MPSC चा मोठा निर्णय; ‘CSAT’ मध्ये ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक; विध्यार्थ्यांच्या मागणीला यश

करिअरनामा ऑनलाईन | MPSC वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत ‘CSAT’च्या पेपर २ मध्ये ३३ टक्के गुण मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘सीसॅट’च्या या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळाले तरच मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार आहे. MPSC चे विद्यार्थी गेल्या ८ वर्षांपासून या संदर्भात आयोगाकडे मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीला आत्ता यश आलंय. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विध्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

सामान्य अध्ययन पेपर क्रमांक १ मधील गुण मुख्य परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. मात्र, या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेच्या पात्र यादीत समाविष्ट होण्यासाठी पेपर क्रमांक दोन CSAT मध्ये किमान ३३ टक्के गुणांची अट बंधनकारक करण्यात आली आहे. MPSC ने या संदर्भातील घोषणा केली आहे.

लोकसेवा आयोगाच्या पुढच्या पूर्व परीक्षेपासून हा नियम बंधनकारक करण्यात येणार आहे. लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा महत्वाच्या मानल्या जातात. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. उपजिल्हाधिकारी, उविभागीय पोलीस आधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तहसिलदार यासारख्या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभाराबद्दल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच नाराजीची भावना असते. परीक्षांचे नियोजनातील गोंधळ हे या नाराजीचे मुख्य कारण मानले जाते. असे असले तरी गेल्या काही महिन्यात आयोगाने आपल्या कामात अमूलाग्र बदल केल्याचे दिसत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com