Business Success Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली.. भाड्यानं हॉस्पिटल घेतलं.. 5 वर्षात झाली 11,400 कोटींची कंपनी; कोण आहे ‘ही’

करिअरनामा ऑनलाईन । भारतात असे अनेक उद्योजक आहेत (Business Success Story) ज्यांनी आपल्या मेहनतीमुळे आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेला आहे. अशाच एक यशस्वी उद्योजक म्हणजे डॉ. गरिमा साहनी ज्यांनी अवघ्या पाच वर्षांत 11,400 कोटी रुपयांचा वैद्यकीय व्यवसाय उभारण्यात यश मिळवलं आहे. डॉ. गरिमा साहनी ही मूळची गुरुग्रामची आहे आणि तिने तिची प्रिस्टीन केअर कंपनी सुरू करण्यासाठी मोठ्या पगाराची नोकरी सोडली. डॉ. गरिमा साहनी यांनी 2018 मध्ये त्यांचे पती वैभव आणि एका मित्रासह प्रिस्टिन केअर कंपनी सुरु केली.

हॉस्पिटलमधील रिकाम्या जागेचा केला वापर
डॉ. गरिमा साहनी यांनी तिची कंपनी प्रिस्टिन केअर नव्या अवतारात पुन्हा सुरू केली आणि हा प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला. गरिमाने अवलंबलेले बिझनेस मॉडेल म्हणजे हॉस्पिटलमधील रिकाम्या जागेचा वापर करणे आणि त्या ठिकाणी रुग्णांवर त्यांच्या वैद्यकीय पाया, डॉक्टर आणि कर्मचारी (Business Success Story) यांच्या मदतीने उपचार करणे. गरिमा आणि तिच्या टीमला त्यांचे बिझनेस मॉडेल यशस्वी करण्यासाठी पैशांची गरज होती आणि त्यांना Sequoia Capital कडून निधी मिळाला. कंपनी सुरू झाल्यापासून 3 वर्षातच हा स्टार्टअप युनिकॉर्न बनला. सध्या कंपनीचे मूल्यांकन USD 1.4 अब्ज म्हणजेच 11,400 कोटी रुपये आहे.

अशी सुचली कल्पना (Business Success Story)
डॉ. गरिमा साहनी यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातून स्टार्टअपची कल्पना सुचली. 2018 मध्ये स्थापित, प्रिस्टिन केअर आता 42 हून अधिक शहरांमध्ये स्थिर स्थावर झाले आहे. कंपनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार करताना 800 हून अधिक रुग्णालयांशी भागीदारी केली आहे.
प्रिस्टिन केअरला आर्थिक वर्ष 2024 पर्यंत रु. 1000 कोटींचा महसूल मिळवायचा आहे. FY22 मध्ये कंपनीने 350 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आणि कंपनीच्या कमाईपैकी 60 टक्के रक्कम रुग्णाच्या शस्त्रक्रियेतून येते. ऑपरेशन थिएटर आणि बेडची सरासरी व्याप्ती 20 टक्के आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com