Abroad Study : तुमची परदेशवारी ठरेल फायद्याची!! परदेशात शिक्षण घेण्याचे ‘हे’ आहेत फायदे

करिअरनामा ऑनलाईन । जे तरुण देशाबाहेर जावून अभ्यास करतात (Abroad Study) त्यांच्याकडे चांगले नेटवर्क असते; असे समजले जाते. यामुळे त्यांना जगभरातील तमाम गोष्टींचा अवाका येतो. त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांशी सहज संपर्क साधण्यास मदत होते. यामुळे त्यांना नोकरीमध्ये चांगल्या संधीही मिळतात परिणामी कंपन्या देखील ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभव आहेत अशा उमेदवारांकडे आकर्षित होताना दिसतात.

आपण पाहतो की, दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. एका रिपोर्टनुसार 2022 साली परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक होती. गेल्या वर्षी 7 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी देशाबाहेर गेले होते. जर तुम्हीही उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अभ्यासासोबत इतर कोणते फायदे आहेत ते सांगणार आहोत.

1. जे देशाबाहेर शिक्षण घेतात त्यांच्याकडे चांगले नेटवर्क (Abroad Study) असते. जे त्यांना जगभरातील त्यांच्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांशी कनेक्ट होण्यास मदत करते. यामुळे त्यांना नोकरीच्या चांगल्या संधीही मिळतात. कंपन्या देखील अशा उमेदवारांकडे आकर्षित होतात आणि त्यांना नोकरीवर ठेवण्यास आग्रही असतात.
2.ज्यावेळी तुम्ही परदेशात जाता तेव्हा तुम्ही नवीन संस्कृतीशी जोडले जाता. नवीन ठिकाणी गेल्याने तुम्हाला नवीन संस्कृतीची ओळख होते. तिथल्या प्रथा, रूढी – परंपरा, राहणीमान समजून घेण्याची संधी मिळते. या गोष्टीमुळे तुमचा दृष्टीकोन नक्कीच व्यापक होतो.
3. तुमच्याकडे असलेले अनेक भाषांचे ज्ञान तुमच्या CVला नक्कीच प्रभावी बनवते. परदेशात राहून तुम्ही तिथल्या चालीरीती आणि भाषा शिकता. तिथली भाषा तुम्ही पूर्णपणे शिकू शकला नाही तरीही एक गोष्ट शक्य आहे, ती म्हणजे तुम्ही इतर भाषेबद्दल बरेच काही शिकता ज्याचा तुम्हाला भविष्यात कुठे ना कुठे उपयोग होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com