करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसह पालकांना मुलांच्या (Army College of Nursing) भविष्याबाबत खूप चिंता सतावत असते. 12 वी नंतर मुलांनी कुठे प्रवेश घ्यावा जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, हा प्रश्न पालकांना नेहमीच भेडसावत असतो. बऱ्याच पालकांना वाटतं आपल्या मुलाने 12 वी नंतर मेडिकलचं शिक्षण घ्यावं. पण यासाठी विद्यार्थ्याने NEET परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. नीट ही मेडिकलच्या अभ्यासासाठी असलेली प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा पास केल्याशिवाय डॉक्टर होण्यासाठी सरकारी कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळत नाही. पण तुम्ही जरी NEET पास केली नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही. आम्ही अशाच एका कॉलेजबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला NEET पास न करता प्रवेश घेता येतो. शिवाय इथं एकदा अॅडमिशन मिळालं की नोकरी मिळेलच अशी 100 टक्के खात्री असते. आम्ही सांगत आहोत आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग या कॉलेजविषयी.
आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग (Army College of Nursing)
आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, जालंधर कँट हे बाबा फरिद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, फरिदकोटशी (पंजाब) संलग्न आहे. येथे चार वर्षांचा B.Sc नर्सिंगचा डिग्री कोर्स करता येतो. आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगची स्थापना लष्करावर अवलंबून असलेल्या महिलांसाठी करण्यात आली होती. या ठिकाणी भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या प्रत्येक वार्डासाठी एक जागा राखीव आहे. हे आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) अंतर्गत कार्य करते, जी 137 आर्मी पब्लिक स्कूल आणि 12 व्यावसायिक प्रोफेशनल कॉलेजेसचं मॅनेजमेंट करते.
भारतीय सैन्याच्या आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता
1. इथे प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही (Army College of Nursing) मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून किमान 45% गुणांसह फिजिक्स, केमेस्ट्री किंवा बायोलॉजी विषयासह 12 वी उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे.
2. यासोबतच भारतीय सैन्य, भारतीय वायुसेना व भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी एकेक जागा राखीव आहेत.
प्रवेशाची तारीख – (Army College of Nursing)
1. उमेदवारांची निवड आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, जालंधर कँटद्वारे 30 जून 2024 रोजी देशभरातील निवडक केंद्रांवर परीक्षा आयोजित करून घेतलीजाईल.
2. ही ऑनलाइन प्रवेश परीक्षा ओएटी एसीएन आणि आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, गुवाहाटीसाठीही घेतली जाईल.
3. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला याठिकाणी प्रवेश मिळू शकत नाही.
प्रवेशाविषयी अधिक माहितीसाठी इथे भेट द्या – https://acn.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com