Business Success Story : IIT मधून शिक्षण.. अमिरिकेत नोकरी.. भारतात परतला.. चहा विकून झाला करोडपती 

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेत नोकरी मिळून लाईफ सेट (Business Success Story) करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई आयआयटीतून  पास झाल्या नंतर नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या तरुणाला त्याच्या जगावेगळ्या स्वप्नाने त्यांना भारतात खेचून आणलं. नितीन सलूजा असं या तरुणाचं नाव आहे. भारतीयांचे चहाबद्दल असलेले प्रेम पाहून त्यांना चहाचा नवा ब्रॅंड काढण्याची कल्पना सुचली. यामध्ये  नितीन याला त्याच्या मित्रांनी देखील मदत केली. आज नितीनचा चहाचा चायोस (Chaayos) हा ब्रॅंड चांगलाच फेमस झाला आहे. देशभरात चायोसच्या सुमारे 200 शाखा उघडण्यात आल्या आहेत.

नितीन सलोजा यांनी आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर (Business Success Story) त्यांना अमेरिकेत बड्या कंपनीत नोकरी मिळाली. तेथे ते कॉरर्पोरेट मॅनेजमेंट कंन्सल्टेंट या पदावर काम करत होते. एवढ्या मोठ्या कंपनीत लाखो रुपये पंगरांसाह इतर सुखसोयी मिळत असताना सुध्दा त्यांचे मन अमेरिकेत रमले नाही. त्यांनी पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. येथे येवून स्टार्टअप सुरु करण्याचा त्यांचा विचार होता. स्टार्टअप सुरु करताना त्यांना असंख्य अडचणी आल्या. पण धैर्याने सामोरे जात या अडचणींवर त्यांनी मात केली.

अशी झाली ‘चायोस’ ब्रॅंडची सुरुवात (Business Success Story)
भारतीयांना असलेली चहाची आवड पाहून त्यांनी ‘चायोस’ हा नवा ब्रॅंड विकसित केला. स्टारबक्स, कॅफे कॉफी डे, कॅफे मोचा आणि बरिस्ता असे देशात अनेक कॉफी शॉप्स हीट झाले असताना नितीन सलोजा यांनी स्वतःचा ब्रॅंड विकसित केला. ‘चायोस’ ही भारताची अग्रणी चहा विकणारी कॅफेची श्रृखंला तयार झाली आहे. नितीन यांची ही कंपनी शंभर कोटीचा व्यवसाय करणारी कंपनी बनली आहे. अमेरिकेत काम करत असताना नितीन आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेत चहा विकणारे कोणी सापडले नाही. त्यामुळे चहाची तलफ त्यांना चहाची विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याकडे घेवून गेली. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून भारतात येऊन चहा विक्रीचा व्यवसाय सुरु केला.

भारतात ‘चायोस’च्या 200 हून अधिक शाखा
भारतात चहा पिण्याची संस्कृती मोठी आहे. 2012 यावर्षी नितीन आणि त्यांचा मित्र राघव यांनी गुरुग्राममध्ये पहीला ‘चायोस’ कॅफे उघडला. व्यवसायाची सुरुवात करताना भांडवल जमवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. कोरोना काळात चायोसला आर्थिक संकटाचा सामना करावा (Business Success Story) लागला. पण सुरुवातीला अडचणीचा सामना करावा लागल्यानंतर नितीन यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. कंपनीने 2020 मध्ये 100 कोटी उत्पन्न मिळविले. आज भारतात 200 हून अधिक चायोस कॅफे आहेत. चायोस हा देशातील प्रिमियम चहा सर्व्ह करणारा कॅफे बनला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com