Business Success Story : बर्फ विकण्याची भन्नाट बिझनेस आयडिया; उभी राहिली करोडोंची कंपनी; वाचा दोन मित्रांची गोष्ट

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनी एकत्र येवून एखादी गोष्ट (Business Success Story) करायचं ठरवलं की दुनिया इकडची तिकडे होवू शकते.  अशाच दोन मित्रांना आज आपण भेटणार आहोत. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. या दोघांनी मिळून आईस क्यूब्स कंपनी सुरू केली आणि आज ही कंपनी कोट्यवधींची उलाढाल करत आहे. त्यांच्या कंपनीचं नांव आहे. ‘Dr Cubes’. जाणून घेवूया, की या कंपनीच्या संस्थापकांनी केवळ बर्फ विकून कोट्यवधींची कंपनी कशी उभी केली याविषयी…
आज आपल्या देशात दररोज नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत. हे पाहून इतरांनाही स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी स्टार्टअप्सच्या दुनियेची एक गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यात या स्टार्टअपच्या संस्थापकांनी बर्फ विकून कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे. ‘Dr Cubes’ कंपनीचे व्हॅल्युएशन सुमारे 5.33 कोटी रुपये आहे.

कशी सुचली बिझनेस आयडिया? (Business Success Story)
‘Dr Cubes’ या स्टार्टअपची सुरुवात 2017 मध्ये दोन मित्रांनी केली होती. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर हे या कंपनीचे दोन संस्थापक आहेत. बाजारात कोणतीही कंपनी चांगल्या प्रतीच्या आणि स्वच्छ Ice Cubes पुरवत नव्हती; याची वस्तूची मागणी पाहून या दोघांनी Ice Cubes विकण्याचा विचार सुरु केला आणि या स्टार्टअपची सुरुवात झाली.
यावेळी या दोन मित्रांनी असा विचार केला की अशी कंपनी का सुरू करू नये ज्यामध्ये आपण लोकांना ताजे आणि स्वच्छ Ice Cubes देऊ शकू. या कल्पनेमुळे दोघांनी Dr Cubes कंपनी सुरू केली, जिथे त्यांनी ग्राहकांना ताजे आणि स्वच्छ बर्फाचे तुकडे देण्यास सुरवात केली. Dr Cubes ग्राहकांना विविध प्रकारचे Ice Cubes पुरवतात. ज्यामुळे ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होतात; बर्फाच्या उत्तम दर्जमुळे त्यांचा ग्राहकही उत्पादनावर खुष आहे.

कंपनीचा करोडोंत आहे टर्नओव्हर
नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर यांनी सांगितले की, त्यांनी 2019 मध्ये त्यांच्या व्यवसायातून  50 लाख रुपये कमावले होते. 2020 मध्ये ते 1.2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.कोरोना महामारीच्या (Business Success Story) काळात त्यांच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला असला तरी त्यांनी आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1.10 कोटी रुपये कमावले.
2023 मध्ये 2.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. कंपनीला आवश्यक फंड न मिळाल्यानंतरही त्यांनी आपले काम सुरुच ठेवले आहे. आज ही कंपनी खूप वेगाने वाढत आहे. तसेच आज डॉ. क्युब्स कंपनीचे मूल्य कोट्यवधी रुपये झाले आहे. एकूणच काय या दोन मित्रांनी सुरु केलेला बिझनेस अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

‘शार्क टँक इंडिया शो’मध्ये सहभाग (Business Success Story)
आपणाला प्रसिद्ध शार्क टँक इंडिया शो (Shark Tank India Show) माहित आहेच. जिथे नवीन स्टार्टअप संस्थापक त्यांच्या व्यवसाय कल्पनांच्या मदतीने त्यांच्या स्टार्टअपसाठी निधी मिळवतात. नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर हे दोघे या सहोमध्ये सहभागी झाले होते. या शो मध्ये आल्यानंतर या दोघांनी सर्व शार्कला त्यांच्या व्यवसायासाठी ८० लाख रुपयांचा निधी मागितला होता, त्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीचा 15 टक्के हिस्सा शार्कला दिला होता. परंतु शार्क्सने तसे करण्यास नकार दिला. कारण देताना ते म्हणाले की हा एक नवीन व्यवसाय आहे आणि हा स्टार्टअप जगातील सर्व मोठ्या कंपन्या सहजपणे कॉपी करू शकतात आणि व्यवसायात आपल्याला मागे टाकू शकतात.

‘Dr Cubes’ हे नाव का दिलं?
बर्फाच्या उत्पादनाला Dr Cubes हे नाव देण्यात आलं आहे. ही कंपनी बर्फ तयार करताना स्वच्छता आणि शुद्धतेबाबत काळजी घेते. इथे तयार होणारे बर्फाचे तुकडे पेयासह इतर वापरासाठी देखील उच्च दर्जाचे आहेत याची खात्री करण्यासाठी या बर्फाच्या तुकड्यांना कठोर अशा तीन चाचण्या पार कराव्या लागतात. यामुळे या उत्पादनाला ‘Dr Cubes’ हे नाव देण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com