Business Success Story : ‘हिने’ तर कमालच केली!! एकटी चालवते 41 हजार कोटीची कंपनी; हाताखाली आहेत हजारो कर्मचारी

करिअरनामा ऑनलाईन । आज महिला कोणत्याच (Business Success Story) क्षेत्रात मागे नाहीत. नोकरी तसेच व्यवसायात यशस्वी झालेल्या अनेक महिलांच्या यशोगाथा आपण वाचल्या आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे हिना नागराजन. त्या ‘डियाजिओ इंडिया’ नावाची कंपनी चालवतात. ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या मद्य कंपन्यांपैकी एक आहे. त्या केवळ कंपनीच्या सीईओ नाहीत तर व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. आज आपण या लेखात त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत…

बिझनेस वूमन अभ्यासातही मागे नाही
बिझनेस चालवण्यात पारंगत असण्यासोबतच हिना नागराजन अभ्यासातही टॉपर आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम (Business Success Story) अहमदाबादमधून MBA केले. जुलै 2021 मध्ये त्यांना Diageo चे MD आणि CEO बनवण्यात आले. यानंतरच डियाजिओने विजय माल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ताब्यात घेतली. या कंपनीत 3261 कर्मचारी काम करतात. हिना एवढ्या सर्व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात. युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडचे बाजार भांडवल 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2016 पर्यंत विजय माल्ल्या या व्यवसायाची धुरा सांभाळत होते.
त्यांचे वर्षभरातील PF योगदान ३३,००,००० रुपये होते. त्यांना १३,२२,७५० रुपये ग्रॅच्युइटी मिळाली. त्यांना वार्षिक सीटीसी ८ कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.

व्यवसाय चालवण्याचा तब्बल 30 वर्षांचा अनुभव (Business Success Story)
हिना नागराजन यांची सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे डियाजिओपूर्वी त्यांनी FMCG क्षेत्रात सुमारे ३० वर्षे योगदान दिले आहे. त्यांनी Reckitt Benckiser ची मूळ कंपनी Reckitt, Mary Kay India आणि Nestle यांसारख्या कंपन्यांमध्ये नेतृत्व पदावर काम केले आहे. डियाजिओ इंडियाच्या प्रमुख या नात्याने त्या कंपनीचे नफा-तोटा ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अनुपालन आणि गुंतवणुकीपर्यंतचे काम पाहतात. भारतातील व्यवसाय प्रमुख होण्यापूर्वी हिना यांनी डियाजिओच्या आफ्रिका इमर्जिंग मार्केट क्षेत्राचे नेतृत्व केले आहे.

कंपनी आहे IPL संघाची मालक
डियाजिओ इंडिया आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (Business Success Story) मालक कंपनी आहे. या संघाची एकूण संपत्ती ८५०० कोटी रुपये आहे. विराट कोहली दीर्घकाळ या संघाचा कर्णधार होता. तो अजूनही या संघाचा सदस्य आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com