली आहे.
१. विद्यार्थ्याची उंची किमान १५८ से. मी. असावी. असावी.
२. फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषय घेऊन किमान ५० टक्के (Career After 12th) गुण मिळवलेले विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.
३. यावर्षी बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
४. ज्या विद्यार्थ्यांना या कोर्स बरोबरच B.Sc. एव्हिएशन पदवी कोर्स करायचा असेल त्यांना ३ वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश घेता येईल.

अशी आहे प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप –
१. प्रवेश प्रक्रिया त्रिस्तरीय असेल.
२. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल
३. सोमवार दि. ३ जून रोजी मुंबई व पुणे शहरात ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल.
४. यामध्ये इंग्रजी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, रिझनिंग, करंट अफेअर्स या विषयांची बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेतली जाते.
५. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल. (Career After 12th)
६. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत जुलै महिन्यात घेतली जाईल व त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन अंतिम निवड यादी जाहीर होईल.
७. मुख्य कोर्स २५ सप्टेंबर पासून सुरू होईल.

९ मे अखेर करा अर्ज – (Career After 12th)
या संस्थेचे प्लेसमेंट रेकॉर्ड उत्तम आहे; त्यामुळे नोकरी मिळण्याची हमी आहे. या प्रशिक्षणासाठी दि. ९ मे २०२४ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने संस्थेच्या https://igrua.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com